TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह २|
कोठे शांति, तुझा निवास ?

कोठे शांति, तुझा निवास ?

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


कोठे शांति, तुझा निवास ?

कोठे शांति, तुझा निवास ? वसशी तूं प्रीति, कोठे ? सुखा,

कोठे मंगल धाम रे तव ? धरा कीं स्वर्ग पाताळ कीं ?

लोकीं अन्य निवास का ? पडतसे छायाच येथे निकी,

तार्‍यांचा पडतो प्रकाश धरणीभागीं तसें हेहि का ?

विद्युद्दीप, हिरे, विमान, अथवा तारा, सिनेमांतरीं

किंवा कांचन-कामिनींत वसतां ? तारुण्य-बाल्यांत कीं ?

देव्हार्‍यांत मनाचिया पहुडतां गंभीर निद्रासुखीं ?

धुंडूं मी कवणे स्थळीं ? कुणि सखा दावील का हो तरी ?

किंवा केवळ अर्थशून्य असती हे शब्दची पोकळ

जैसें सुंदर नील हें नभ दिसे, अस्तित्व नाहीं परी ?

शोधूं जा तरि दूर दूर पळती हीं चक्रवालापरी

किंवा ही मृगतृष्णिका फसविते भोळ्या जनां केवळ ?

चाले नित्य अकांडतांडव इथें शोधार्थ यांच्या फुका,

देवा, तूं निजलास का ? तुज दयामाया मुळीं नाहिं का ?

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

काव्य प्रकार - सुनीत

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण - प्रतापगड

दिनांक - ४ मार्च १९२०


Last Updated : 2012-10-11T13:13:59.4530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उपरसाळ

  • स्त्री. अनंतमूळ पहा . श्यामा ; इंडियन सार्सापरेला ; दुद्रोळी ; उपरसाळ ( चुकीनें ) आस्वली ; हिच्या दोन जाती आहेत - एक पांढरी व दुसरी काळी . वेल काळसर तांबूस रंगाचा असून पानें तरवारीच्या आकाराचीं , अर्धबोट रुंद व तीन अंगुळें लांब असतात . ही रक्तशोधक आहे . हिला उपटसुटी ; लहान कावळी ; शेत कावळी ; शेंबवेल अशींहि नांवें आहेत . [ सं . उत्पल = दगड + सृ = सरणें ] 
  • स्त्री. एक प्रकारचें भात . [ सं . उपरि + शालि ; प्रा . सालि ; म . साळि ] 
RANDOM WORD

Did you know?

श्रीयंत्रातील चक्र आणि त्रिकोण कशाचे प्रतिक आहेत?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.