कन्यादान

विवाह संस्कार सोळा संस्कारांपैकी एक आहे. विवाह फक्त शारीरिक संबंध नसून, वंशवृद्धी हे प्रमुख कारण आहे.

The Vivaha is the most Important Samskar of all the Hindu rituals, for continuing their Vansh.


कन्यादान

नंतर कन्यापित्याने कन्येच्या अंगावर आपल्या सामर्थ्यानुसार द्यावयाचे असतील तितके वस्त्रालंकार घालून खाली सांगितलेल्या विधीने कन्यादान करावे.

१.

प्रास्ताविक

अनृक्षरा ऋजवः सन्तु पन्थायेभिः सखायो यान्ति नो वरेयम्‌ ।

समर्यमा सं भगो नो निनीयात्‍ सं जास्पत्यं सुयममस्तु देवाः ॥१॥

मंत्र म्हणून उपाध्यायाने वरास पूर्वाभिमुख, आणि वधूस पश्चिमाभिमुख असे एकमेकांकडे तोंड करून उभे करावे. कन्यापित्याने स्वपत्‍नीसह वधूवरांच्या दक्षिणेस उत्तराभिमुख बसावे.

२.

प्रारंभिक विधी

तदनंतर वधूपित्याने आचमन, प्राणायाम आणि देशकालादिकांचे स्मरण करावे.

३.

संकल्प

तदनंतर वधूपित्याने ओंजळीत दर्भ, अक्षता आणि जल धरून

अमुकप्रवरान्वितो ऽमुकगोरोऽमुकशर्माहं मम समस्तपितृणां निरतिशयसानंदब्रह्मलोकावाप्त्यादि-कन्यादान - कल्पोक्तफलावाप्तये अनेन वरेणास्यां उत्पादयिष्यमाणसंतत्या द्वादशावरान्‌ द्वादशापरान्‌ च पुरुषान्‌ पवित्रीकर्तुमात्मनश्च श्रीलक्ष्मीनारायणप्रीतये ब्राह्मविवाहविधिना कन्यादानमहं करिष्ये " ॥

हा कन्यादानाचा संकल्प मंत्र म्हणावा.

४.

कन्यादान विधी

तदनंतर वधूपित्याने पत्‍नीसह उभे राहून कन्येच्या स्कंधाला स्पर्श करावा, आणि

कन्यां कनकसंपन्न्न कनकाभरणैर्युताम्‌ ।

दास्यामि विष्णवे तुभ्यं ब्रह्मलोकजिगीषया ॥३॥

विश्वंभरः सर्वभूतः साक्षिण्यः सर्वदेवताः ।

इमां कन्यां प्रदास्यामि पितृणां तारणाय च ॥४॥

ने प्रारंभ होणारे दोन मंत्र म्हणावेत

नंतर ’कास्यपात्रा’ वर (=काशाचे भांडे) सर्वात खाली वधूची ओंजळ, त्यावर वराची ओंजळ, आणि सर्वात वर वरपित्याने आपली ओंजळ धरावी. कन्यादानासाठी उपाध्यायाने मंत्रून ठेवलेले उदकपात्र वरपित्याच्या उजव्या बाजूस बसलेल्या वरमातेच्या हाती द्यावे. तदनंतर वरपित्याने स्वपत्‍नीस पात्रातील जल स्वतःच्या ओंजळीत बारीक धारेने सतत घालावयास सांगावे. वरपित्याने स्वतःच्या ओंजळीतील पाणी खाली धरलेल्या वराच्या ओंजळीच्या उजव्या हातावर सोडून, नंतर कन्येच्या ओंजळीतून कास्यपात्रात निथळावे.

वधूपित्याने

कन्या तारयतु, पुण्यं वर्धताम्‌ । शिवा आपः सन्तु । सौमनस्यमस्तु । अक्षतं चारिष्टं चास्तु । दीर्घमायुः श्रेयः शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु । यच्छ्रेयस्तदस्तु । यत्पापं तत्प्रतिहतमस्तु । पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु । स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तु ।ऋद्धिं भवन्तो ब्रुवन्तु । श्रीरस्त्विति भवन्तो ब्रुवन्तु ॥५॥

आदि मंत्र म्हणावेत.

तदनंतर वधूपित्याने

अमुक प्रवरान्वितामुकगोत्रोऽमुकशर्माहं, मम समस्तपितृणां निरतिशयसानंदब्रह्मलोकावाप्त्यादिकन्यादानकल्पोक्तफलावाप्तये, अनेन वरेणास्यां कन्यायामुत्पादयिष्यमाणसंतत्या द्वादशावरान्‌ द्वादशापरान्‌ पुरुषान्‌ च पवित्रीकतुमात्मनश्च श्रीलक्ष्मीनारायणप्रीतये, अमुकप्रवरोपेतामुकगोत्रोत्पन्नायामुकप्रपौत्रायामुकपुत्राय, मुकगोत्रोत्पनाममुकप्रपौत्रीममुकपौत्रीममुकनाम्नी, कन्यां श्रीरूपिणी, प्रजापतिदैवत्यां प्रजोत्पादनार्थं तुभ्यमहं संप्रददे न मम

हा संकल्प म्हणून, प्रस्तुत कन्यादानाच्या योगे प्रजापति तृप्त होवो, असे म्हणावे व आपण माझ्या कन्येचा स्वीकार करावा, अशी वराची प्रार्थना करावी. त्यानंतर वराच्या हातामध्ये दर्भ आणि अक्षतायुक्त जल टाकून प्रजापतीचे मनातल्या मनात स्मरण करावे. असा विधी एकून तीनवेळा करावा.

वधूपित्याच्या प्रार्थनेस वराने

’ॐ स्वस्ति’

असे संमतीदर्शक तीनवेळा उच्चारावे.

नंतर वराने वधूच्या उजव्या खांद्याला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करून

’क इदं कस्मा अदात्कामः । कामायादात्कामो दाता । कामः प्रतिग्रहीता । काम समुद्रमाविश । कामेन त्वा प्रतिगृह्णामि । कामैतत्ते वृष्टिरसि । द्यौस्त्वा ददातु । पृथिवी प्रतिगृह्णातु ॥

हा मंत्र म्हणावा, आणि तदनंतर ’धर्म आणि प्रजा यांच्या सिद्धयर्थं या कन्येचा मी स्वीकार करतो’,

(धर्मप्रजासिद्ध्यर्थं कन्यां प्रतिगृह्णामि)

असे अभिवचन द्यावे.

नंतर वधूपित्याने

गौरी कन्यामिमां विप्र यथाशक्तिविभूषिताम्‌ ।

गोत्राय शर्मणे तुभ्यं दत्ता विप्र समाश्रय ।

कन्ये ममाग्रतो भूयाः कन्ये मे देवि पार्श्वयोः ।

कन्ये मे पृष्ठतो भूयास्त्वद्दानान्मोक्षमाप्नुयाम्‌ ॥

मम वंशकुले जाता पालिताबहु वत्सरान्‌ ।

तुभ्यं विप्रा मया दत्ता पुत्रपौत्रप्रवर्धिनी ॥

धर्मेचार्थे च कामे च नातिचरितव्या त्वयेयम्‌ ॥८॥

हा श्लोक पठण करून धर्म,अर्थ, काम या तीन पुरुषार्थांच्या सिद्ध्यर्थं ही कन्या तुम्हास दिली आहे. धर्म, अर्थ, काम पुरुषार्थासमयी तिचे उलंघन करू नये, असे वरास सांगावे.

त्यावर वराने ’उल्लंघन करणार नाही’ असे अभिवचन द्यावे, नंतर संपूर्ण कन्यादानफल मिळावे, यासाठी वधूपित्याने वरास सुर्वर्णादि यथाशक्ती द्यावे.

तदनंतर वराने वधूच्या उजव्या कुशीला स्पर्श करून

ॐ यत्कक्षीवांसंवननं मंत्रस्य विश्वेदेवा देवता । अनुष्टुप छन्दः । वधूकुक्ष्यभिमर्शने विनियोगः

मंत्र म्हणावा.पुत्रो अंगिरसा भवेत्‌ ।

तेन नोद्य विश्वेदेवाः संप्रियां समजीजनन्‌

नंतर पुरोहिताने पूर्वी मंत्रून ठेवलेले उदक एका कास्यपात्रात ओतून घेऊन

ॐ अनाधृष्टमस्यानाधृष्यं देवानामोजो अभिशास्तिपाः ।

अनभिशस्त्यंजसा सत्यमुपगेषांस्वितेः ॥

मंत्राने ते मंत्रवावे.

तदनंतर ऋग्वेदातील

आ नः प्रजां जनयतु प्रजापतिराजरसाय समनक्त्वर्यमा ।

अदुर्मङ्गलीः पतिलोकमा विश शं नो भव द्विपदे शं चतुष्पदे ॥

ॐ समुद्रज्येष्ठाः सलिलस्य मध्यात्‌ पुनाना यन्त्यनिविशमानाः ।

इन्द्रो या वज्री वृषभो रराद ता आपो देवीरिह मामवन्तु ॥

ॐ आपो हि ष्ठो मयोभुवस्ता न ऊर्जे दधातन ।

महे रणाय चक्षसे

देवस्य त्वा सवितुःप्रसवेऽश्‍विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् ॥

आदि मंत्रांनी वधुवरांना सुवर्ण, दर्भ, दूर्वा, आणि औदुंबरवृक्षाची ताजी कोवळी पाने यांचा अभिषेक करावा.

तदनंतर दुपदरी पांढरे सूत दुधात भिजवून, त्याचे चार अथवा पाच फेरे एकमेकांकडे तोंड करून बसलेल्या वधूवरांच्या कंठाभोवती आणि कमरेभोवती गुंडाळावेत. हे फेरे गुंडाळीत असता

ॐ परि त्वा गिर्वणी गिर इमा भवन्तु विश्वतः ।

वृद्धायुमनु वृद्धयो जुष्टा भवन्तु जुष्टयः ॥

हा मंत्र म्हणावा.

उपरोक्त परिवेष्टनानंतर कंठानजिकचे सूत खाली जमिनीवर ठेवून जमिनीवरील सूत्र वर उचलावे. त्या सूत्रास कुंकुम लावून पीळ घालावा, आणि त्या सूत्रात हळकुंड आणि 'ऊर्णा' (=लोकर) बांधून ते सूत्र वराने वधूच्या डाव्या मनगटास

नीललोहितं भवति कृत्यासक्तिर्व्यज्यते ।

एधन्ते अस्या ज्ञातयः पतिर्बन्धेषु बध्यते ॥

हा मंत्र म्हणून बांधावे.

यानंतर कटीच्या सूत्राबाबत पूर्वी सांगितलेला त्याप्रमाणेच विधी करून, वधूने ते सूत्र

नीललोहितं भवति कृत्यासक्तिर्व्यज्यते ।

एधन्ते अस्या ज्ञातयः पतिर्बन्धेषु बध्यते ॥

हा मंत्र म्हणून वराच्या उजव्या मनगटास बांधावे.

येथे कन्यादान विधी संपला

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP