उत्तर खंड - उपनिषदानुसरित

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


यदिदं दृश्यते किचिज्जगत्स्थावरजंगमं ॥
तदिदं निश्चयं ब्रह्म ब्रवीति बहुधा श्रुति : ॥१॥
शीष्या तु माझे आप्त । केलासी संसारे संतप्त । परमात्मापदवि प्राप्त । केलि तुज ॥१॥
परमात्मा देऊनि हातिं । तोडिली सकळ भ्रांति । हें गुह्य तर्‍हिं संप्रतीति । आणिलें तुज ॥२॥
तुं ह्मणसी माझें भाश्य । तरि वडिलाचिहि देउं साक्ष । हे चि घेति प्रत्यक्ष । जनकादिक ॥३॥
महरुषी मन तरुनि । हरिहर ब्रह्मा वज्रपाणि । तापस सिध्द योगी ज्ञानी । हे चि घेति ॥४॥
जाणते नेणते लोक । सर्वही आत्मवाचक । या वाचौनि आणिक । गौळ नाहिं ॥५॥
आगम निर्गम पुराण । बोलें हें चि कारण । मार्ग दरुशणें अन्योअन्य । या चि स्तव ॥६॥
सर्वत्रां आत्मनिष्टां । दिसें विशेषें प्रतिष्ठा । आतां याही वरी सुष्टा । रुचा आईक ॥७॥
आरण्य कांड चतुर्द्दशम । हे सर्वसाक्षि उत्तम । येथीचें देखनें विषम । कहिं चि नोहे ॥८॥
दावि कर्म आदिवंत । स्वाचारु सत्य वदत । ‘येष ब्रह्म ’ प्रतिपादित । सर्वातर ॥९॥
एष उष्ण ब्रह्मणस्पति :। असें बोले श्रृति । याचा अर्थु सुमती । ब्रह्म चि हें ॥१०॥
ब्रह्म तो आत्मा जाणावा । हा पूर्ण सर्व जीवा । ह्मणौन समत्वें देखावा । सर्वभूतिं ॥११॥
आत्मतत्विं सर्व नेम । हे श्रृतिनेणें विषम । लोकत्रईं ही सम । बोले पुढां ॥१२॥
समो मशकेन समो नागेन । असें वेदाचें वचन । पाहातां यदर्थी भीन्न । काहिं चि नसे ॥१३॥
हा आत्मा नाना रुपें । ह्मणौनु असावे भुतकृपें । येर्‍हवीं सांडीमांडीचे पडपे । फुंजुं नये ॥१४॥
येकु कां दिसे बहुवसु । येथ वाटैल अनुविश्वासु । तरि तो परमात्मपुरुशु । पूर्ण असतां ॥१५॥
पूर्ण तो येकविध पाहिं । दुसरें विण शोभा नाहि । नसुधे येकपण कांहि । रुपा नये ॥१६॥
तस्मादेकाकि न रमते । स इमेमवात्मा व्देधापतयेत । ये उभयेते तत: पतिश्चपत्निश्चा भवत्‍ । या वचनातें सत्य मानि ॥१७॥
न मातृभगिनी दुहिता । हा पदार्थु मोडला पाहातां । आत्मा चि जाला उभयता । पतिपत्नि ॥१८॥
जैसें व्दिभावगगन । किं हेमरुप भूषण । तैसी प्रकृति पुरुषें भिन्न । नाम भेदु हा ॥१९॥
ते उभयता साकारे । रचति यें चराचरें । हा आत्मा चि निर्धारें । आदि अंति ॥२०॥
व्देव ब्रह्मणोरुपे ये उत्तरें । मूर्त्तंचामूर्तं च दो प्रकारें । वेदे देखीलें निर्धारें । अनादि ब्रह्मा ॥२१॥
जे महदादिसीं साकार । जेथुनि गुण तत्वें विकार । जे भूमिकें हें चराचर । ते मूर्त ब्रह्म ॥२२॥
आतां जे या सर्वा अतित । वर्ण व्यक्ति रुप रेख रहित । नित्य पूर्ण शाश्वत । ते अमूर्त ब्रह्म ॥२३॥
तदात्मानमेव वेद ह ब्रह्मास्मीति । असें सर्व ब्रह्म जे देखती । ते ब्रह्मीं ब्रह्ममूर्ति । संशयारहित ॥२४॥
ये ब्रह्मीं जें अंध जालें । ते भवीं संशयें बुडालें । जेहि अबंधि बंधन घेतलें । ते मुक्त कैसें ॥२५॥
येथुनि कंडीका पुढां । मांडुकी संवादु गाढा । हें विश्व ब्रह्म येवढा । निर्धारु केला ॥२६॥
सैषा नु ब्रह्मणेति श्रृष्टि । हे रचना पाहतां दृष्टी । तैं हें चि यातें अधिष्टी । नामरुपें ॥२७॥
तं नामरुपाभ्यामेक । ये श्रृतीचे भाव । नामें रुपें सर्व । हा चि नटला ॥२८॥
हा क्षरला रुपें नामें । जैसें अळंकार अथीलें हेमें । तैसा हा अभेदु येथ विषमें । प्रमाणें न येति ॥२९॥
आत्मन्येवोपासिता । ये श्रृतीतें पाहातां । सर्वं यकं भवति तरि भिंन्नता । कोठें असे ॥३०॥
यथा अज्ञे: क्षुद्रा विस्फुल्लिंगा । दिप ज्वाळा अनेगा । तैसा हा आत्मा जगा । पुरोनि उरला ॥३१॥
असो जो निर्धारु केला श्रृति । यथा आदेश नेतिनेति । सर्व निरसुनि थापी अंती । तेषामेष सत्यं ॥३२॥
ईश्वरा पासून सगुण । न इति शब्दें निरसन । पुढां देखिलें निर्गुण । तें अनीर्वचनीय ॥३३॥
व्दितीय वचन ‘ न इति’ । बोलाचि केली शांतिं । तर्‍हि श्रृति असे देखती । पूर्णब्रह्म तें ॥३४॥
तें बोलिजे असें नोहे । पुनरपी सगुण पाहे । जो पाहानिं हाव आहे । तो बहुडे श्रृती ॥३५॥
आणिक नेति अर्थु उन्मेषु । जे जें जड बोले वेदपुरुषु । तो पदार्थु नोहे शेषु । ह्मणौनि वारि ‘ नेति ’शब्दें ॥३६॥
जें जें जड बोले जेवढें । तें तें नित्य न घडे । ठाइं ठाइं तेवढें । ना ह्मणे ‘ नेति ’ वचनें ॥३७॥
येथपरियंत ‘नेति ’ उपावो । व्दैता अव्दैताचा अभावो । देखोनिहि फेडी ठावो । वासनेचा ॥३८॥
पूर्ण ब्रह्म जैसें तैसें । तें ‘नेति’ शब्द काई निरसें । येवं ‘नेति’ वचन आपैसें । निमे तेथें ॥३९॥
एवढा ‘नेति ’ शब्दु राहे । तें हे अवघें चि आहे । ज्ञाता अनुभवें पाहे । या चि खुणा ॥४०॥
‘नेति ’ शब्दु क्षत्र रावो । सर्वा शीरीं याचा धावो पण परब्रह्मीं ठावो । पुसे याचा ॥४१॥
असो यासी हा चि आधारु । प्रपंचु न घॆ तो चातुरु । जो व्दैतसंहारु । तो चि मोक्षु ॥४२॥
राहो या आताच्या गोष्टी । चालो श्रृतिचा संघ्रष्टीं । ये सगुणी उभरे द्रुष्टी । तैं प्रकाशे शुध ॥४३॥
असें देखती ते ब्रह्मीष्ट । इतर ते आत्म भ्रष्ट । उभयां येक वाट । संवादा नये ॥४४॥
इतर घेत देत वर्तता ते व्रह्मीष्ट करीतां कार्यरहित । पण ब्रह्मगंधी विवर्जित । ईतर जन ॥४५॥
इतरां विवर्जित भाषा । ते ज्ञातारांची दशा । अमूर्त मूर्त हा भर्वसा । ब्रह्मेदं सर्वं ॥४६॥
एवं पंचमा ब्राह्मणा चतुर्द्दश श्रृति । पृथुकारें बोलती । परि अंती हें चि प्रतिपादिति । ब्रह्मेदं सर्वं ॥४७॥
स वाऽअयमात्मा० सर्वाधिपति । हा आत्मराजु बोले श्रृती । ह्मणौन असावें आत्मस्थिति । हे चि दशा ॥४८॥
याचा निर्धारु हा चि आतां । एआएतऽआत्मना समर्पिता । तरि धर्मु तो यापरुता । कोण असे ॥४९॥
मज पाहातां नेम । दुजें नाहि उत्तम । यां सर्वा अंतिची शीम । ब्रह्मज्ञान ॥५०॥
कां जें जालेयां ब्रह्मज्ञान । श्रधा नुपजे आन । यास्तव वैदेह नृपा प्रमाण । हें चि जालें ॥५१॥
सूर्य केवळ ब्रह्मिष्टु । याचा वचनें संतुष्टु । ह्मणौनि ज्ञानें वरीष्टु । याज्ञवल्क्यु ॥५२॥
जेणें शाकल्याचा कोपु जाणौनि । वेद दीधले वमुनि । मग बैसुनि अश्वकर्णि । पठण केलें ॥५३॥
त्या ब्राह्मणाची बुधी आद्या । सूर्यापासुनि ब्रह्मविद्या । घेउनि प्रगट केली सद्या । जनकयागीं ॥५४॥
रावें जनकें ब्रह्मिष्ठें । यागाचें संतुष्टें । कोटी गोधनें सवछें श्रेष्ठें । श्रृंगारिलिं ॥५५॥
मिळाले कुरु पांचाळादि ब्राह्मण । तेथ राज आज्ञा प्रमाण । हे समस्तही दान । ब्रह्मिष्टें घेणें ॥५६॥
या राजयाच्या वचनां । टंक पडले ब्राह्मणा । कां जें ब्रह्मनिष्ठा वाचुनि गोधना । वळावें कोणें ॥५७॥
तेथ सामश्रवा ब्राह्मणें । नेलि अवधि चि गोधनें । याज्ञवल्क्याचें शीष्यत्वपणें । अभिमानु तया ॥५८॥
या वरी क्षोभले ब्राह्मण । याज्ञवल्क्यासी करिति प्रेश्न । त्यासीं देतां वचन । न चुके तो रुपि ॥५९॥
ते जें पुसति निर्धारें । त्यासी तो दे उत्तरें । येवं तेणें ते सर्व व्दिजवरें । प्रतिज्ञें जिंतलें ॥६०॥
पाठिं गार्गि ब्राह्मणि । दोनि प्रेश्न आरंभिले निर्वाणिं । ते प्रतिज्ञा करुनि । बोलति जालि ॥६१॥
कुरंग वधालागि जैसा । व्याधु बाणु लावि धनुशा । तें निवारतिनां तैं कैसा । वाचैल प्राणु ॥६२॥
या परि गा आतां व्दिजा । दोनि प्रेश्नु घालिजति पैजा । ते साधकुनि बोजा । उत्तर देई ॥६३॥
हे प्रश्न न संघसी मुनि । तरी तुझी मूर्ध्रि पडेल मेदिनी । प्रश्न साधला न मनि । त्यां हे चि गति ॥६४॥
पाठिं याज्ञ्वल्क्यु ह्मणे गार्गि । ते प्रश्न पुस तुं वेगी । एरु ह्मणे अभिमानाचि धगी । सांडी आतां ॥६५॥
ये व्दिजवृंदें सकळें । तुवां जिंकीलि ज्ञानबळें । तरि माझे प्रश्नसर आगळे । सांघ कीं आतां ॥६६॥
या ब्रह्मांडा खालिवरी । काये आहे बहिर भीतरी । आपुला प्राणु रक्ष निर्धारी । सांग येक प्रश्न हा ॥६७॥
तवं येरु गर्जुन ह्मणें । हें उर्व वेष्टीलें गगनें । या अंतरबाह्य तेसणें । ते चि असे ॥६८॥
हें मानलें ब्राह्मणि । दुजा प्रश्न बोले वचनी । आतां सांग विचारुनि । निर्वाण पृछा ॥६९॥
हें गगन कोठें पुरे । आहें कोणाचें आधारें । याचें ज्ञान थारे । कोणाचां ठाइ ॥७०॥
यावरी याज्ञवल्क्यु बोले । जेणें हें नभ दाटलें । यासी अंतादिमध्यें संचले । तें चि असे ॥७१॥
असें जें पूर्णेंसी पूर्ण । तें परब्रह्म कारण । ज्यासी उत्पति स्छिति मरण । असे चि ना ॥७२॥
ते या आकाशातें जाणें । आकाश रक्षिलें तेणें । ज्याचेंनि स्वरुपज्ञानें । सर्व सीधी ॥७३॥
तो सर्वकर्मारहितु । असा परमात्मा साक्षांतु । हे आइकोनि मातु । संतोशे गार्गि ॥७४॥
मग त्या साष्टांगी नमन केलें । पाठीं येरा ब्राह्मणांसी बोले । तुमच्या प्रश्नाचें केलें । न चले यासीं ॥७५॥
माझे प्रश्नशस्त्रें निर्वाणें । ते तुंश करुनि निवारली येणें । आतां पुसणें बोलणें । उरलें नाहिं ॥७६॥
तर्‍हिं साकल्या प्रश्न नेमि । तो त्याचि चि मुर्ध्रि गळें भूमि । कां जे सत्यासी असत्यकामी । नकारु केला ॥७७॥
आत्मा सर्वत्रां व्यापुनि संपूर्ण । सर्वभूता सारिका समान । असें जो न मनि वचन । त्या हे गति कां नोहे ॥७८॥
राजयांदिकां चि श्रधा धाए । तैसें तो रुषि बोलताये । यास्तव सर्व श्री समर्पुनि साष्टांगिं राये । प्रणिपातु केला ॥७९॥
अश्व गौ गज रथ दासी । दाहा दाहा सहस्र असी । आणि सुवर्ण रत्नाच्या राशी । अप्रमित ॥८०॥
असीं उचितें उचित । प्रश्नपरिहारीं राजा देत । यापरी वेळां बहुत । उचितें जाली ॥८१॥
ये उचितें ब्राह्मणां । देतां वोहटुन धरी राणां । परी या आतां चि पूजना । मर्यादा नाहि ॥८२॥
पुढां चतुर्थ पाठकु येईल निश्चया । तो समार्जन करील संशया । श्रधा बाणैल राया । सर्वेपरी ॥८३॥
पूर्ण देखोनि आत्मस्थिति । पुसे जनक चक्रवर्ति । सर्वामध्यें श्रेष्ट ज्योति । कोण रुषी ॥८४॥
चंद्र सूर्यो वन्हि वाचा । रुषी पक्षु घे याचा । यासी अभाव देखे साचा । राजाधिराजु ॥८५॥
अज्ञातशत्रु विदेह नृपु । असा करी आक्षेपु । यावरी याज्ञवल्क्यु पूर्णदोपु । आत्मा प्रतिष्ठि ॥८६॥
जयासी उदो ना अस्तु । जो सर्वां पुरला स्वस्तु । जो नित्य शुधु समस्तु । प्रकाशरुपु ॥८७॥
तो आत्मा कवणें स्थानी । पुसे राजशीरोमणि । येरु ह्मणे ईहस्थानि । अपरु एकु ॥८८॥
परस्थानिचा दुसरा । यासी जाणें तो तिसरा । ‘ संधि तृतीयगं ’ या उत्तरा । संधीचा होये ॥८९॥
हें हिं नकारिं नरेश्वरु । यावरि बोले रुषीश्वरु । आत्मा पूर्ण परात्परु । व्यापकु सर्वां ॥९०॥
या पुढां भेदभाजनि । जाणु थापटि अव्दैतपणिं । संशयातें मार्जुनि । बोले पुढां ॥९१॥
जें पिता अपिता । माता अमाता । देव अदेवता । येकपाडु ॥९२॥
लोक अलोक । याज्ञिक अयाज्ञिक । ज्ञाते अज्ञाते आणिक । पवित्रा अपवित्र ॥९३॥
ग्रामस्त अरण्यवासी । विलासी आणि तपसी । ग्रहस्त आणि सन्यासी । निवाडु नसे ॥९४॥
सुनिष्ट अनिष्ट । धर्मिष्ट अधर्मिष्ट । सुष्ट असुष्ट न्यून अश्रेष्ट । आत्मपल्लवी ॥९५॥
मौन्य आणि वाजट । गुह्य आणि प्रगट । या सर्वां एकवाट । आत्मविषयीं ॥९६॥
याही वरी वेदवचन । तुज देउ प्रमाण । जें व्दैतातें ग्रासुन । श्रृती चाले ॥९७॥
अव्दैतं न पश्यती । व्दैत पाहिजे हे भ्रांति । डोळां नेदखें श्रृती । व्दैतमात्र ॥९८॥
यव्दैतं न जिघ्रति असे । व्दैताचा गंधु नसे । मां घ्राणा येईल कैसें । नाहिं चि जे तें ॥९९॥
यव्दैतं न रसयंति विजानन्वैत । सर्वथा नाहिं चिं पां व्दैत । मा रसस्वादु चा कृत । कोठोनि लाभें ॥१००॥
ये व्दैतं न वदति । वदना नाहि युक्ति । कां जे तें बोलतां बोलापुरती । उरि नसे ॥१॥
ये व्दैतं न श्रृणोति । श्रवण आइकुं लाहाति । तर्‍हिं व्दैताचि श्रृती । वार्ता नसे ॥२॥
ये व्दैतं न मनुते । मन मंतव्यं निरुते । पाहातां याचेंहि हाते । व्दैत न लभे ॥३॥
ये व्दैतं न स्पृशति । हा निर्धारु बोले श्रुति । व्दैत नातळे निश्चेति । जालि येथें ॥४॥
ये व्दैतं न विजानाति । व्दैत नाहि नसे भ्रांति । जानपनाचि संतति । कैचि येथें ॥५॥
व्दैत नाहिसाच मान । ते काय जाणावें ज्ञानें । नाहि त्यासी विज्ञानें । निर्धारु काई ॥६॥
हा हो सर्पाचे चरण । मोडितां येश तें कवण । व्दैत नासतां निरसन । व्दैताचें तैसें ॥७॥
परब्रह्म येक असे । तेथ व्दैत वावसे । येथ वेदश्रुति असें । रुप केलें ॥८॥
स लीलयेको द्रष्टा व्दैतो भवति । असे गर्जति श्रृति । हें ब्रह्म चि ब्रह्मप्रवृत्ति । व्दैतदृष्टा ॥९॥
हे सर्वहि ब्रह्मजळ। दृश्य तरंग सकळ। हें मि कां बोलो प्रांजळ । श्रृति सांगे ॥१०॥
देशस्तेंमधें ब्रह्मज्ञान । वरि श्रृतिचें प्रमाण । या निर्धारासी आण । तुळे नये ॥११॥
ब्रह्मविदांचे सभेप्रति । पूर्णब्रह्म प्रतिपादिति । त्याची श्रृतिची संपती । वोडऊ आतां ॥१२॥
सवाऽयमात्मा सर्वस्य । तरी भेदु नाहि अवश्य । हें सर्व ज्यासी दृश्य । ते चि ब्राह्मण ॥१३॥
एष नित्योमहिमा हें सर्वत्र । ह्मणे ते ब्राह्मण पवित्र । कर्माकर्में सर्वत्र । न लिंपे तया ॥१४॥
प्रगटलां हुति जैसें पडें । ते ते भस्म होय तेवढें । ब्रह्मीष्टां कर्म येणें पाडें । फळद नोहे ॥१५॥
ब्रह्म तं परादातु । यो नेत्रात्मनो ब्रह्में गर्जतु । सेवटीं बोले निभ्रांतु । सर्व यदयमात्मा ॥१६॥
यास्तव यें सर्व भूतें । आत्मरतें आत्मनि चळितें । हा आत्मा चि वेदमतें । गोठला सर्व ॥१७॥
सस्तथा सैंधवघन । अंतरबाह्य प्रमाणा । आकारां आलें लवण । तर्‍हिं गोठलें जळ ॥१८॥
जळ चि जालें सघन । नव्हे दुसरें लवण । तेवी आत्मा भूतेंभीन्न । न मनें श्रृती ॥१९॥
यास्तव कोणेंहि प्रकारे । ब्रह्मी नाहि दुसरें । एवं वेदां चि उत्तरें । गौरवलि येथें ॥२०॥
माया महदादि गुणात्मिक । कर्मधर्मेंसी पंचभूतिक । दृश्यादृश्य सकळिक । ब्रह्म चि हे ॥२१॥
कारण कार्यें समे विषमे । थूळें सूक्ष्में थावरें जंगमें । वर्णभेदरुपें नामें । ब्रह्म सर्व ॥२२॥
हें जे जें आकारासी आलें । ते तॆं ब्रह्म चि संचलें । यासी पुरोनि उरले । ते सदोदित ॥२३॥
असें ब्रह्म सदोदित । दाटलें पूर्ण सत्सिध । या वेगळें कांहिहि व्दंद । उरलें नाहि ॥२४॥
अध उर्ध बहिरंतर । सव्या अपसव्यें परा अवर । पूर्ण दाटलें तरी येर । निवेडॆल कैसें ॥२५॥
ते हें परब्रह्म पूर्ण । पूर्णें पूर्ण चि पुराण । पूर्णेसी पूर्ण पुरोन । पूर्ण चि उरलें ॥२६॥
हें पूर्णें पूर्ण घेति । त्रुप्त जालीया वेदश्रृती । त्या ढेंकरु देती । पूर्ण तो असा ॥२७॥
पूर्ण धर्मि त्रुप्त जाल । वेदें आनंदे डरु फोडीला । तो निर्धारु बोलिला । कांडिका असा ॥२८॥
पूर्णमद: पूर्णामिदं पूर्णात्पूर्ण । हें वेदाचें शुध वचन । असें सर्वरत सर्व समान । परब्रह्म ॥२९॥
हे चि श्रृति बोले आपण । खं ब्रह्म खं पुराण । येदथीं देखीलें गगन । पूर्णब्रह्म ॥३०॥
एवं सर्वासी व्यापक । व्योम पुराण पूर्वक । दृष्टांतायोग्य सकळिक । तुळे बैसे ॥३१॥
पूर्वापर सुचितां असें । व्योम अनादि ब्रह्म कैसें । सृष्टीकर्मि कार्य दीसे । अहंकारजनित ॥३२॥
हें आकाश चि ब्रह्म असतें । तरी गार्गिचा प्रश्नी रुशीमतें । ब्रह्म ते या परुतें । येथ चि बोलिलें ॥३३॥
ब्रह्म आकारें वांटले । उरलें तें नभीं दाटलें । खं पूर्ण बोलिलें । या चि स्तव ॥३४॥
असें हें पांच हि पाठे उपनिषद । बेलि ब्रह्म चि प्रसिध । यामाजि कोठें हि व्दंद । थापीलें नाहिं ॥३५॥
समस्तां ब्राह्मणांतें जिंतले । राजप्रश्न सीधि नेले । येश घेउनि रुषी आले । आपुलेया घरा ॥३६॥
त्या याज्ञवल्क्याच्या भार्या दोनि । मैत्रि आणि कात्यायनि । कात्यायनि कनिष्ठ ब्रह्मवादीनि । मैत्रि ते ॥३७॥
जे जे यागी बोल जालें । ते ते मैत्रईसी वदले । असें पूर्ण प्रकाशीं आले । अरण्यकांड ॥३८॥
तरि आईक शिष्या उतरें । या वेदाचें आधारे । प्रपंचाचें डगरें । असावें पुरुशें ॥३९॥
फलाशारहित हावे । शुभ ते ते आचरावें । यास्तव इंद्रादिक मनोभावे । बेदु वंदिति ॥४०॥
ब्रह्मा येवढा समर्थु । तोहि न संडी चि वेदार्थु । वेदाचा सर्व पंथु विष्णु चाली ॥४१॥
समर्थ शंभु ब्रह्मदेही । तो हि नोहे वेदबाहि । जनकादि सर्वज्ञ ते हि । वेद पाळती ॥४२॥
वेदाचि हे चि महिमा । पूर्ण दाखवी परमात्मा । तर्‍हि आपुलीय स्वधर्मा । सांडु नेदी । ४३॥
ब्राह्मणां क्षत्रियां वैशां शुद्रां । जे धर्म भागा आले शिष्येंद्रा । ते न संडावे हे मुद्रा । वेदें घातलि ॥४४॥
वेदाचे आज्ञेज्पासून । वर्त्ततांय त्रिभुवन । यास्तव सर्वत्रासी प्रमाण । वेदु चि हा ॥४५॥
वेदु ब्रह्मीचा उभारा । निगाला प्रपंचमोहरा । बोलतां प्रपंचविकारा । ब्रह्मलोपी ॥४६॥
पाठि अरण्याचें वडिवारें । कर्मेंसी ब्रह्मी संचरे । मंग वारुनी साकारें । ब्रह्म बोलें ॥४७॥
जैसें वारुनि फेन कल्लोळ । निवडोनि घेईजे जळ । तैसें व्दैतांतर सकळ । ब्रह्म घेनें ॥४८॥
प्रापंचिकु भेदि राहे । यास्तव तो संसारि आहे । ब्रह्मनिष्ट यातें न साहे । तो अनारिसा ॥४९॥
हें विश्व ब्रह्म चि सकळ । यासीं संशयें भवमळ । निरसी संशयाचें मूळ । ब्रह्मज्ञान हें ॥५०॥
पडें जळाचें वांकडे । निर्गलस्थान कोरडें । ते चि ब्रह्मीष्टा न घडे । संसृती हे ॥५१॥
गुळ चि रे लाग्रे विष । ते अंतर सदोष । तैसा प्रपंचु आरुश । प्रेमें घेती ॥५२॥
यास्तव निर्धार वेदा । भेदु नये उपनिषदा । तो निरसीता जालि निंदा । व्दैताचि येथें ॥५३॥
नश्वर नाशीवंत आरुते । तें चि न घ्यावें स्वचित्तें । कां जे शाश्वत तें येणे व्दैतें । ब्रह्म सायुज्य न घडॆ ॥५४॥
कोण्हि स्वप्रि बुडे मृगजळिं । तो जागना वस्त्रे पीळि । तै व्दैताचि सुकाळी । धाता ज्ञाता ॥५५॥
शैवांचा विमानि बैसौन । नव्हे वैकुंठी गमन । व्दैतारुढ परमस्थान । न पवे तैसा ॥५६॥
माळेचा पदिं कौळिका मोक्षु । तैसा हा व्देतपक्षु । यास्तव आत्मा प्रतक्षु । श्रृति सांगे ॥५७॥
चर्मभाताचा वारा । वितळु नेनें मेघडंबरा । तै व्दैतबुधी संसारा । सांहारु होती ॥५८॥
मृगजळीं तारु । घालुनि उतरीजे पारु । तैं भेदज्ञानें संसारु । तरिजता हा ॥५९॥
असो हें वंधेचेनि कुमरें । वस्ति येति गंर्धवपुरें । तैं व्दैतबुध्दि संसारें । जींकीजे ते ब्रह्म ॥६०॥
सृष्टी जळे रत्नदीपें । तैं भेदें संसारु पलपें । यास्तव भेदाचें जाउपें । राखो नये ॥६१॥
येवं सकळहि व्दंव्दें । नेमें निरसीली वेदें । हा चि उपनिषदें । नेम केला ॥६२॥
तेथीचिये अर्थ पदें वाडें । आह्मि वेचुनि घेतलें थोडे । का जें शीष्य निरुपनी कोडें । पुरवावी ह्मणौनि ॥६३॥
कीजे हें पठन श्रवण । तैं निवारे जन्ममरण । महा दोशा विध्वंसन । हें चि होये ॥६४॥
कर्मा अकर्माच्या राशी । हो कां अखंड प्राणियांसी । हेलामात्रे त्यासी नासी । प्रबोधु येथीचा ॥६५॥
व्रत तप तीर्थ क्षेत्र । स्नान दान स्तोत्र मंत्र । साधी साधनें सर्वत्र । न तुळे यासी ॥६६॥
जेणें ब्रह्म होईजे देहें । या परतें काये आहे । ह्मणौन तु लाहे लाहे । हें चि घेई ॥६७॥
एवं सिध्देशाचें प्रसादें । त्रिंबकु बोले ब्रह्मानंदें । शिष्या तुं श्रृतिसंवादे । निश्चळ राहे ॥१६८॥
इतिश्री चिदादित्यप्रकाशे श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडे श्री उपनिषदानुसरित नाम नवन कथन मिति ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP