मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अंगाईगीत|संग्रह १|

अंगाईगीत - मथुरेमध्यें अवतार झाला । ...

मोजक्या आणि शेलक्या शब्दांचा वापर करून निर्माण झालेलें अंगाईगीत काव्य प्रामाणिकपणें मनांत आलेल्या आईच्या भावनेचा आविष्कार करते.


मथुरेमध्यें अवतार झाला । देव कृष्णजी जन्मासि आला । तोडुनीया बेड्या बंदी सोडिले ।

चरणाच्या प्रतापीं मार्गीं लागले । जो बाळा जो जो रे जो

गोकुळीं मध्यान्हिं देवाजी आले । नंदाच्या घरीं आनंद ल्यालें । गुड्या तोरणें शीघ्र लावीले ।

गननीं देवपुष्प नाचले । जो बाळा जो जो रे जो

तिसर्‍या दिवशीं वाजंत्री वाजे । नैवेद्या गर्जे कर्णाचे नादें ।

ऊठ ऊठ छंद नाचे गोविंद । जो बाळा जो जो रे जो

चवथ्या दिवशीं सटवाईची चौकी । लिंब डाळिंब नारळ आणीती ।

सगळ्या मिळूनी जिवत्या काढीती । जो बाळा जो जो रे जो

पांचव्या दिवशीं पाटा पूजन । बांधिली फुलवरा वाट्या तोरण ।

सरी साखळी टोपडं अंगडं । जो बाळा जो जो रे जो

सहाव्या दिवशीं सटवीचा फेरा । गोपा बाळासी आवरून धरा ।

रात्रीच्या वेळीं लावा अंगारा । जो बाळा जो जो रे जो

सातव्या दिवशीं श्रावणि पूजन । हळदीकुकवाचें वाण करीन ।

पान सुपार्‍या सर्व्या वाटीन । जो बाळा जो जो रे जो

आठव्या दिवशीं आठवीं चिंतीतें । गोपा बाळाला नववी शिणीतें ।

सुइणी घेऊनी जाग्रण करीते । जो बाळा जो जो रे जो

दहाव्या दिवशीं बळीं राजा पूजीती । नगरच्या नागी धाऊनि येती ।

गोपाच्या जोडीला बळीराणा घेती । जो बाळा जो जो रे जो

बाराव्या दिवशीं बारसं करीती । पक्वान्नाचा सारा थाट उडवीती ।

लाडू बर्फीनीं ताटं भरीती । जो बाळा जो जो रे जो

पुत्र जन्मला देखोनि नयनीं । हिरा शोभला जैसा कोंदणीं । पूर्वेचा चंद्र जातो अस्तमानीं ।

त्याला देखूनी लज्जित मनीं । जो बाळा जो जो रे जो

रत्‍नजडित पिंपळपान शोभतें भाळीं । नयनाच्या कोरां काजळ घाली ।

दंडीं बाजूबंद मुद्रिका करीं । पायींचे तोडे पैंजण वरी । वाळ्याचा नाद उमटतो दारीं ।

सोन्याचा दाब कमरेच्या वरी । मोत्यांची कंठी त्यावर सरी । यशोदा बसली मंचकावरी ।

नांव ठेवीलें परब्रह्म हरी । जो बाळा जो जो रे जो

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP