मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
शेजारति ओंवाळूं उन्म...

देवीची आरती - शेजारति ओंवाळूं उन्म...

देवीची आरती

शेजारति ओंवाळूं उन्मीनी ध्यान महामाया ।
निरंजन मंदिरी पहुडे रचिली सुखशय्या ॥ धृ. ॥
निर्गुणधामी निर्विकल्पी निरालंबीही ।
अद्वयरुपा सद्वयमिळणी मग्न निरामयीं ।
भागलां बहु देवा अनंत प्रपंच्याठायीं ।
श्रमपरि हरणी घ्यावी आतां विश्रांती शुभ ही ॥ शे. ॥ १ ॥
असतां उगाची नसतां कारण द्वैता पावूनियां ।
होउनि अतिकारण ती विश्वे बहु घडा मोडुनियां ॥
एक तूं अनेक झाला असतां परता राहुनियां ।
भोगविसी कृतकर्मे वर्मे जीव मानवुनियां । शे. ॥ २ ॥
ऎसी तूं महामाया वेषाजन हें मोहुनियां ।
सुखदु:खादिक हर्षपिषादाखेदा लावुनियां ॥
होसी पाहसी कौतुक दाविसि पुंस्त्री भावुनियां ।
काय ही लीला परतंत्रा जन कष्ट घालुनियां ॥ शे. ॥ ३ ॥
पुरे आतां तव आवरोनि माया ज्ञाना देऊनियां ।
पुरवी मनोरथ देवा आपुल्या बिरुदारा खुनियां ॥
सेव्यसेवक भावरीतीनें वांच्छित देऊनियां ।
चालवी दास अविघ्नें नातरि देवा देई लया ॥ शे. ॥ ४ ॥
अनंत ब्रह्मांडे तव शय्येठायिं बिजरुपीं ।
होती लीन न उरता कांही सर्वही तव रूपी ॥
रुपा रुप मिळोनी अरुपी निजसी स्वरूपीं ।
मंगीशात्मज विनवी विव्हळ काळी साक्षेपी ॥ शे. ॥ ५ ॥

N/A

N/A
Last Updated : August 30, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP