मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ४|
केशवा माधवा गोविंदा गोपाळ...

भजन - केशवा माधवा गोविंदा गोपाळ...

भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

केशवा माधवा गोविंदा गोपाळा, जेविला तू कृपाळा पांडुरंगा । अच्युता वामना दशरथे नंदना, जेवी तू कृष्णा पांडुरंगा । कृष्ण विष्णू हरी मुकुंद मुरारी जेवी तू नरहरी पांडुरंगा, ऐसे ध्यान करीता विठ्ठल पावला, नैवेद्य जेविला, विठ्ठल सोयरा आला आमुच्या घरा, लिंब लोणकरा जीवे भावे, पंचप्राण ज्योती उजळल्या आरती ओवाळीला पति रुख्मीणीचा । पड्‍रस पक्वान्ने वाढीयेले ताटी जेवी एकवटी ची । सांमेळा येई येई बा गरुडध्वजा विटेसहित करीन पूजा धूपदीप तुळशी माळा तुला समर्पू गोपाळा । पुढे ठेवुनीया पान वाहे कुटुंबाचे अन्न तैसे नव्हे देवा गोड करूनीया जेवा, द्रोपदीचा भाजीपाला तृप्त झाले नारायण विदुराच्या कण्या खातोस मायबाप धन्या । तैसे झाले म्हणे परी चोखीयाच्या घरी । माझ्या विठोबा येईल केव्हा जेविल तेव्हा मी गोणाबाई । जाऊनी राऊळा तयासी तुवा हे लौकरी येई भोजनासी । म्हणे ज्ञानेश्‍वर नाम्यासंगे जेवशी म्हणे ऋषीकेशी म्हणतसे सांगीतले, एक भलतेची बोलती आहे ह्याची भ्रांती ज्ञानेश्‍वरा । निरोप घेऊनी सांगावे एकांत म्हणे जनी प्रती पांडुरंगा । अजुनी का नये तुला माझी दया काय देवराया पाहतोसी । आळवीता जैसे पाडस हरणे देखोनी हरली तहान भूक । प्रेमरस पान्हा पाज माझे आई, धाव विठाबाई म्हणतसे । तुजला म्हणती कृपेचा सागर तरी का अव्हेरी पांडुरंगा, आनंदले माय बाप म्हनतो उजळवा दीप । प्रातकाळी उद्धव स्नानासी चालले मिळाला तो मेळा गोपिकांचा । अरे वा उद्धवा सांगत्या दयाळा एकदा आम्हासी भेट द्यावी । गेल्या त्या गोपिका राख त्यांची झाली वाजवी मुरली तयावरी । रामकृष्ण हरी उच्चारीता दोन्ही लाभ अथवा हानी देव जाणे, जाईन लोटागंनी संताच्या चरणी लाभ अथवा हानी देवजाणे, विश्‍वास धरीन सदगुरु चरणी लाभ अथवा हानी देव जाणे विठोबा यावे सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा । देव चालले महालाला सितेच्या मंदिरा । राम चालले महालाला सिताच्या महालाला । हळूहळू चला घालीती इंजन वारा देवा चला हो महाला, महाला, विठ्ठल विठ्ठल बोला । विठोबा साखरेचा रवा राम साखरेचा खडा, ज्याला भावे त्यानी घ्यावा । सांबळा विठोबा सांवळी चिमणी सावळ्यापदामध्ये तुळशीचे वन । पद्‍माळ्याला जाता हरपले माझे मन । छंदाने श्रीहरीच्या नादाने गोपी चालल्या, गोविंदा विसरले घर धंदा मुरली बाजवली । हरीने मुरली वजविली, राखा गौळण घाबरली, डोईवर घागर पाझरली, राधा गौळण घाबरली । घडी एक जाती आनंदाची गोविंन्दाची वाट चालली । आळंदीची पंढरीची । घडी तक जाती आनंदाची वाट चालली आयोध्येची मथुरेची वाट चालले द्वारकेची । घटका जाती पळ जाती तास वाजे झनाना, आयुष्याचा नाश होतो राम काही म्हणाना । राम बोला कडक्याचा नाही भरोसा घटक्याचा हनुमंत लवकर आणली सीता जानकी, रामाची रामदूत चले गोपाळ दूत चले । विठुचा गजर हरीनामाचा झेंडा, रोविला संताचा मेळा गोपाळांचा । डाव मांडिला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी, डाव मांडिला चेंडू झुगारिला, पुडलिका अनीला विठ्ठल सखा द्वारका बसविली भीमातिरी गंगा, तुळशी शाळीग्राम आणिक जिव्हेन करीन काम, सदा भजावा राम राम । दोन्ही थड्या, चंद्रभागा कैशी येऊ मी पांडुरंगा विठोबा विलंब नको घडीचा धाव समय तातडीचा । विठ्ठल तारी रे दयाळा । मथुरा वृंदावनवासी राधारमण विलासी, मथुरावासी दंग झाला, गोपीमध्ये गर्क झाला, गोपाळांच्या मेळी, हरी हा सांपडला वनमाळी गोविंदाच्या मोळी हरी हा सापडला वनमाळी । पंढरपूर परवाना देवाच्या दरवाज्यावर मोत्याचा पाळणा हलवा ग बयानो हलवा ग सयानो दशरथे ।

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP