मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
नीज गुणी बाळ झणीं शान्त ,...

राम गणेश गडकरी - नीज गुणी बाळ झणीं शान्त ,...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


नीज गुणी बाळ झणीं शान्त, यावरी---

गाउं किती ? कुंठितमति, नीज झडकरी !

विश्वाच्या स्नेहरसीं मग्न जाहलें,

प्रेमाच्या अश्रुजलें बाळ नाहलें,

मायेची तीट गालिं, चित्र जणुं हले,

सुयशाचें दुग्धपान गोड त्यावरी !

हृदयाचा केला हा पाळणा नवा,

बांधाया ममतेचा पाश मग हवा,

हृत्तरंग हलवि तया करुनि मृदु रवा,

ब्रह्मा सगुण बाळरुप रमत अंतरीं !

माता करि मंगलमय गायना अहा !

प्रेमभरें विश्व त्यांत रंगलें पहा;

सोड गडया ! हट्ट तुला शोभतो न हा,

अजुनि तुजसि नीज न ये--सांग कां तरी ?

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP