उत्तर खंड - माहावाक्यप्रबोधो

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


उपादानं प्रपंचस्य ब्रह्मणोन्यत्र विद्यते ।
तस्मात्सर्वप्रपंचोय ब्रह्मैवास्ति न चेतर: ॥१॥
आतां निर्धारासी निर्धारु । माहावाक्य कथन करुं जेवि कोंदने दाटला अलंकारु । निडारु दावि ॥१॥
यव्दिषई माझें बोल । आहाचां मतां महा खोल । परि वेदविदा निर्वोल । होउ नेणती ॥२॥
हे ब्रह्मीष्टां सुदेसीक । शिष्यां प्रकाशादीपक । प्रापंचिका करनाटक । बोल ते हें चि ॥३॥
हे वेपकां सुधाताट । पाखांडीया काळकुट । दरुदशा तिखट । खड तेहे ॥४॥
ज्यासी जो कालु फावे । तेणें तितुकें पढावें । प्रदोश दोश न मनावें । याचां ठाइं ॥५॥
‘तत्वमसि ’ माहावाक्यें । यव्दिषईं होये शक्यें । ‘तत्पद ’ ‘त्वंपद ’ ऐक्ये । होये तें असी ॥६॥
‘त्वं पदे’ जीवात्मा । ‘तत्पदे ’परमात्मा । या दोहीं ऐक्यामा । ‘असी ’ पद ॥७॥
या जीवेश्वरा मळ । माया अविद्या सबळ । हे सारुनि उरे केवळ । परब्रह्म ॥८॥
हे माहावाक्य प्रमाण । मानिति ते चि ब्राह्मण । कां जे ब्रह्मेंविण सुपण । बाणें कैसें ॥९॥
उपजत शुद्राचें लक्षण । व्रतबंधे व्दिजन्मन । कर्म क्रिया पठण । ते विप्र ह्मणावे ॥१०॥
जे ब्रह्मी अखंडमान । ज्याचां ठाइं ब्रह्मज्ञान । तें निर्धारें ब्राह्मण । येर नामधारक ते ॥११॥
आत्मतत्विं बुधी निकी । ते चि ब्राह्मण येह लोकी । तयासी उपमा आनिकी । नसे बापा ॥१२॥
जे जन्मसंसारिक जाले । शुध ज्ञान दुरावले । ते चि शुद्र बोलिले । वेदविदि ॥१३॥
शुध सुसंत सुगम । सच्चिदानंद संपूर्ण उत्तम । सुशब्दे निसीम । जाणिजतॆं ॥१४॥
तें द्रवलें ह्मणीजे गलीत । गलोंनि जालें दुरत । असें जे ज्ञान रहित । तें चि शुद्र ॥१५॥
एरवी जे शुद्र वर्ण । त्यासी चि नेमु शुद्रपण । तरी हे ज्ञाती भाग गुण । विशेषता ॥१६॥
ब्रह्मदेह ब्रह्मिष्ट । नाही जालें परिनिष्ट । ते शुद्र वाचुनि शुष्ट । ह्मणावें कैसें ॥१७॥
शुध्द ब्रह्म सजाति । पडे भेदाचें विजाति । तो शुद्र न पवे संतती । ब्रह्म निधीचि ॥१८॥
तयां तद्रुपीं वृतबंध । तेणे चि ते होति शुध । ज्यासी अंजिन प्रसिध । बोधरुप ॥१९॥
परा वराची एकटी । प्रवर संबंधे पडे गांठी । तो चि मेखला कटी । मिर्वे तया ॥२०॥
दंडावा बाह्य प्रपंचु । तो चि विचारु दंडु साचु । फलाशा रहित करी संचु । सत्कर्माचा ॥२१॥
ब्रह्मी विचरती चातुर्य । तें ची बाणे ब्रह्मचर्य । मायातीत असंसार्य । ऊँ ळखावे ॥२२॥
अहंता संशय मुंडन । गुरुजन किं लागे लग्र । ते ब्रह्मरुप ब्राह्मणं । तें चि दिसी ॥२३॥
जीवा अंतादि मधिं । असी जे कलेसंधी । ते चि संध्या उपाधी । रहित त्याची ॥२४॥
सचिदानंद पद सूत्र । कंठी मिरवीति पवित्र । सोहं ब्रह्म सर्वत्र । हे चि सीका ॥२५॥
सदें सदा अवतरण । तें चि त्त्या पौंड्र धारण । आनंदु चि प्रावरण । होय त्याचें ॥२६॥
जो इंद्रिया दमनु । तो चि निर्धारु कुपीनु । मन मुद्रा रक्षणु । मौन्ये साधे ॥२७॥
सर्वातर आदिअंती । ते ऊँ भवति भिक्षा घेती । व्दैताव्दैत हुति देती । ब्रह्मग्रीसी ॥२८॥
संसार मल क्षालन । पुर्णार्णवीं सदा स्नान । ब्रह्मत्विं संचिळपन । शाश्वत आगीं ॥२९॥
त्यापरी ते ब्राह्मण । जालें त्याचें कथन । आतां करु निरुपण । महावाक्यें ॥३०॥
॥इतिब्रह्मरुपब्राह्मण ॥ऽऽ॥
====
आतां माहावाक्य आत्मगुंज । जै सौम्यवचन परम बिज । तें येथा प्रमाणेंसी तुज । निरुपण करुं ॥३१॥
शिष्याचि पाहोनि प्रज्ञा । कीजे उपदेशु सर्वज्ञा । हें संप्रदाई संज्ञा । ठाई होनि ॥३२॥
‘तत्वमसि’ त्रिपदा । हें प्रमाण मानलें वेदा । नाशावया भेदा । परमायुध ॥३३॥
वस्तु विस्तार पदत्रयें । पद व्दईं कारण कार्ये । ‘असि ’ पद निस्पर्य । शुध्द ब्रह्म ॥३४॥
त्वं पदाचें लक्षण । अविद्या कार्ये जीवात्मा कारण । तत्पदिं ईश्वरु प्रमाण । माया कार्य ॥३५॥
येथ वाच्यु आणि लक्षु । पद व्दइ व्दे व्दे पक्षु । संसर्गिकु प्रत्यक्षु । दिसे असा ॥३६॥
हिरण्यगर्भु विराटु । हे देह व्दय प्रगट । इत्यादि प्रपंच घट । परमेश्वरी ॥३७॥
प्रणव मात्रुका अहंकारु । इंद्रु ब्रह्मा हरिहरु । दिसे उच साकारु । तो प्रपंचु तेथें ॥३८॥
हा संसर्गिकु वाच्यार्थु । घेतां नोजडे परमार्थु । जेथ नव्हे ऐक्यार्थ । तो चि वाच्यु ॥३९॥
यासी प्रत्यक्ष प्रमाण । सचिदानंद कारण । ब्रह्म नि:प्रपंच हें लक्षण । लक्षांसाचे ॥४०॥
आता व्दितीये वाच्यु लक्षु । तोहि सांगो व्दयपक्षु । प्रपंचु प्रत्यक्षु । अर्थु असा ॥४१॥
जे देहव्दय लिंग स्थुळ । विकार मनादि सकळ । अविद्या पूर्वक सबळ । वाच्यु जीवा ॥४२॥
देहव्दयें विकारु । जीवा प्रपंचु साचारु । संसर्गिकु शब्द वेव्हारु । वाच्यांसु हा ॥४३॥
लक्षु तो असा उत्तमां । हा जीउ नव्हे ना जीवात्मा । पाहातां येकु ची परमात्मा । अखंडमान ॥४४॥
जीवाचा प्रपंचु निरसे । उरे नि:प्रंपच आपैसें । हा चि लक्षांशु असें । वोळखावे ॥४५॥
वाच्यु वर्जुनि घेनें लक्षु । तो हा जीवेश्वरु प्रत्यक्षु । येणें भेदाचा पक्षु । सर्व ही मोडे ॥४६॥
जो जीतुका भेदु सरे । तो तो असी पदार्थ उरे । यास्तव भेद ची उत्तरे । ईडा लावी ॥४७॥
॥इति अंसव्दये ॥ऽऽ॥
====
जाला वाच्य लक्षु बोधु । आतां सांगो सबळ शुधु । जो नश्वरु तो प्रसिधु । केवि होये ॥४७॥
जीवा नाथिली अविद्या । हे भवदायक सद्या । ईश्वरीं माया विद्या विरुध स्फुरण ॥४८॥
सबळ अविद्या भ्रांति । जीऊ नीगे संश्रुती । जो पडला भेदाचें आवर्त्ति । तो सुखकैचें ॥४९॥
मुख्य अविद्या कर्म आटे । तैं अनावृत्ति सुख भेटॆ । फेडोनि सबलाचें कवटें । शुध घेनें ॥५०॥
माया अविद्या मोहोनि जीवेश्वरा । हा प्रपंचु नव्हे दुसरा । भ्रांतिपणें उभारा । उठे तेथें ॥५१॥
तेथ प्रमाण शास्त्रवानी । ये माया स्व आश्रो अव्यामोहिनि । ते त्या ईश्वरा कैसेनि । बाधक होये ॥५२॥
येथें सांगों येकिं मातु । जें मूळि चि देवो तो आकृतु । तेथें हि उपजे हेतु । कर्तव्याचि ॥५३॥
ते चि माया सबळ । ईश्वरु आश्रो निर्मळ । तें निरसीतां केवळ। शुध उरे ॥५४॥
अविद्या माया निरसे । उरे ब्रह्म जैसें तैसें । पाठिं भेदाचें वळसे । न पडति श्रृती ॥५५॥
भेदु सरता शुध । उरें तें ‘असी’ पद । ते चि देखति सुविद । येक ब्रह्म ॥५६॥
॥इति सबल शुध भेद ॥ऽऽ॥
====
येथ त्यागु आणि अत्यागु । तिसरा त्यागात्यागु । याचा प्रबोधी योगु । पूर्ण होये ॥५७॥
त्यागु तें जहर्लक्षण । अत्यागु अजहर्लक्षण । जहदाजह लक्षण । त्यागात्यागु ॥५८॥
विदेश कालु स्वसंगु । माने जिवित्व वियोगु । हा सांडीजे चांगु । जहर्लक्षणा ॥५९॥
आत्मा भदोनास्ती । असी होए वस्ती । या भेदाचि पुरे वस्ती । अजहर्लक्षणी ॥६०॥
सरे आत्म अभिमाणु । तो जहदार्लक्षणु । त्यागा त्यागु हि आणु । बोलों नये ॥६१॥
त्यागु जें आशातजनें । अत्यागु सांडवे मनें । हेतु नुरे तो वोळखनें । त्यागात्यागु ॥६२॥
कोन्हि स्वदेशी देखीला । तो चि विदेशी भेटला । यासी भेदु मानिला अकारणु ॥६३॥
तो चि देवदत्तु असें । निर्धारिं मन बैसे । लक्षण त्रई तैसें । विचरावें ॥६४॥
तेवी ईश्वरु संचला । जीविं निर्धारु मानिला । प्रपंचु भेदु सरला । लक्षण त्रई ॥६५॥
विदेंसी भेदु दीसे । बाणे स्वयं देवदत्तु असें । हे हि हेतु निरसे । अभेदपणी ॥६६॥
॥ इति लक्षणत्रयें ॥ऽऽ॥
====
विजाती सजाति स्वगत । हें भेदत्रय अनुचित । हें सांडोनि शाश्वत । ब्रह्म घेणे ॥६७॥
जीव ब्रह्म साचारु । घॆ प्रपंचाचा डोगरु । तैं विजाती संचारु । जाला चि तो ॥६८॥
सर्वस्यात्मा भवती । असी होये निश्चेती । विजाति भेदाची शांती । ते ची होये ॥६९॥
आत्मा भेदो नास्ती असें । स्वरुप अखंड प्रकाशे । स्वयं सजाति भासे । तर्‍हिंहि भेदु ॥७०॥
जालें ब्रह्म केवळ । स्वयं ह्मणता कीडाळ । तो स्वगत भेदुबळ । पावें येथें ॥७१॥
तद्रुप जालयां लक्षां । मागिलु भेद नुरेति शिष्या । निराशी नुरे अपेक्षा । हे स्वगत जोडे ॥७२॥
हें हि निपटोनि जाये । तै स्वगत कोण गाये । एवं भेदाचें ठाये । ठाइं सरती ॥७३॥
विजाती भुत सीधारे । सजाती दाघु संचरे । स्वागत धर्मानंतरे । सुध होये ॥७४॥
अपस्मारु सजाति । प्रलापु दाघु विजाति । स्वगत दु:ख निवृत्ति । शुध होये ॥७५॥
विजातिवर्णपतितु । तो सजाति । स्ववर्णि वर्त्ततु । तेथी चि उरे हेतु । तें स्वगत माणें ॥७६॥
यें सांडवलि जाति तिन्हिं । तैं भदातें नेघे कोन्हिं । भेदु सरतां दोन्हिं । नुरति पक्ष ॥७७॥
व्दैताव्दैत निरासीं । वासना जाये सरीसी । उरला पक्षु भेदांसी । हातु नेदी ॥७८॥
॥इति भेदत्रयनिरसन ॥ऽऽ॥
====
असतया आत्मस्वरुपा । नाम भेदु कैंचा बापा । उघडलें आत्मस्वरुपा । जगतु सर्व ॥७९॥
हा आत्मा क्षिरानिध । जीव तेथीचे बुध्दुध । जीव लेणें अभेद । आत्म हेमिं ॥८०॥
आत्म पटु जीववाणि । आत्मघृत जीव कणि । आत्मनादध्वनि । जीवशव्द ॥८१॥
आत्महुंती जीव दीप । आत्मग्रामिं जीव लेप । आत्ममृत्तिके तद्रुप । जीव कुंभ ॥८२॥
जीव तंतु आत्मपटलिं । जीव गोडी आत्मगुलि । आत्म पोतासी खाली । साच जीव ॥८३॥
आत्म व्योमि जीव मेध । आत्म जळी जीव तरंग । आत्मा भानु अनेग । जीवकर ॥८४॥
हा आत्मा जीवाकारें । प्रत्यक्ष वाटला बा रें । जेवि लवण आकारें । समुद्र पाटॆ ॥८५॥
नशुध्या सुताची गांठी । सुतग्रंथी पांठी पोटी । कां करवंटे करवंटी । राशी जैसी ॥८६॥
यास्तव भेदबंधा । तो डावे गां शीष्यबुधा । तैं जीउ वोघ तो शुधा । ब्रह्माब्धीचा ॥८७॥
या जीवाचां दाटणी । तें च भरलें भरणी । येर नभातें गीवसुनि । सदाट असे ॥८८॥
ते सर्वादि पुराण । सर्वत्र होउनि सर्वा समान । अनुमानही अधीक न्यून । नसें कोठें ॥८९॥
॥इति अभेदप्रतिपादन ॥ऽऽ॥
====
तें निर्मल शुध बुध । स्वयं प्रकाश सत्सीध । नित्य अविनाश प्रसीध । सर्व मुक्त ॥९०॥
सत्य स्वभाव निर्गुण । निर्विकार निरंजन । पूर्ण पूर्णेसी पूर्ण । निरावय ॥९१॥
ते सूक्ष्म सदोदित । अवस्ता काल रहित । नैवायु नैवकृत । न मृत तें ॥९२॥
तें अनादि अनंतपर । अगम्य अलक्ष अगोचर । अछिद्र अभंग असंसार । अनाश्रय ॥९३॥
तें सुख साचार शाश्वत । अवछिंन्न सदंत । सुगम शांतु साळंकृत । तत्वसार ॥९४॥
अजु अक्षर अच्युत । अजन्म अविनाश अविकृत । पुराण प्रबुध सवर्गत । सर्वमूळ ॥९५॥
अमर्याद अव्यागत । अकाल भेद अजात । अक्षर अचर अनजात । आदि वस्तु ॥९६॥
ते ध्रुव थीर थावर । अमृत सद साचार । विज्ञान ज्ञेय भांडार । जगव्दीज ॥९७॥
ते सुशोभ्य सर्वरमन । सर्व काष्टां सघन । ईश प्रकाश आवरण । भूतांतर ॥९८॥
॥इति ब्रह्माभिधान ॥ऽऽ॥
====
एवं ब्रह्मणि ऊँ पाधी । येथुनी चळैल बुधी । ह्मणौनि माहावाक्यें चौंवेदिं । दिधले स्तंभ ॥९९॥
नित्य विज्ञान ब्रह्म हें सार । ब्रह्म निर्धारीं उत्तर । हें महावाक्य सुंदर । रुग्वेदीचें ॥१००॥
ज्ञान निर्धारांसी आलें । तें चि ब्रह्म संचलें । एवं यासी रुप केलें । आदिवदै ॥१॥
‘सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म ’ । ‘ब्रह्माहमस्मि ’ हें वर्म । असें माहावाक्य उत्तम । यजुर्वेदिचें असें ॥२॥
ब्रह्मभूत येकत्र । ब्रह्म देखे सर्वत्र । हें माहावाक्य पवित्र । व्दितीय वेदी ॥३॥
‘तत्वमसि ’ पदज्ञान । हें येक चि प्रमाण । येथे नेदखे भिन्न झ। वेद श्रुति ॥४॥
जीवात्मा तो ची परमात्मा । हा येकु चि सर्वात्मा । असी वाक्यार्थ सीमा । सामवेदिं ॥५॥
नमे ऐक्यं ज्ञानाये । सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्मये । इत्यादि वचने होये । हें चि सत्य ॥६॥
एवं वेदाचि वचनें । सर्वाद्य मानावीं प्रमाणें । याहि पर बोलणें । काये असे ॥७॥
आणिक योगिया महावचन । घेति सोहं प्रमाण । पंचमा वेदिं कारण । सार ह्मणति ॥८॥
जे चहुं वेदाची दशा । जे ईश्वरीं आदिभाशा । तो पंचमा वेदु असा । बोलु त्याचा ॥९॥
तेथ सोहं वाक्य उत्तम । जे मिं अनादि शुध्द ब्रह्म । ब्रह्म मिं नेसिम । विश्वब्रह्म ॥१०॥
ते मिं मीं ते असें । सर्व भूतां सरिसें । येथ नाहे अनारिसें । शेषमात्र ॥११॥
माया अविद्या विवर्त्त । जीव ब्रह्म चि शाश्वत । तेथ दिसे अनुचित । भेद लक्षणें ॥१२॥
॥इति माहावाक्यानि ॥ऽऽ॥
====
हा आत्मा साचारु । केला वाक्यनिर्धारु । दृढ होवावा विचारु । मंदबुधाचा ॥१३॥
जर्‍हिं हें प्रत्यक्ष प्रमाण । तर्‍हिं शोभे वेद वचन । कां जे वेद श्रुती वाचुन । रुप नव्हे ॥१४॥
याहिं पुढां असा नेमु । दाखउ विवर्त्तु परिणामु । तेथ सर्वही भ्रमु । सरैल तुझा ॥१५॥
तु ह्मणसी श्रृष्टी रचिली । हें कोन्हें विपाईली । ते चि विस्तारुं बोली । पुढीला कथनी ॥१६॥
जालेयां सिध्देशाची कृपा । मार्ग उघडे सोहपा । त्रिंबकु ह्मणें ते पडपा । येतील बोल ॥१७॥
इति श्रीमव्दालवबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे अवसानखंडेविवरणे माहावाक्यप्रबोधो नाम चतुर्थ कथन मिति ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP