TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २|
नदीबाई माय माझी डोंगरा...

बालगीत - नदीबाई माय माझी डोंगरा...

पाण्यात खेळायला आणि पावसात भिजायला न आवडणारं मूल कुणीच पाहिलं नसेल.


नदीमाय

नदीबाई माय माझी

डोंगरात घर

लेकरांच्या मायेपोटी

येते भूमीवर ॥

नदीबाई आई माझी

निळे निळे पाणी

मंद लहरीत गाते

ममतेची गाणी ॥

नदीमाय जळ सार्‍या

तान्हेल्यांना देई

कोणी असो कसा असो

भेदभाव नाही ॥

शेतमळे मायेमुळे

येती बहरास

थाळीमध्ये माझ्या भाजी-

भाकरीचा घास ॥

श्रावणात आषाढात

येतो तिला पूर

पुढच्यांच्या भल्यासाठी

जाई दूर दूर ॥

माय सांगे, थांबू नका

पुढे पुढे चला ॥

थांबत्याला पराजय

चालत्याला जय ॥

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

Last Updated : 2007-12-23T23:53:20.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नांवानें खडे घांसणें-फोडणें

  • एखाद्याची खूप निंदा करणें 
  • एखाद्याबद्दल तक्रार करणें 
  • दूषण देणें. ‘आईंना जर काही सांगेल म्‍हटले तर त्‍या माझ्या नांवाने खडे फोडतील.’-रंगराव. 
RANDOM WORD

Did you know?

जननशांतीचे महत्व स्पष्ट करा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.