मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
नमोऽस्तु ते ! धन्य एक स...

राम गणेश गडकरी - नमोऽस्तु ते ! धन्य एक स...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


नमोऽस्तु ते ! धन्य एक सकल जगीं तूंच ! उगवत्या रवे !

भागवुणीं जी अतुला । भक्तीनें अर्घ्य तुला,

स्वीकारी या ऋतुला । पुण्य ज्यांत सांठवें.

गगनिं सदा जरि अससी । तरि अमुच्या नयनांसी

काल न तूं दिसलासी ! आज तुझे कर नवे ।

थोर हृदय परि तव हें । अपराधा नच पाहे,

गतवृत्त न मनिं राहे । फिरुनि कधिं न आठवे !

मावळले काल रवि । वार्ताही ती न हवी !

तेज तुझें त्यां लपवी । स्वकर पसरि नवनवे !

जो प्रकाश काल रमे । आतां तो तिमिर गमे !

हा प्रकाश कधिं न शमे । तव करिं जो संभवे.

थोर तूंच ! धन्य तूच ! तेजोनिधि दिव्य तूंच !

नयनिं मनीं एक तूंच । इतर कांहिं नाठवे !

झालें मनिं हेंच ठाम । कीं रवि तुजलाच नाम !

तेजाचें तूंच धाम । सांगावया का हवें ?

स्तुति आतां इतरांची । कधिं नाहीं व्हायाची !

वंदन हें तुजलाची । सतत, उगवत्या रवे !

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP