वरुणस्थापना व पूजा

दिपावली म्हणजे दीपोत्सव हा उत्सव साजरा करुन भोवतालचा अंधार नाहीसा करणे आणि प्रकाशाच्या वाटेने जाणे.


वरुणस्थापना व पूजा

श्रीलक्ष्मीपूजनासाठी कलशाची स्थापना करावयाची असते. प्रथम हात जोडून भूमीची प्रार्थना करावी.

ॐ भूर्भुवःस्वः । पृथिवीं नमस्करोमि ।

ॐ वरुणाय नमः । कलशे शुद्धोदकं क्षिपामि ।

(नंतर पसाभर तांदूळ केळीच्या पानावर किंवा पाटावर पसरावेत, त्यावर पाण्याने अर्धा भरलेला कलश ठेवावा. कलशाची स्थापना करताना असे म्हणावे.) -

ॐ वरुणाय नमः । कलशमध्ये वरुणमावाहयामि । गंधपुष्प समर्पयामि ।

(कलशाला बाहेरून तीन बोटे उभे गंध लावावे व फूल चिकटवावे.) -

ॐ वरुणाय नमः । आम्रपल्लवं समर्पयामि ।

(कलशावर आंब्याचा टहाळा, पाने उताणी ठेवून ती चारी बाजूस कलशावर बसतील अशा प्रकारे, ठेवावा.) -

ॐ वरुणाय नमः । दूर्वांकुरान् समर्पयामि ।

(कलशात दोन दूर्वा घालाव्यात.) -

ॐ वरुणाय नमः । पूगीफले समर्पयामि ।

(कलशात दोन सुपार्‍या घालाव्यात.)

ॐ वरुणाय नमः । यथाशक्ति सुवर्णरत्‍नादि-द्रव्यं समर्पयामि ।

(कलशात सोने, चांदीची नाणी, रत्‍न यथाशक्ती घालावे.) -

ॐ वरुणाय नमः । पुष्पं तुलसीदलमक्षतान् च समर्पयामि ।

( कलशात फूल, तुळशीचे पान व थोड्या अक्षता घालाव्यात. )

ॐ वरुणाय नमः । पूर्णपात्रं स्थापयामि ।

( कलशावर ताम्हन किंवा धातूचे सुंदर तबक ठेवावे. त्यात पसाभर तांदूळ पसरावेत. तांदळांवर कुंकवाने स्वस्तिक काढावे. त्यावर एक नारळ ठेवावा.) -

वरुणाला आवाहन

ॐ वरुणाय नमः । अस्मिन् कलशे वरुणं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकमावाहयामि ।

(कलशाला दोन्ही हात लावावेत.) -

ॐ वरुणाय नमः । सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।

(ताम्हनावरच गंधाक्षता व फूल अर्पण करावे.) -

कलश प्रार्थना - (हात जोडून पुढील श्लोक म्हणावेत.) -

देवदानवसंवादे मथ्यमाने महोदधौ ।

उत्पन्नोऽसि तदा कुंभ विधृतो विष्णुना स्वयम् ॥१॥

त्वत्तोये सर्वतीर्थानि देवाः सर्वे त्वयि स्थिताः ।

त्वयि तिष्ठन्ति भूतानि त्वयि प्राणाः प्रतिष्ठिताः ॥२॥

शिवः स्वयं त्वमेवासि विष्णुस्त्वं च प्रजापतिः ।

आदित्य वसवो रुद्रा विश्वेदेवा सपैतृकाः ॥३॥

त्वयि तिष्ठ्नति सर्वेऽपि यतः कामफलप्रदाः ।

त्वत्प्रसादादिमां पूजां कर्तुमीहे जलोद्भव ॥४॥

सान्निध्यं कुरु मे देव प्रसन्नो भव सर्वदा ॥

ॐ वरुणाय नमः । वरुणं प्रार्थये ।

(कलशात वरुणदेवता स्थानापन्न झाली आहे.)

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP