केकावली - प्रसंग २

केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.


(पापक्षालनार्थ विनंति)

कळी करि सुनिर्मळी परम उग्र दावा नळी;

तयांत अविशुद्ध मी, शलभ जेवि दावानळी; ।

व्रणार्तपशुच्या शिरावरि वनी उभे काकसे,

स्मरादि रिपु मन्मनी; अहि न काळ भेका कसे ? ॥२१॥

तरेन तुमच्या बळे भवमहानदी, नाविका !

तुम्हीच मग आतरास्तव मला सुदीना विका ।

असे विदित वासही मज सदाश्रमींचा; करा

दया, गुण पहा; सवे मज सदा श्रमी चाकरा ॥२२॥

धना, परिजना, घरी तुमचिया उणे कायसे ?

न लाभ मणिहेमभूपतिस जोडिल्या आयसे ।

परि प्रभुहि संगही उकल वस्तुला ठेविती;

गुणा न म्हणता उणा, अधिक, आदरे सेविती २३

दिसे म्हणुनि शाश्वतप्रकृतिरंक मी काय? हो !

प्रसन्न तुमचा बरे मजवरी प्रभो ! पाय हो ।

क्षण त्यजुनि इंदिराबृहदुरोजसंगा, धरा

शिरी पद, मिळो सखा सम सुशील गंगाधरा ॥२४॥

(प्रभुस्तुति)

'प्रभुस्तुति न ठाउकी, परि तिच्या महाकामुका

मला कृपण मारितो बहु सकाम हाका मुका' ।

म्हणा मनि असे; कसे प्रथम नीट ये लेकरा ?

हळुहळु पटु स्वये सुपथि लावियेले करा ॥२५॥

जनी तरि असे असे, शिशुहि जे मुखे वर्ण वी,

पिता पिउनि ते भुले, मधुरता सुखे वर्णवी;

मना जरि नये, गुरुक्तहि म्हणे कटु प्रायशा;

दयानिधि! तुम्हांपुढे जनकथा अशा कायशा ?॥२६॥

'अतर्क्य महिमा तुझा, गुनहि फार, बा ! हे,' विधी

श्रुतिजॅहि म्हणे सदा, स्तविल आमुची केवि धी ? ।

तरीजन यथामति स्तवुनि जाहले सन्मती;

स्तवार्थ तुझिया तुझ्या सम कवी कधी जन्मती ? ॥२७॥

निजस्तुति तुम्हां रुचे; स्तविति त्या वरे तर्पितां;

नमस्कृतिपरां बरे सधन सर्वही अर्पिता;

स्वभाव तुमचा असा विदित जाहला याचका;

करू स्तव जसा तसा; फळ नव्हे जना याच का? ॥२८॥

'तुम्ही परम चांगले, बहु समर्थ, दाते; असे

सुदीन जन मी, तुम्हा शरण आजि आलो.' असे ।

पुन्हाहि कथितो, बरे श्रवण हे करा यास्तव;

समक्ष किति आपुला सकललोकराया ! स्तव ? ॥२९॥

किती श्रवण झांकिति प्रभुहि; काय ते पोळती ?

पुसाल जरि कोण ते ? पदरजी तुझ्या लोळती ।

बरे तुजचि सोसवे स्तवन; कृत्तिवासा गरा

न पी, तरि कसे घडे ? हितकरा ! दयासागरा ! ॥३०॥

गमो मधुर हे विष स्तवन, सेवितां माजवी,

करी मलिन सद्यशोमुख, हलाहला लाजवी; ।

हरापरिस तूं बरा, प्रभुवरा ! सदा जो पिशी

असा रस समर्पि, त्या अमृत आपुले ओपिशी ॥३१॥

कवीश्वरमनःपयोनिधिसुतस्तुतीच्या पते !

भले न वरिति स्तुतिप्रति, न जोडिती पाप ते; ।

गळां पडति ज्यांचिया तव गुणैकदेशभ्रमे,

तिही तुजचि दाविता, भजति, बा ! तुला संभ्रमे ॥३२॥

(कवितासुतासमर्पण)

म्हणोनि कवितासुता तुज समर्पितो; साजरी

नसे बहुतशी गुणी कनकपीतवासा ! जरी, ।

तरी न इतरा वरी, हरि ! करी इला किंकरी;

मयूरहि निजात्मजाग्रहविमुक्त, जैसा करी ॥३३॥

स्मरोनि कृतमंतुला, न कवितावधूस्वीकृती

कराल, तरि आयका प्रभु ! खराच मी दुष्कृती; ।

नमस्कृतिपुरःसर स्वकृति अर्पितो आजि, ती

दिली रविसखे तुह्मा जशि नमोनि सात्राजिती ॥३४॥

'पिता खळ, परंतु ती गुणवती सती चांगली;

म्हणोनि तुज आपुल्या भजनि लावणे लागली; ।

म्हणाल, तरि तत्सुखा कशि, ? तुम्हांसवे भांडगा

अहर्निशिहि भांडला त्रिणव रात्र जो दांडगा ॥३५॥

तिलाहि बरवी म्हणा, उचित होय; तोषाकरे

असेल सजली यथारुचि तयी स्वयोषा करे, ।

जशी पदरजे शिला; परि असे न हे शापिली

धवे, हरिमनोहराकृति सती अघे व्यापिली ॥३६॥

भले स्मरण जाहले समयि, कंसदासी करे

कशी उजरली समुज्वलदयासुधासी करे ? ।

तुम्हां स्वरिपुची तशी बटिक आवडे, मत्कृती

नको, न सजवे, असा बहुत काय मी दुष्कृती ? ॥३७॥

जशी पृथुकतंदुलप्रसृति आप्तकामा तशी

रुचो कृति; सभाग्य तू सुनय आप्त का मातशी ? ।

कण्या विदुरमंदिरी म्हणति साधु आखादिल्या;

खरे जरि, कशा तुज प्रभुसि आपुल्या स्वा दिल्या ? ॥३८॥

जिणे रस पहावया प्रशिथिली रदी चाविली,

सुवासहि शबरी तशी बदरिकापळे दे जुनी,

कथा अशि असो, पहा स्वचरिते तुम्ही मेजुनी. ॥३९॥

(शरणागतांविषयी प्रभूचे कारुण्य)

प्रभो ! शरण आलियावरि न व्हां कधी वांकडे,

म्हणोनि इतुकेचि हे स्वहितकृत्य जीवांकडे ।

प्रसाद करितां नसे पळ विलंब बापा ! खरे,

घनांबु न पडे मुखी उघडिल्याविना पांखरे ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP