TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
बाळाराजाचा पाळणा

बाळाराजाचा पाळणा

बाळाराजाचा पाळणा Balraja Palana

बाळाराजाचा पाळणा

बाळा जो जो रे । झोप घेई आता ! माझ्या सोनुल्या गोष्ट मी सार्‍या ।

कथिल्या तुला, जो.॥१॥

झोपला राघु । झोपली मैना । झोप घेई रे । माझ्या नंदना जो. ॥२॥

झोपले इवले । पानांचे बाळ । नको वाजवू । तुझ हा चाळ, जो. ॥३॥

वारा गातो बघ । तुजला अंगाई । म्हणतो हळूच । करी गाई गाई, जो. ॥४॥

इवलासा हत्ती झोपला कसा । आणिक डोळे । मिटतो ससा , जो ॥५॥

खेळणी तुझी । सारी झोपली । निद्रेच्या राज्या । दंग जाहली, जो.॥६॥

चांदोमामा बघ । वर झोपला । स्वप्न पाळणा हळू हलला , जो. ॥७॥

कितीक पर्‍या । नेतील तुला । दावतील त्या सुख सोहळा , जो.॥८॥

गातिल आणि सुरेख गाणी । बाळा हा माझ्या । घेई ऎकुनी, जो.॥९॥

झोपली धरणी । निळ आकाश माझ्या सोनुल्या । निज तू शांत, जो.॥१०॥

झोपले बाळ । मिटे पापणी । ठेव सुखी देवा । हीच विनवणी, जो.॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-28T22:18:24.4570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चौरंग

 • पु. १ चार पाय असलेली , स्नान इ० करतांना बसावयास घेण्यासाठीं केलेली लांकडी चौकी ; लांकडाचें चौकोनी , चार पायांचें आसन , बैठक . २ ( ल . ) - वि . हातापायानें विरहित असा ; पंगु . त्या परतोनि राजकन्येसी सांगती । कीं चौरंगा केला जो निश्चितीं । तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती । घाणा हांकीत बैसला । - शनि २३६ . [ सं . चतुर + अंग ; प्रा . चउरंग ] ( वाप्र . ) चौरंगणें - उक्रि . ( एखाद्याचे ) हातपाय छाटून पंगू करणें ; चौरंग बनविणें . [ चौरंग ] 
 • ०होणें हातापायांचा चौरंग होणें - १ ( थंडीनें , दुखण्यानें ) शरीर आंखडणें ; बसण्याचा एक प्रकार . करून चौरंग चौरंग देहाचा । - भज ५४ . २ ( चोर इ० ) हातपाय जखडून बांधला जाणें . 
 • ०वायु पु. घोडयाचा एक रोग ; यानें घोडयाचे चारी पाय सुजतात . - अश्वप २ . १८० . 
 • चौरंग होणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

मनुष्याच्या जीवनात स्नानाचे महत्त्व काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.