TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
महागणपती पूजन

महागणपती पूजन

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


महागणपती पूजन

विधी - ५

महागणपती पूजनम्

पुण्याहवाचनाच्या पाटावरील तांदुळाच्या ढिगावर ठेवलेल्या सुपारीस महागणपती समजून त्याची पूजा करावी. आवहनाचा मंत्र

हे हेरंब त्वमेह्येहि अंबिका त्र्यंबकात्मज । सिद्धि बुद्धि युतत्र्यक्ष सर्व लौकेक पूजित । श्री महागणपतये नमः । ध्यायामि । (गणपतीस नमस्कार करावा.)

श्री महागणपतये नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि ।

एक पळी पाणी गणपतीस घालावे.

श्री महागणपतये नमः । अर्घ्यं समर्पयामि ।

गंध अक्षता फूल मिश्रित पाणी गणपतीस घालावे.

श्री महागणपतये नमः । आचमनीयं समर्पयामि ।

एक पळी पाणी गणपतीस घालावे.

श्री महागणपतये नमः । स्नानीयं समर्पयामि ।

एक पळी पाणी गणपतीस घालावे.

श्री महागणपतये नमः । सुप्रतिष्ठितमस्तु । श्री महागणपतये नमः । वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं/ कार्पास वस्त्रं । अक्षतां

यापैकी जे असेल ते

सर्मपयामि । श्री महागणपतये नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । गंध लावावे. श्री महागणपतये नमः ।

अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि । श्री महागणपतये नमः । ऋद्धि सिद्धिभ्यां नमः । हरिद्रां कुंकुमम् सौभाग्य द्रव्यं समर्पयामि ।

यजमान पत्‍नीने गणपतीस हळद-कुंकू वाहावे.

श्री महागणपतये नमः । सिंदुरं नानापरिमलं द्रव्याणि च समर्पयामि ।

गणपतीस शेंदूर गुलाल वगैरे वाहावे.

श्री महागणपतये नमः । ऋतुकालोद्भव पुष्पाणि दूर्वांकुरांश्च समर्पयामि । श्री महागणपतये नमः ।

धूपं समर्पयामि । श्री महागणपतये नमः । दीपं समर्पयामि । श्री महागणपतये नमः । नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि ।

गणपतीस उदबत्ती, नीरांजन ओवाळून गूळ खोबर्‍याचा नैवेद्य दाखवावा.

ॐ प्राणाय नमः। अपानाय नमः। व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः ।

ब्रह्मणे नमः । नैवेद्यमध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामि

एक पळी पाणी सोडावे

पुनर्नैवेद्यं ।

औं प्राणाय नमः। अपानाय नमः। व्यानाय नमः । उदानाय नमः । समानाय नमः । ब्रह्मणे नमः ।

गूळखोबर्‍याभोवती दोन वेळा पाणी सोडावे. त्यानंतर हातावरून तीन वेळा पाणी सोडावे.

उत्तरापोशनं समर्पयामि । हस्त प्रक्षालनं समर्पयामि । मुख प्रक्षालनं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।

फुलाला गंध लावून ते फूल वाहावे.

मुखवासार्थे पूगीफल तांबुलं सुवर्णनिश्क्रय दक्षिणां समर्पयामि ।

एका विड्यावर पाणी सोडावे.

नमस्करोमि ।

नमस्कार करावा.

श्री महागणपतये नमः । मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि ।

एक फूल वाहावे. यानंतर गणपतीची हात जोडून प्रार्थना करावी ती अशी -

नमस्ते ब्रह्म रूपाय विष्णुरूपाय ते नमः । नमस्ते रुद्ररूपाय करिरूपाय ते नमः । कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि ।

विघ्नानि नाशमायांतु सर्वाणि सुरनायक । श्री महागणपतये नमः । प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि ।

नमस्कार करावा.

अनेन कृतपूजनेन विघ्नहर्ता महागणपतिः प्रीयतां ।

हातावरून पाणी सोडावे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-11-26T04:42:10.5070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

coleoptile

  • पु. Bot. (also coleoptilum) (pl. coleoptiles also coleoptial) (the first leaf of a monocotyledon forming a protective sheath about the plumule) प्रांकुर चोल 
  • आदिकोरकवेष्ट 
  • आदिकोरकवेष्ट 
  • बहुतेक सर्व गवतांचे बी रुजताना प्रथम फुटणारे अंकुराचे (आदिकोरकाचे) संरक्षक आवरण 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.