TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा २५१ ते ३००|
साळुंकी आणि इतर पक्षी

साळुंकी आणि इतर पक्षी

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


साळुंकी आणि इतर पक्षी

एक शेतकरी शेतात तागाचे बी पेरीत होता, ते पाहून एक साळुंकी इतर पक्ष्यांना म्हणाली, 'अरे, तुम्ही जर मनावर घ्याल, तर आपण हे बी उकरून याचा नाश करून टाकू. करण हे बी रुजून त्याची जी झाडे होतात, त्यांच्या दोरांनी पारधी लोक जाळी करतात नि त्या जाळ्यांत सापडून आपण आपल्या जीवाला मुकतो.' हे ऐकून सर्व पक्ष्यांनी त्या साळुंकीची टर इडविली. नंतर काही दिवसांनी ते बी रुजून त्याची रोपे आली, तेव्हा साळुंकीने ती उपटून टाकण्याची सूचना पुन्हा एकदा पक्ष्यांना केली. परंतु त्या वेळीही 'ही मोठी भविष्यवादी आली आहे', असे म्हणून पक्ष्यांनी तिचा उपहास केला. मग ज्यांना आपल्या हिताची गोष्ट दुसर्‍याने सांगितली असताही कळत नाही, अशा अविचारी प्राण्यांच्या संगतीत राहून आपला जीव धोक्यात घालण्यापेक्षा त्यांची संगत सोडलेली बरी, असा विचार करून ती साळुंकी पुढे माणसांच्या वस्तीत येऊन राहिली.

तात्पर्य - आपल्या जातीच्या लोकांना हिताची गोष्ट सांगावी, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते बजावल्यावर त्या गोष्टीकडे जर ज्ञातिबांधवांनी लक्ष दिले नाही व त्यामुळे नाश होणार हे जर स्पष्ट दिसत असेल तर त्यांच्या बरोबर आपला नाश करून घेण्यापेक्षा त्यांची संगती सोडून द्यावी हे अधिक इष्ट होय.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-11T19:51:22.1400000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

केजें

  • न. १ ( माण . व .) मालाच्या मोबदल्याचें धान्य ; नारळ इ०पदार्थ ; उदा०माळणीपासुन भाजी घेऊन धान्य . रुपानें दिलेली किंमत . ( किं घालणें ). ' आदरासी मोल नये लावूं केजें । ' - तुगा ३४०४ . ' मागच्या आठवड्यांत वांगीं घेतलींत त्यांचें केजें घाला . ' २ मोबदला ; मालाची देवघेव . ( सं . क्रेय ; प्रा . केज्ज ) केज्यास कापुर होणें - भारी किंमतीचा पदार्थ हलक्या किंमतीस विकला जाणें . 
  • केज्‍यास कापूर होणें 
  • n  Grain, &c. given in barter for vegetables or salt-fish. 
  • मौल्‍यवान्‌ पदार्थ हलक्‍या किंमतीस विकला जाणें. तु०-आदरासी मोल नये लावूं केजे। -तुगा ३४०४. 
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.