TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|अनंत काणेकर|संग्रह १|
एकलेपणाची आग

एकलेपणाची आग

अनंत काणेकर यांच्या कवितेत, भावनेची उत्कटता, आणि तिचे प्रकटन होण्यासाठी अनुरूप अशी रससिद्ध भाषाशैली यांची एकजीव जुळणी झालेली आहे.


एकलेपणाची आग

एकलेपणाची आग लागली ह्रुदया ;

घनदाट दाटली विषण्णतेची छाया.

तडफडे जिवाचें पांखरु केविलवाणें,

होत ना सहन त्या एकलकोंडें जगणें !

जोडीस शोधितें उदात्त अपुल्यावाणी;

प्रतिशब्द जिवाचा न दिला अजुनी कोणी !

गुम्फीत कल्पनाजाला । गुंगणें,

गुरफटुनि त्यांत जीवाला । टाकणें,

रंगीत स्वप्नसृष्टीला । उठविणें ;

ही स्वप्नसृष्टि पटतसे जिवाला वेडया;

ही सुवर्णलंका दिपवित अवघी ह्रुदया !

परि इंद्रजाल हें जात जघीं विरुनीया,

एकलेपणाची आग लागते ह्रुदया !

Translation - भाषांतर
N/A

References :

कवी - अनंत काणेकर

दिनांक - १९ जानेवारी १९२५


Last Updated : 2012-10-11T13:07:57.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गरुडापुढें मशक

  • ज्‍यांची परस्‍परांशी तुलना होऊं शकत नाही अशा-एक अतिशय मोठी व दुसरी क्षुद्र अशा वस्‍तु समोरासमोर आणणें, त्‍यांची तुलना करणें. तु०-सूर्यापुढे काजवा. 
RANDOM WORD

Did you know?

जपाची संख्या १०८ का ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site