TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|

शिवाजीचा पाळणा - तुज जोजविते माय जिजाई बाळ...

शिवाजीचा पाळणा - Shivaji Palana

शिवाजीचा पाळणा

तुज जोजविते माय जिजाई बाळा । नीज रे नीज लडिवाळा ।

मध्यरात्रीचा प्रहर लाडक्या आला । झोप का येईना तुजला ॥

झोके देते गीत गात अंगाई । तरी डोळा लागत नाही ।

बाळा असला थांबिव चाळा आता । थकले मी झोके देता ॥

तू महाराष्ट्राचा त्राता । मनी धरली कसली चिंता ।

पाठिशी भवानी माता । माउलिया जीवीचा जिव्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥१॥

चल ठेव दुरी हातामधली ढाल । निद्रा करी बाळा खुशाल ।

झोपली कशी बारा मावळी थेट । शिवनेर जुन्नर पेठ ॥

नि:शब्द कशी पसरली रे शांती । या मराठी भूमीवरती ॥

बागूलबुवा आला काळा काळा । झडकरी झोप रे बाळा ॥

कोकणच्या चौदा ताली । झोपल्या घाटाखाली ।

आणि रात्र बहुतचि झाली । किती सांगु तुला समजावू वेल्हाळा ।

नीज रे नीज लडिवाळा ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

Last Updated : 2007-12-09T20:31:45.4700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बडण

 • न. ब्राह्मणांतील कुळाचार ; प्रतिमंगलकार्यानिमित्त करावयाचें कृत्य . बोडण पहा . यांत कणकेचे केलेले वेण्याफण्यादि अलंकार व तेलच्या इ० पांच अन्नें एका पाटींत भरुन तींत कणकेचा दिवा लावून ते सर्व झांकून देवीपुढें ठेवतात . पांच सवाशणी जेवणास बोलावून त्यांस हळदीकुंकूं , दक्षिणा देतात . हें बडण दुसरे दिवशीं सासुरवासिनीनीं खावयाचें असतें . बडणाच्या आदले रात्रीं गोंधळ असतो . माहेरवासिनीनें बडणांतील दिवा पहावयाचा नसतो अथवा अन्न उष्टवावयाचें नसतें . - मसाप १ . २७३ . [ सं . बल = धान्य सांठविणें ; जगणें , बडन - ण ; सं . वर्धनम ] 
RANDOM WORD

Did you know?

gharat javalchi vyakti vaarlya nanter, lok ek varsha san saajre ka karat nahit?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.