संग्रह ४१ ते ६०

लहान लहान पण यमकबद्ध अशा वाक्यरचनेतून स्त्रिया आपल्या पतीचे नाव कुशलतेने गुंफून घेतात, त्या प्रकाराला उखाणा म्हणतात.


४१.

कांचेच्या ग्लासांत गुलाबी सरबत

x x x रावांच्या वाचून मला नाहीं करमत.

४२.

मसाल्याची सुपारी चांदीच्या वाटींत

x x x रावांना ठेवीन म्हणतें मी माझ्याच मुठींत.

४३.

शुक्राची चांदणी उगवली ढगांत, जाऊ द्या मला घरीं

x x x राव आहेत रागांत भारी.

४४.

उगवला सूर्यंदेव, जगाचा राजा

x x x रावांचं नांव घेतें पहिला नंबर माझा.

४५.

सोन्याच्या कर्णफुलांना मोत्यांचे झुबे

x x x रावांची वाट पहात सारें गांव राहिलें उभें.

४६.

कांचेची तसबीर धक्क्यानें फुटली

x x x रावांच्या करतां मोटार बोदवडची सुटली.

४७.

साखरेची करंजी लाल झाली सपीटा सारणानें

x x x रावांचे नांव घेतें संक्राती कारणानें.

४८.

राजवरकी बांगडी मोल करी किंमतीनें

x x x रावांच्या राज्यांत दिवस जातो गंमतीनें.

४९.

वर्तमानपत्रांत लिहून आली वार्ता

x x x रावांचें नांव घेतें तुमच्या म्हणण्याकरितां.

५०.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्र होता ढगांत

x x x रावांची कीर्ती पसरली जगांत.

५१.

चतुर्थीच्या दिवशीं मी निवडतें दुर्वा

x x x रावांच्या जिवावर शालू नेसतें हिरवा.

५२.

पूजेच्या साहित्यांत उदबत्यांचा पुडा

x x x रावांच्या जिवावर भरतें हातभर चुडा.

५३.

काळ्या चंद्रकळेवर तार्‍यासारख्या टिकल्या

x x x रावांच्या मळयांत खूप तुरी पिकल्या

५४.

काळ्या चंद्रकळेवर नक्षत्रासारखे ठिपके

x x x रावांच्या हातांत गुलाबाचे झुबके.

५५.

गाईच्या शिंगाना लावला सोनेरी रंग,

x x x राव बसले कामाला कीं, होतात त्यांतच दंग.

५६

गाण्याच्या मैफलींत पेटीचा सूर,

x x x रावांच्या भेटीसाठी जनलोकांचा पूर.

५७.

आईन वाढवल , वडिलांनी पढवलं ,

x x x रावांची होतांच सोन्यानं मढवलं.

५८.

दारापुढं वृंदावन त्यांत तुळशीचं झाड,

x x x रावांच्या गुणापुढं दागिन्यांचा काय पाड.

५९.

करवतकांठी धोतर आणि डोक्याला पगडी

x x x रावांची स्वारी पहिलवानासारखी तगडी.

६०.

वैशाखाच्या महिन्यांत उन्हाळ्याचा जोर

x xx घराण्यात राव पुरुष थोर.

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP