TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|
विसनूनी पाणी त्यामधी वाळा...

भजन - विसनूनी पाणी त्यामधी वाळा...

भजन - A bhajan or kirtan is a Hindu devotional song, often of ancient origin. Great importance is attributed to the singing of bhajans with Bhakti, i.e. loving devotion. "Rasanam Lakshanam Bhajanam" means the act by which we feel more closer to our inner self or God, is a bhajan. Acts which are done for the God is called bhajan.

भजन

विसनूनी पाणी त्यामधी वाळा सारुनी घंगाळा हरी सारुनी घंगाळा, कुंकू केशर वर बुक्याची रांगोळी हरीवर बुक्याचे रांगोळी, मखमल मंडप शोभीवंत वर मोत्याची झालरी हरीवर मोत्याची झालरी हा तुजला आवडणार देवा धर्म घरी जाशील, त्यांचे घोडे तूची धुशील ऐसा स्वभाव तुजपासी हरी ओ स्वभाव तुजपासी-बोले रुक्मीणी चक्रवर पाणी कशात भुललासी, हरी ओ कशात भुललासी ॥१॥

सोजीच्या मी करंज्या केल्या तुपात तळूनी हरी ओ तुपात तळूनी हा तुजला आवडाणार देवा, विदुर घरी जाशील त्यांच्या शीळ्या कण्या खाशील ऐसा स्वभाव तुजपासी हरी ओ स्वभाव तुजपासी ॥२॥

चहूबाजूनी रंगीत पलंग वर जळत्या समया रुक्मीणी शेजारी लक्ष्मीपण पाय दाबाया हरी ओ पाय दाबाया हा तुजला आवडणार देवा जनी घरी जाशील तीचे तू पाय दाबशील ऎसा स्वभाव तुजपासी हरी ओ स्वभाव तुजपासी ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T13:09:19.1130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेग

  • न. १ जनावराचे शिंग . २ पर्वताचे शिखर . महत्त्वाद्रीच्या शृंगी बैसावया । - ज्ञा १७ . २४२ . ३ चंद्राच्या कोरेचा निमुळता भाग ; उभे टोक . ४ ( ल . ) भांडण उपस्थित करण्याकरितां केलेले चिडखोर , टोचणीवजा भाषण कृत्य ; उपस्थित केलेला मुद्दा वगैरे ; तंटयाचे निमित्त . ५ एक वाद्य ; शिंग . टाळ मृदंग मोहरिया । पांवे शृंगे घुमरिया । - ह १० . १४० . [ सं . ] 
  • स्त्री. ( राजा . कुण . ) रांग ; ओळ ( एका टोकापासून सरळ ). [ शिखर , शेख , टोक ] शेगाडी - क्रिवि . ( कु . ) ( सरळ रेषेने ) वर - खाली . शेगान् शेग - क्रिवि . ( माल ) या टोंकापासून त्या टोकापर्यंत ; येथपासून तेथपर्यंत ; सपशेल ; पूर्णपणे . 
  • ०ऋषी पु. एक मुनि ; पर्जन्य पडावा म्हणून याची प्रतिमा करून आराधना करितात ; दशरथाचा जामात . 
  • ०ग्राहिका स्त्री. ( न्यायशास्त्र ) समुदायाचे एकदम ग्रहण न करितां प्रत्येक पृथक् ‍ व्यक्तिद्वारा समुदायाचें ग्रहण ; एखाद्या गोष्टीने व्यक्त होणारे निरनिराळे महत्त्वाचे मुद्दे पृथक् ‍ पणे विचारांत घेणे . शृंगापत्ति - स्त्री . ( न्यायशास्त्र ) दोन वैकल्पिक गोष्टीपैकी कोणतीचाहि स्वीकार केला असतां अनिष्ट घडून येण्याची परिस्थिती . ( इं .) डायलेमा . [ सं . ] शृंगाटक - पु . चौक . समस्त शृंगाटक नोप देती । - सारुह ६ . ३ . [ सं . ] शृंगी - पु . शिवाचा अनुचर ; गण . - स्त्री . एक वाद्य ; शिंगी . शृंगी खेची करि जागृत मित्रसेना । - वामन ( नवनीत पृ . ९२ . ) - वि . १ शिंग असणारा . २ शिखर असलेला . ३ ज्याच्या शेंडीत किंवा कानाच्या मधील भागांत मांसाचा खिळा दिसतो असा ( घोडा ). - अश्वप १ . ९३ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site