मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|नागपंचमीची गाणी|संग्रह १|
वहिल्या रानाला पाण्याचं ज...

नागपंचमी - वहिल्या रानाला पाण्याचं ज...

श्रावण महिन्यांत दरवर्षी येणारी नागपंचमी म्हणजे सर्वसामान्य स्त्री जीवनांतील एक मोठी विसावा आहे


वहिल्या रानाला पाण्याचं जंजाळ

घागर पवत बाई चुंबळ तरंगत

नदींतल्या मगरमाशां दे माजी घागर

सासू माजी वंगाळ शिव्या मला देईल

नदींतल्या मगरमाशा दे माजी घागर

सासरा माजा वंगाळ मला भाजुनी खाईल

नदींतल्या मगरमाशा दे माजी घागर

नणंद माजी वंगाळ राग मला भरील

नदींतल्या मगरमाशा दे माजी घागर

दीर माजा वंगाळ चहाड्या करील

नदींतल्या मगरमाशी दे माजी घागर

पति माजा वंगाळ मला फोडुनी काडील

अग अग नदीबाई घोळ तुज्या पान्याचा

सारूनी ग अल्याड दे माजी घागर

अग अग नदीबाई तूं माजी माऊली

दे माजी चुंबळ ग सांजते सावली

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP