TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

भक्तिभाव

’कुसुमाग्रज’ या टोपणनावाने श्री. विष्णू वामन शिरवाडकर (१९१२-१९९९) यांनी मराठीत लेखन केले.


भक्तिभाव

क्षण एक तरी तू येशिल का ?

चरणाच्या स्पर्शे तव मंगल

पावन घर मम करशिल का ?

मिरवणूक ये वाजत गाजत

नृपापरी तू तीत विराजत

दुमदुमती जयनाद तुझे नित

वैभव ते विसरून घडीभर

स्वागत हे मम घेशिल का ?

जीवनसुम तुजसाठी उमले

फुलले, मोहरले, परिमळले

भावपराग उरी थरथरले

लवूनिया लतिकेवर खाली

भक्तिभाव हा बघशिल का ?

अथांग महती जाणत अन्तर

अलंकारले श्रमून मंदिर

अवघे भवती निर्मळ सुन्दर

जाणुनिया मम अथांग प्रीती

ह्रदयाशी मज धरशिल का ?

क्षण एक तरी तू येशिल का ?

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - कुसुमाग्रज

ठिकाण - नाशिक

सन - १९३८

Last Updated : 2012-10-11T13:09:51.3600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तोफ

  • स्त्री. १ आंत दारु भरुन बार काढण्याचे , गोळे फेकण्याचे यंत्र . ( क्रि० मारणे ). [ तुर्की तोप ] ( वाप्र . ) तोफेच्या तोंडी देणे - १ ( एखाद्यास ) संकटाच्या , कठिण परिस्थितीच्या तोंडी देणे . २ ( एखाद्या कृत्याचे ) दुष्परिणाम भोगण्यास पुढे करणे . सामाशब्द - तोफखाना - पु . १ तोफांचा समुदाय . २ तोफा , दारुगोळा इ० युद्धसामग्री ठेवण्याचे ठिकाण . [ तोफ + खाना = घर , ठिकाण ] तोफची - तोपची पहा . तोफजी - स्त्री . गोलंदाजी . बर्कदाजी व तोफजी फिरंगी याची निस्सीम म्हणावी तैसी . - ब्रप ७७ . 
  • f  A cannon or great gun. 
RANDOM WORD

Did you know?

कोणता शब्द योग्य आहे ? नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.