TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
रुद्रास आवाहन

रुद्रास आवाहन

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


रुद्रास आवाहन

डुमडुमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,

शंख फुंक्त ये, येइ रुद्रा !

प्रलयघनभैरवा, करित कर्कश खा

क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ! ध्रु०

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,

खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,

मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका

खवळवीं चहुंकडे या समुद्रां ! १

पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,

ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,

मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,

झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ! २

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे

'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !

धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,

धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ! ३

पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले

दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,

बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले

दे जयांचें तयां वीरभद्रा ! ४

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - वीरभद्र

राग - शंकरा

ठिकाण - इंदूर

दिनांक - ३ डिसेंबर १९२०


Last Updated : 2012-10-11T13:14:16.8130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

इराखत

  • स्त्री. ( व . कों . ) विराकत . 
  • लघवी ; लघवी करणें ; लघवीस बसणें ( वर्‍हाडांत स्त्रियांना उद्देशून व इतर ठिकाणीं पुरुषांना उद्देशूनही योजतात ). ( क्रि० करणें ) 
  • ( ल . ) तुच्छ मानणें . मी त्या पैशांवर इराकत करतों . [ अर . इराकत ; तुल० सं . इरा = पाणी ; विराकत ; तुल० सं . वि + रिच = रिकामें होणें ] 
RANDOM WORD

Did you know?

केस काढण्यासंबंधी विशेष माहिती द्यावी.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.