TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

पुनः पुनः यावें

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


पुनः पुनः यावें

धन्य झालों देवा केलें आगमन

जाहलें पावन घर माझें

भजनपूजन नामाचा गजर

लाजले निर्जर देखोनिया

दाही दिशां भरे आनंदीआनंद

आनंदाचा कंद घरीं आला

आणखी याहून स्वर्ग दुजा काय ?

जेथें तुझे पाय तोची स्वर्ग !

भाबड्या भावाची अज्ञानाची सेवा

गोड केली देवा दयावंता

आतां गमनाची वेळ ये जवळ

जीवा तळमळ लागलीसे

पुनः पुनः यावें घ्यावा समाचार

हेंच वारंवार विनवीं देवा !

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

अभंग

Last Updated : 2012-10-11T13:15:29.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ऐलीकडे

  • अलीकडचा , अलीकडील पहा . जेवीं वसंता ऐलीकडी । वृक्षासि होय पानझडी ॥ - एभा ३ . १५५ . नाणावें पैलाड येतां हि जीव । ऐलिकडे उठतां न्यावें घरा । - दावि १४८ . 
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.