मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
पाहसि आतां अंत असा कां ?...

राम गणेश गडकरी - पाहसि आतां अंत असा कां ?...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


पाहसि आतां अंत असा कां ? पीडिसि कां या दीना ?

सुंदरि, पदरीं मदीय हृदया घेसि न कां पदलीना ?

क्षणैक हंससी, क्षणभर रुससी; निष्ठुर चंचलता ही;

संदिग्धा ही वृत्ति व्याकुल करित मनाप्रति पाही.

लाजुनि अजुनी स्वजना हा जन जवळी कां नच केला ?

किंवा हृदया द्वेषचि दूषवि मजविषयींचा पहिला ?

सुंदर वदनीं तव निर्दयता हृदय विदारत माझें;

पडुं दे श्रवणीं ती शुभ वाणी मौन न हें तुज साजे.

प्रत्युत्तर दे प्रश्‍ना कांहीं; अंत वृथा न पहावा;

विनोदवचनीं थांबवि नच त्या, प्रश्‍नें परतवि नच वा.

संशयविष हें जाळित जीवा अधरसुधा दे रमणि;

करी विनवणी निर्वाणीची गोविंदाग्रजवाणी !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP