TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
पांडुरंगाचा पाळणा

पांडुरंगाचा पाळणा

पांडुरंगाचा पाळणा Pandurang Palana

पांडुरंगाचा पाळणा

पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदंगाचा गजर केला ॥

चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥

दुसर्‍या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।

वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥

तिसर्‍या दिवशी दत्ताची छाया । नव्हती खुलली बाळाची छाया ।

आरती ओवाळू जय प्रभूराया । जो. ॥३॥

चवथ्या दिवशी चंद्राची छाया । पृथ्वी रक्षण तव कराया ।

चंद्रसूर्याची बाळावर छाया ॥ जो.॥४॥

पाचव्या दिवशी पाचवा रंग । लावूनि मृदंग आणि सारंग ।

संत तुकाराम गाती अभंग ॥ जो.॥५॥

सहाव्या दिवशी सहावा विलास । बिलवर हंड्या महाली रहिवास ।

संत नाचती गल्लोगल्लीस ॥जो.॥६॥

सातव्या दिवशी सात बहीणी । एकमेकीचा हात धरुनी ।

विनंती करिती हात जोडूनी ॥जो.॥७॥

आठव्या दिवशी आठवा रंग । गोप गौळणी झाल्या त्या दंग ।

वाजवी मुरली उडविसी रंग ॥जो.॥८॥

नवव्या दिवशी घंटा वाजला । नवखंडातील लोक भेटीला ।

युगे अठ्ठवीस उभा राहिला ॥जो.॥९॥

दहाव्या दिवशी दहावीचा थाट । रंगित फरश्या टाकिल्या दाट ।

महाद्वारातून काढिली वाट ॥जो.॥१०॥

अकराव्या दिवशी आकार केला । सोन्याचा कळस शोभे शिखराला ।

रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला ॥जो.॥११॥

बाराव्या दिवशी बारावी केली । चंद्रभागेत शोभा ही आली ॥

नामदेव ते बसले पायारीला चोखोबा संत महाद्वाराला ॥जो.॥१२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-09T20:31:49.5630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Lycopodiinae

 • मुग्दल शेवाळी वर्ग, लायकोपोडीनी, लेपिडोफायटा 
 • नेचाभ पादपांच्या (टेरिडोफायटा) चार वर्गांपैकी एक, यात पाच गण आहेत लायकोपोडिएलीझ, सिलाजिनेलेलीझ, लेपिडोंडेंड्रेलीझ, लेपिडोकार्पेलीझ व आयसॉएटेलीझ. मुग्दलाच्या (गदेच्या) आकाराचे शंकु व काहींत शेवाळीसारखी पाने यावरुन मुग्दल शेवाळी हे नाव. काही जाती प्राचीन म्हणून जीवाश्मरुपातच व इतर अनेक विद्यमान वनश्रीत आढळतात. बीजुकधारी पिढी प्रमुख व तिला मूळ, खोड व बहुधा लहान पाने एकाआड एक असतात, रंभ विविध, पर्णविवरांचा अभाव, बीजुककोश अक्षसंमुख (पानांच्या किंवा तत्सम उपांगंच्या तळाशी) व एक, पाने कधी जिव्हिकावंत, कधी मोठी व समोरासमोर, काहींत दोन प्रकारचे बीजुककोश, गंतुकधारी पिढी बहुधा ऱ्हसित, रेतुकाशये व अंदुककलश, काहींत ऱ्हास पावलेल्या स्वरुपात, फलन पाण्याद्वारे होते. काही शास्त्रज्ञ नेचाभ पादपांच्या विभागात लायकोपोडिएलिझ हा एक गण म्हणून समाविष्ट करून त्यात वरील गण कुलस्वरुपात ठेवतात. लायकोपोडिएसी कुलात लायकोपोडियम व फायलोग्लॉसम हे दोनच वंश विद्यमान वनस्पतीत आढळतात. लायकोपोडियम याच्या हरिणाच्या शिंगासारख्या शंकुयुक्त भागामुळे त्याला 'मृगशृंग शेवाळ' (Staghorn Moss) म 
 • Club-mosses, 
 • Lepidophyta 
RANDOM WORD

Did you know?

स्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.