TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह १|
हिमाच्छन्न सरिता

हिमाच्छन्न सरिता

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


हिमाच्छन्न सरिता

जेव्हां हो अति तीव्र शीत, सरिता ओते हिमाच्छन्न ती,

भासे घोर शिलाच का पसरुनी गेली तळापासुन

वाहे निर्मळ त्या हिमांतरं परी गंभीर तें जीवन;

यंत्रें तो थर भेदितां वर निघे वेगें फवारा अती.

मद्दोषें घन मौन सेविशि सखे, जैं माझियेसंगती,

होशी निश्चळ त्या हिमापरि परी ठावें तुझें तें मन;

जाणें मी प्रणयें अगाध भरलें कांते, असे आंतुन;

त्यायोगें विनवीं परिपरि तुला मानी जरी मी अती.

लावीं दोष सखे, स्वतासचि तुला पाहूनि मी निश्चळ,

पीतां मी अपुलेंचि रक्त मुख हें होई अती पांडुर

तेव्हां तें मुख तो कठोर रथ गे तैं भेदितां आंतिल

प्रेमाब्धी बहु कालवे, नयनिं ये वेगें फवारा वर.

कांते, लोचन हे तुझे रमविती नाना रिती निर्मल,

तेव्हां अश्रुंतुनी सखे, झळकतां सर्वांत चेतोहर !

Translation - भाषांतर
N/A

कवी - भा. रा. तांबे

काव्य प्रकार -सुनीत

वृत्त - शार्दूलविक्रीडित

ठिकाण -देवास

दिनांक - ७ फेब्रुवारी १९०३

Last Updated : 2012-10-11T13:13:32.9070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

aceous

  • - प्रमाणे, - सम 
  • वनस्पतींच्या लॅटिन वंशनामापुढे किंवा कुलनामापुढे विशेषणात्मक संज्ञा बनविण्यास लावलेला प्रत्यय, उदा. गुलाबसम अथवा गुलाबाप्रमाणे किंवा गुलाब कुलातील 
  • Rosaceous 
RANDOM WORD

Did you know?

'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site