TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

बुलबुल

कवी 'बी' हे कवींचे कवी आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या कवितेत काठोकाठ भरलेले आहे.


बुलबुल

निबिड तिमिर वर नभी संचरे

तळी उष्ण निश्वसती वारे,

सरणांचे भोवती निखारे,

स्थली या देख- एकटाच पिंपळ एक

चिरव्यथित तरुजीवज्योति

खिन्न तेज वितरिते सभोती,

जीर्ण विरल तत्‌पर्णावरती

दुःख निर्वाण-उमटवी ठसा निज पूर्ण !

उपेक्षिलेली पहिली प्रीति

रम्योदास तसे एकान्ती

एकस्थल या रौद्र प्रान्ती

तरीहि आहे-दरवळूनि परिमळ वाहे.

पांडुर मृदु लावण्यद्युतिजल

स्थलपरिसर करि ढाळुनि निर्मळ

जातिलता कुणि एकच केवळ

अदय नियतीने-लाविली तिथे स्वकराने

देह तिचा कृश फिकट पांढरा

पाहुनि होई जीव घाबरा,

वाटे सुटता उडविल वारा

पर्णसंभारा-वर भिरभिर सैरावैरा.

लागो वारा पाउस पाणी,

कुणी धृष्टकर टाको चुरडुनि,

तरि वरि भर ये वोसंडोनी

विकासश्रीला-ती अखंड मंडित बाला.

करुणामय स्वर्ललना कोणी

दिव्याश्रूंचे शिंपुनि पाणी

खचित करी संगोपन जपुनी

असे चित्ताला-वाटते बघुन वेलीला.

मृदुल धवल नव कुसुमशालिनी

व्रतस्थेस जरि बघतिल नयनी

सहजोद्‌गारे वदतिल रमणी-

"अगाइग, नवल- ही जाई नच येथील !

"वसंत न करी चैत्रशिंपणे,

"डोलत रविकर न करी येणे,

"झुरे न अंतरि तरिही तेणे

"अगाइग, नवल- ही जाई न या महिवरिल !

"साहुनि राहे कडक हिवाळा

"कुंजाचा आधार न इजला

"तरी भोगकल्लोळ सोहळा

"फुलांचा भोगी- ही जाई नवल जोगी !"

आश्चर्य एक की कुणि अलबेला

पक्षी पडता नच दृष्टीला

येई तत्सन्निध रात्र्ला

प्रेमघायाळ-भटकोनि रानोमाळ !

चाले त्याचा दीर्घ निशेभर

गूढ भावमय मृदु गीतस्वर

जणु निर्जर वीणाझंकार

की बुलबुल बोले-वनराई मोहुनि डोले !

ह्रदयि खवळला शोकसागर

कंठातुनि तरि निघती सुस्वर

येती ऐकुनि होती ते नर

स्वच्छंदी फंदी - नादाच्या ब्रह्मानंदी !

पक्षी आपण, प्रीती केली

भासे त्यांना वाया गेली

नयनाश्रू ओघळती खाली

चाखिती धुंद-दुःखाचा परमानंद !

उदास रजनी नच संपावी,

जागर दुःखे ही सोसावी,

चित्त तयांचे असेचि भावी

विलक्षण भारी-विरुताची जादूगारी

दिशा फाकती, तेज उगवते,

प्रभात होते, गीत थांबते;

त्यासरसे ते दृश्य वितळते

तेजबंबाळी-रम्याची होते होळी !

उत्कटतेने ह्रदय फोडिती

ते स्वैर स्वर रूपा येती;

कोणी म्हणती त्यात उमटती

स्पष्ट साचार-रमणीचे नामोच्चार !

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - बी


Last Updated : 2008-01-11T21:28:25.2630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अळुमाळ

  • वि. क्रिवि . 
  • ( काव्य ) थोडें थोडें ; अल्प ; किंचित . मुख माखिलेंसें अळुमळु - कृष्णाची भुपाळी १८ . मजही दर्शन दिधलें अळुमाळ । घातला कवळ मुखामाजीं . - ब ३० . - अमृ २ . ३० . हा आतपुही अळुमाळु । - ज्ञा ६ . १७५ . ( विशेषत : कृत्याविषयीं ) क्षणभर ; लहानसें ; कमी . अळुमाळु प्रकाश करी । तेतुलेंनेच उभारुं धरी । म्हणुनि आतां पुसों अळुमाळुसे । मग करुं दैवा ठाकें जैसें 
  • परिपूर्ण ; ओतप्रोत ; विस्तारानें . हाडांच्या अळुमाळु डोलति गळां माळा , कटीं कांबळा । - आता १२ . अंगीं तारुण्य प्रबळ । शृंगार केला अळुमाळ । - कथा १ . ६ . ५३ . 
  • हळु हळु . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

देव्हार्‍यात कोणत्या दिशेला दिव्याची वात असावी, त्याचे फायदे तोटे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.