TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

संग्रह २६१ ते २८०

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


संग्रह २६१ ते २८०

२६१.

चांदीच्या ताटांत सोन्याची सरी,

x x x रावांचं नांव घेतें तुमच्या घरीं.

२६२.

शालूचा पदर अडकला तोडयांत,

x x x रावांचं घेतें तुमच्या वाडयांत.

२६३.

महादेवाच्या पिंडीला चौकोनी आरसे,

x x x राव बसले जेवायला, मी वाढतें अनारसे.

२६४.

जटाधारी शंकराची गौरवर्ण कांति,

x x x राव सुखी असोत हीच देवाजवळ विनंति.

२६५.

संगीत नाटक सुभद्राहरण,

x x x रावांच्या नांवाचं आज काय कारण ?

२६६.

दाट मणीमंगळसूत्र मोतीं लावा आणिक, आत्याबाईंच्या पोटीं

x x x राव जन्मले माणिक.

२६७.

आयाबाया म्हणतात, नांव घे नांव घे, लाजूं कशी नांव घ्याया ? मी तर

x x x रावांची जाया.

२६८.

हातामध्यें गोठ पाटल्या, सरी आहे करायची,

x x x रावांचं नांव घ्यायला मागें नाहीं सरायची.

२६९.

कृष्णाबाई नदी मध्यभागीं कमान,

x x x रावांची मूर्ती कृष्णदेवासमान.

२७०.

चांदीच्या भांडयाला नांवाची खूण,

x x x रावांचं नांव घेतें मोहित्यांची सून.

२७१.

चांदीच्या ताटांत दहिभाताचा काला,

x x x रावांचं नांव घ्यायला आजपासून आरंभ केला.

२७२.

चांदीच्या तबकांत मोत्यांचे गरे,

x x x राव दिसतात बरे, पण वागतील तेव्हां खरे.

२७३.

चांदीच्या वाटींत डाळिंबाचे दाणे,

x x x मोहित्यांच्या घराण्यांत शहाणे.

२७४.

तिपेडी वेणींत मोती गुंफले एक लाख,

x x x रावांचं नांव घेतें आशीर्वाद द्या लाख लाख.

२७५.

सोन्याची पाटली हाताला दाटली,

x x x रावांचं नांव घेतांना खुशाली वाटली.

२७६.

मोत्याचा करंडा, चांदी सोन्याचं झांकण,

x x x रावांचं नांव घेतें न् सोडतें कंकण.

२७७.

मागें घालते पाटल्या, मधें घालतें बिल्वर, पुढें घालते छंद,

x x x रावांचं नांव घेतें कल्ला करा बंद.

२७८.

शिणगारलेला हत्ती मांडवापुढें झुले,

x x x रावांच्या हातांत सुवासिक फुलें.

२७९.

भरल्या पंगतींत रांगोळी काढतें ठिपक्यांची,

x x x रावांच्या भोंवती पंगत पडली मित्रांची.

२८०.

शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता,

x x x रावांची मी आवडती कांता.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T21:02:52.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

cold receptor

  • शीत ग्राही 
RANDOM WORD

Did you know?

Are we transliterating everything? Do we copy that from some other websites?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site