TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पाळणे|
विष्णूचा पाळणा

विष्णूचा पाळणा

विष्णूचा पाळणा


विष्णूचा पाळणा

जो जो जो जो रे व्यापका । सृष्टीच्या पालका ।

निज निज निज बा तू बालका । तान्हुल्या सात्विका ॥धृ॥

धावसि दासाच्या संकटाला । म्हणवुनि श्रमली काया ।

श्रम सांडुनिया निज ध्येया । हलविते पाळणिया ॥१॥

शीते व्यापिले तुज भारी । निजता सागर जठरी ।

आला काळीमा शरीरी । फणिवर धुधु:कारी ॥२॥

अद्‍भुत तव महिमा श्रुतिनिगमा । न कळे तुझी सीमा ।

तो तू स्त्रीकामा घनश्‍यामा । अंतरी धरुनी कामा ॥३॥

तुजला कैसी बा लाज नसे । कैसे झाले पिसे ।

त्र्यंबक प्रभु विनवी तुज बहुसे । येत असे रे हासे ॥ जो जो ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-04-20T05:43:40.6630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

असकें

  • वि. 
  • सर्व ; सगळें ; एकूण एक ; एकंदर . त्रिलोकीचें पाप असकें । - एभा २७ . ३९८ . 
  • सर्वांतील प्रत्येक किंवा सर्व एकदम . आतां उठाउठी । असकेयां ब्रह्मगोळकां देइनु मोठी । - शिशु ९२१ . तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें । - ज्ञा १० . ३२२ . [ सं . आसाग्र , प्रा . आसग्ग , आसका , असका . ] 
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.