TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

फटका - उपदेशपर फटका २

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.


उपदेशपर फटका २

येउंदे वाचें नाम देवाचें अष्टौ प्रहरा शिव हर हर हर ॥धृ०॥

दे टाकुनि हे छंद वावुगे फंद विषयाची काय मजा ॥ हरिनामाची लावी ध्वजा ॥

असार हा संसार त्यजा ॥ तमोगुणाला देच रजा ॥ रजसत्वाची करी पुजा ॥

क्षमा शांति मनिं धरीत जा । भगवीं वस्त्रें करी पोटभर भिक्षा मागें घर घर घर ॥येउंदे० ॥१॥

परोपकारा शरीर झिजवावें जैसा मैलागिरी चंदन ॥ कर सज्जन चरणीं वंदन ॥

सा शत्रूंचें करि कंदन ॥ गृहवैभव वाजी स्यंदन ॥ अशाश्वती ह्या हो धुंदन ॥

आठवी मनीं दशरथनंदन ॥ अनंतफंदी ह्मणे घालीं विठ्‌ठला गरके गर गर गर ॥ येउंदे० ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-24T21:25:06.3330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुणब्‍याची बेटी गव्हाची रोटी, मळल्‍यानें तिला चव येती

  • ज्‍या प्रमाणें कणिक चांगली मळल्‍याशिवाय तिची पोळी चांगली होत नाही, त्‍याप्रमाणें कुणब्‍याची मुलगी चांगली धाकात ठेवल्‍याशिवाय नीट वागत नाही. तु०-इक्षुदंडास्‍तिलाः शूद्राः कामिनी हेममेदिनी। दधिचंदनतांबूले मर्दनं गुण वर्धनम्‌।।-सुर १६०.३२७. 
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site