मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
सात्विकोत्पन्न

आदिखंड - सात्विकोत्पन्न

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


असें तामसें जनिलें । पाठिं सात्विकें काय केलें । अंत: करणाचे आरंभलें । जन्म तेणें ॥३७॥
ज्ञानशक्तिसी सात्विकें । जनिली अंत:करणादिके । जें इंद्रिय गुण नायकें । सत्तारुपें ॥३८॥
ते येक चि अंत: करण । चतुर्भाग जाले भिन्न । परि पंचीकरणी प्रमाण । पांचाचें असे ॥३९॥
नभाचा अंशु अंत:करण । तथा चि वायोचें मन । बुध्दि तेजापासुन । रुपा आली ॥४०॥
आपा पासुन ये चित्त । अहंकारु तो भूत्व जात । सात्विक ज्ञानसहित । प्रसवला असें ॥४१॥
॥इति सात्विकोत्पन्न ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP