बडबडगीत - तुरा नाचवित डोक्यावरती ...
मुलांना शब्दांचा अर्थ कळ्ण्यापूर्वीच बडबडगीतांच्या स्वरांची भाषा समजू लागते.
कोंबडा
तुरा नाचवित डोक्यावरती
ऐट मिरवितो भारी
लाल, काळसर, शुभ्र पांढरा
चाल जरासी न्यारी
पहाटचा हा आरवताना
उठती सारे लोक
कुकुच कू ची ओरड करतो
हाच कोबडा एक
Translation - भाषांतर
N/A
References :
कवी - कल्याण इनामदार
Last Updated :
2018-01-17T19:11:47.8100000