TransLiteral Foundation

मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
जो जो जो जो रे रघुराया । ...

पाळणा - जो जो जो जो रे रघुराया । ...

पाळणे - Palane are the marathi lullby songs usually sung at Naming Ceremony called "Barase" (बारसे). These are also sung while putting child to sleep in a swing.


रामाचा पाळणा

जो जो जो जो रे रघुराया । निद्रा करिं बा सखया ॥

जोगी आलासे भेटाया । शशिसम देखुनि काया ॥बा०जो०॥

जोगी दिसतो सुंदर । मस्तकीं जटाभार ॥

गळां रुंडमाळांचे हार । शोभे व्याघ्रांबर ॥बा०जो०॥१॥

भस्म चर्चूनि सर्वांगीं । वेष्‍टिला भुजंगीं ॥

भूतें घेऊनियां स्वअंगीं । आला प्रेमरंगीं ॥बा०जो०॥२॥

जटेमधुनियां जळ वाहे । मुद्रा लावुनि पाहे ॥

मान धरुनियां तो राहे । नकळे कोण आहे ॥बा०जो०॥३॥

इतुकें ऐकुनियां वचन । हांसले रघुनंदन ॥

भावें पदकमळीं तल्लीन । गोसावीनंदन ॥बा०जो०॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-03T03:20:13.9830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धुणे

  • न. ( समुच्चयाने ) धुवावयाचे वस्त्र , कपडे . लोकांची धुणी धुणे - नेहमी दुसर्‍याचे दोष काढीत बसणे ; दौषेकदृष्टी असणे . ( वाप्र . ) धुणे झाडणे - कोणतेहि वस्त्र स्वच्छ धुऊन झाल्यावर ते वाळत टाकण्यापूर्वी त्याचा पिळा उलगडून , कांठ सांफ करणे व झटकणे . 
  • स.क्रि. १ ( पाण्याने वस्त्र , पात्र इ० ) घासून स्वच्छ करणे . २ ( ल . ) नागविणे ; उघडा करणे ; पूर्णपणे स्वच्छ , साफ करणे हे क्रियापद सकर्मक असले , तर भूतकाळी कर्त्याप्रमाणे ( जेव्हां कर्म शरीर किंवा शरीरावयव असेल तेव्हां ) सुद्धां चालते . उदा० मी हात धुतलो , पाय धुतलो , अंग धुतलो . [ सं . धू ; प्रा . धुण ; सिं . धुअणु ] धुतले जाणे - ( घर ) लुबाडले जाणे ; आंतील जिन्नस , पैसा इ० नेण्यांत येणे . माझे सर्व घर धुतले जाईल । - विवि ८ . ११ . २१० . धुतलेला तांदूळ , धुतलेले मोती - पुन . १ सुंदर , सशक्त , टवटवीत , सतेज चेहर्‍याच्या माणसास म्हणतात . २ शुद्ध ; स्वच्छ ; निर्मळ ; निर्दोष . धुतलेला विस्तव - पु . कोळशाप्रमाणे काळाकूट्ट माणूस . धुतांच जाणे - थोड्या वेळांत , दिवसांत निरुपयोगी होणे ; कमी किंमतीचा , योग्यतेचा असणे . 
  • ०पाणी न. बायकांच्या रोजच्या गृहकृत्यांस ( व्यापकार्थी ) शब्द . कपडे धुणे , पाणी आणणे ; सारवणे इ० काम . [ सं . धू ] 
RANDOM WORD

Did you know?

सर्व धार्मिक कार्यांत आरंभी श्रीगणेशाची पूजा कां करतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Vedik World Heritage
Links to several World Hindu Heritage sites.