मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
अव्दैतनिरुपण

आदिखंड - अव्दैतनिरुपण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


ज्ञाता पूर्ण पद लाहे । हें भेदवाकां न साहे । तर्‍हिं गा भेदु नोहे । कारणरुप ॥६८॥
जैसें वापी तटाकरुप । हें सर्व येक आप । सरितें हि तद्रूप । परि प्रेमाचिते ॥६९॥
ते समुद्रीं समरसे । एर वेगळें दिसें । प्रपंचिक ते तैसें । भेदावले ॥७०॥
तेथेचिं आटे तें पाहि । उदधी वाचूनि गति नाहि । परि सरितेची कैसी नवलाई । रोकडिचि ॥७१॥
तेवि ज्ञाता ब्रह्म देहे । येरां काळांतरी आहे । एवं तुं ब्रह्म लहि । रोकडें ची ॥७२॥
हे समब्रह्म सर्वजना । प्रकृति आन आन वेधना । जैसा तरंगतति उत्पत्ति मरणा । दुजा नये ॥७३॥
किं वाद्यजाता माझारी । नाद उमटति नानापरी । किं अळंकाराच्या भरोवरी । हेमी येकें ॥७४॥
कीं येकीं वृक्षीं डाळें । येक फुटे येक वाळे । तैसी चि दीसति फळें । एकें भावें ॥७५॥
किं येकें देही असतां इंद्रियां व्यापार बहुतां । तैसें हें भूतजात ।भिन्न भावीं ॥७६॥
असो श्रीसिध्देशाचे प्रसादे । पुढां बोलो विनोदें । त्रिंबकु ह्मणें तें पदें । सुरसें होती ॥७७॥
इति श्री चिदादित्येप्रकाशे श्रीमव्दालावबोधे ब्रह्मसिध्देशोषदेशे पूर्णानंदे आदिखंडे अव्दैतनिरुपणनाम पंचमकथनमिति ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP