फाल्गुन वद्य ५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


खर्ड्याचा प्रसिद्ध संग्राम !

शके १७१६ च्या फाल्गुन व. ५ रोजीं म्हणजे रंगपंचमीला मराठे आणि निजाम यांचा खर्डे येथें इतिहासप्रसिद्ध सामना होऊन निजामाचा संपूर्ण पराभव झाला. मराठ्यांच्या इतिहासांतील अत्यंत अभिमानाचा हा प्रसंग आहे. खर्ड्याचा विजय अजूनहि मराठ्यांच्या बाहूंना स्फुरण चढवीत असतो. या लढ्यांत मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांच्या इतिहासांतील अत्यंत अभिमानाचा हा प्रसंग आहे. खर्ड्याचा विजय अजूनहि मराठ्यांच्या बाहूंना स्फुरण चढवीत असतो. या लढ्यांत मराठ्यांचा पराभव झाला असता त त्यांचें सार्वभौमत्व संपून निराळ्याच मनूस सुरुवात होण्यासारखी परिस्थिति होती. राक्षसभुवनच्या लढाईंत निजामाचा पूर्वी एकदां पराभव झाला होता, परंतु तहांत ठरलेला मुलूख मराठ्यांना मिळाला नाहीं. नाना फडणिसांनीं निजामाकडे काय येणें आहे याची यादी पाठविली, परंतु नानांना बेपर्वाईचें उत्तर मिळालें. - "पुण्यावर स्वारी करुन तें जाळून पेशव्यांच्या हातीं भिक्षापात्र देऊन त्यांस देशोधडीस पाठवूं - " ही निजामाची भाषा नानांना कळल्याबरोबर युद्धाची तयारी झपाट्यानें सुरु झाली. नुकतेच महादजी शिंदे आणि हरिपंत फडके वारले असल्यामुळें मराठ्यांना आपण सहज जिंकूं अशी निजामाची कल्पना होती. इंग्रज आपणांस मदत करतील हीही खात्री निजामास होतीच. या लढ्यांत दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर, गायकवाड, जिवबादादा बक्षी, भोसले, आदि सरदार सामील झाले होते; हें पाहून सर जॉन शोअरनें आयत्या वेळीं निजामास मदत दिली नाहीं. एकंदर मराठ्यांची फौज ऐशीं हजारपर्यंत तयार झाली. परशुरामभाऊ मुख्य सेनापति होते. प्रथम परिडे या गांवी दोनही सैन्यांच्या चकमकी झाल्या, आणि नंतर खर्डे या गांवीं निजामची फौज कोंडली गेली. - " सकाळच्या दहा घटकांपासून अस्तमानपर्यंत लढाई झाली. संध्याकाळचे सुमारास त्यांचा मोड होऊन त्यांनीं पळ काढला. खर्ड्याचा किल्ला गांठला, आम्हीं पाठीमागें लागलों, त्यांचेमागे कोसाचे अंतराने उतरलों, पूर्वेस घाटाचे बाजूस आमचें पेंढार उतरलें, शत्रूस निघून जावयास मार्ग नाहीं. पाणी नाहीं, हैराण गत झाली", नंतर तह होऊन मराठ्यांना परिंड्यापासून उत्तरेस तापी नदीपर्यंतचा मुलूख व युद्धखर्चाबद्दल तीन कोटी रुपये मिळाले.
- १० मार्च १७९५

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP