मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
चरणिं तुझ्या मज देईं रे वास हरी !

चरणिं तुझ्या मज देईं रे वास हरी !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


चरणिं तुझ्या मज देईं रे, वास हरी. ध्रु०

चरणतळीं तव कमल विराजे,

तेंच करीं मज देवा रे, कल्पवरी. १

कुणा संतती, कुणा राज्य दे,

मजला हरि, ते देई रे, चरण परी. २

कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे,

मजला परि चरणाचा रे, दास करीं. ३

मी घालीं ना संकट तुजवरि,

केवळ मज चरणाचे रे, रजच करीं. ४

चिकटुनि राहिन सदा पदांला,

इतुकी मम पुरवावी रे, आस परी. ५

मिरविन वैभव हें त्रैलोक्यीं,

येइल तरि नृपतीला रे, काय सरी ? ६

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - चरणरज

राग - भैरवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - ४ जानेवारी १९२८

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP