TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

घर राहिलें दूर !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात.


घर राहिलें दूर !

उरला दिवस अल्प, घोडें थकुनि चूर,

पथ रानिं चधणींत, घर राहिलें दूर. ध्रु०

असशील घरिं आज तूं गे बघत वाट,

प्राण स्वनयनांत, पोटांत काहूर. १

मुद्रा तुझी म्लान डोळ्यापुढे येइ,

नाहीं मला पंख, ह्रदयांत हुरहूर. २

या निर्जनीं रानिं दे कोण मज साथ ?

माम् त्राहि जगदीश ! होई न निष्ठूर ! ३

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - किंकिणी

राग - भीमपलासी

ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर

दिनांक - ३ ऑक्टोअर १९३५


Last Updated : 2012-10-11T13:15:20.8770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अनैक्य

  • फरक ; भिन्नत्व ; एकत्वाभाव . 
  • एकी नसणें ; वैमनस्य ; बेबनाव ; बिघाड ; वांकडें . 
  • n  Diversity; disunion; discrepancy. 
  • द्वैत ; अर्थ , वचन किंवा संदर्थ , यामधील विरोध , तफावत . [ सं . ] 
RANDOM WORD

Did you know?

दत्तकपुत्र घेण्याविषयी कांही धर्मशास्त्रीय निर्णय आहेत काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.