TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
बाळा जो जो रे कुळभूषणा । ...

रामाचा पाळणा - बाळा जो जो रे कुळभूषणा । ...

रामाचा पाळणा Ram Palana

रामाचा पाळणा

बाळा जो जो रे कुळभूषणा । दशरथनंदना ।

निद्रा करि बाळा मनमोहना । रामा लक्षुमणा ॥धृ॥

पाळणा लांबविला अयोध्येसी । दशरथाचे वंशी ।

पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥

रन्तजडित पालख । झळके अलौकिक ।

वरती पहुडले कुलदिपक । त्रिभुवननायक ॥२॥

हालवी कौसल्या सुंदरी । धरुनी ज्ञानदोरी ।

पुष्पे वर्षिली सुरवरी । गर्जती जयजयकार ॥३॥

विश्‍वव्यापका रघुराया । निद्रा करी बा सखया ।

तुजवर कुरवंडी करुनिया । सांडिन आपुली काया ॥४॥

येऊनि वसिष्ठ सत्वर । सागे जन्मांतर ।

राम परब्रहा साचार । सातवा अवतार ॥५॥

याग रक्षुनिया अवधारा । मारुनि रजनीचरा ।

जाईल सीतेच्या स्वयंवरा । उद्धरि गौतमदारा ॥६॥

पर्णिले जानकी सुरुपा । भंगुनिया शिवचापा ।

रावण लज्जित महाकोप । नव्हे पण हा सोपा ॥७॥

सिंधूजलडोही अवलीळा । नामे तरतिल शिळा ।

त्यावरी उतरुनिया दयाळा । नेईल वानरमेळा ॥८॥

समूळ मर्दूनि रावण । स्थापिल बिभीषण ।

देव सोडविले संपूर्ण । आनंदले त्रिभुवन ॥९॥

राम भावाचा भुकेला । भक्ताधीन झाला ।

दास विठ्ठले ऎकिला । पाळणा गाईला ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

Last Updated : 2007-12-09T20:31:34.1230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विहंगम

  • पु. पक्षी ; पांखरूं ; आकाशांत संचरणारा . झडपुनि तंव कर्मे भाग नेला विहंगीं । - मुरामायण बाल . [ सं . विह = आकाश + ग = जाणारा ] विहंगममार्ग - पु . ( योग ) त्वरित समाधि साधण्याचा मार्ग ; याच्या उलट पिपीलिका मार्ग . पिप्लीका मार्गे हळु हळु घडे । विहंगमें फळासि गांठी पडे । - दा २० . २ . १० . लंगलें लयेतें अलक्षी । विहंगममाग । - दा १४ . ४ . ३४ . २ ( ल . ) कोंणतेंहि कार्य लवकर साधण्याची पध्दति , रीत , मार्ग . 
  • m  A bird (travelling in the heavens). 
  • विहंगमदृष्टी f  A bird's eyeview. 
RANDOM WORD

Did you know?

shreeyantra siddha kase karave ?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site