मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह|
उपसंहार व वरप्रसाद

उपसंहार व वरप्रसाद

उपसंहार व वरप्रसाद

*
घालीन लोटांगण  वंदीन चरण । डोळ्यांनी पाहीन रुप तुझे ॥१॥
प्रेमें आलिंगन आनंदें पूजीन । भावें ओवाळींन म्हणे नामा ॥२॥
भजन - विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई तिर्थाचा प्रचलित अभंग
*
तीर्थ उठवा उठवा । देव भक्तासी बोळवा ॥१॥
गुढा सोडणें सोडणें । झालें तीर्थ उथ्थापणें ॥२॥
गुढी आली वृंदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥३॥
जाला कथेचा कळस । लळीत गाये भानुदास ॥४॥
तीर्थाचा अभंग गाथ्यात असा पाठा आहे
*
गुढीयेसी सांगू आलें । कंस चाणूर मर्दिले ॥१॥
हर्षे नाचताती भोजें । जिंकयेले यादवराजें ॥२॥
गुढी आलीं वृदावना । मथुरा दिली उग्रसेना ॥३॥
जाला त्रिभुवनी उल्हास । लळित गाये भानुदास ॥४॥
*
हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मीं तुझा दास ॥१॥
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ॥२॥
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ॥३॥
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेंचि दान ॥४॥
*
आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा । माझिया सकळा हरीच्या दासा ॥१॥
कल्पनेची बाधा न हो कवणें काळीं । ही संतमंडळी सुखीं असो ॥२॥
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥३॥
नाम म्हणे तया असावें कल्याण । ज्या मुखीं निधान पांडुरंग ॥४॥
*
मागणें तें तुजप्रती आहे । देशील तरी पाहें पांडुरंगा ॥१॥
या संतासी निजवीं हेंचि मज देई । आणिक दुजें कांही न मागों देवा ॥२॥
तुका म्हणे आतां उदार तूं होई । मज ठेवी पायीं संतांचिया ॥३॥
*
जाला प्रेतरुप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव स्मशानींचा ॥१॥
रडती रात्रंदिवस कामक्रोध माया । म्हणती हाय हाय यमधर्म ॥२॥
वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि लागला ब्रम्हत्वेंसी ॥३॥
फ़िरविला घट फ़ोडिला चरणीं । महावाक्य ध्वनि बोंब झाली ॥४॥
दिली तीळांजुळी कुळनाम रुपासी । शरीर ज्याचे त्यासी समर्पिले ॥५॥
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप । उजळला दीप गुरुकृपा ॥६॥

N/A

N/A
Last Updated : January 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP