मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
बाललक्षण

आदिखंड - बाललक्षण

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


॥उपदेशस्तदात्मा च ब्रह्मब्रह्मणि संस्थितम्‍ ॥
॥बोधात्मनि न मोक्षोऽस्ति न बोधोस्तीति निश्चयम्‍ ॥१॥
येथिचेंनि ज्ञानोपदेशें । समूळ संशय निरसे । कैवल्य आत्मा प्रकाशे । अगर्भसिध्दि ॥१॥
जे दशे होणें दक्ष । तो हा बाळबोधु प्रत्यक्ष । अज्ञान बाळां पीयूष । गुरुकृपेचें ॥२॥
गुरु प्रत्यक्ष जननी । कृपास्तन भरुनि । पान्हा । सोडी वोरसोनि । शिष्यवत्सा ॥३॥
ब्रह्मरसें पेहे तेणें । ब्रह्मांड दाटे पुष्टिपणें । खेचरा शक्ति छलनें । हें चि होय ॥४॥
ज गुरुचें दास्य लाहे । तो चि ब्रह्मानंदें धाये । वाचुनी येरां काय । लाधैल हे वस्तु ॥५॥
पाहातां परमात्मा समता । कोठेहि गुणा नसतां । परि मेघां हे वस्तु नेणतां । अनंता बुध्दि ॥६॥
जो सता स्वामी भूतली । तो चिंतामणिचां राउळी । कोंपरि वसवी झोळि । तेचि प्राप्ति ॥७॥
संतुष्ट निर्ज्वर प्राणी । तो कल्पदृमाचां उद्यानीं । पाटे बांधे तेषणी । दशा भोगी ॥८॥
काळकूट कल्पुनु । जो डुहिल कामधेनु । त्याचा प्राणु पोषे कीं प्राणु । सिध्द जाय ॥९॥
तेवि ब्रह्मीं समस्त । जीव संसाररत । तरि कैसें यातायात । चुकैल त्याचें ॥१०॥
यास्तव समताबुध्दि । कवटाळुनि घेणे आत्मसिध्दि । तरि त्यासी कां आनंदनिधि । हस्तगत नोहे ॥११॥
निमिष निमिषा आराणुका । जो ये उद्यमीं प्रवतें निका । तो संसारदैन्य हि का । भोगील दश ॥१२॥
गीत गोष्टीं विनोदी । अन्यत्र नसावीं बुध्दि । आत्मस्थळीं बाळबोधीं । प्रवर्त्तावें ॥१३॥
आतां बाळ तें कवण । बोधासी काय लक्षण । हें ही सांगिजैल संपूर्ण । यथाविध ॥१४॥
जें स्तनपान सेवित । दिसे धाकुटें अदंत । तें अज्ञान सदंत । बाळ नव्हे ॥१५॥
जें अन्यथा ज्ञानें वर्त्तत । सर्वभावीं ब्रह्मरहित । तेंचि बाळ सदंत । मायेमध्यें ॥१६॥
जें अविद्येमायेचे उदरीं । अधउर्ध्व भ्रमण करी । जरा मृत्यु जन्मांतरी । न निघे तें बाळ ॥१७॥
कोण्हि भाविल अशा गोष्टी । नवसहस्र वरुषें दितीचां पोटी । गर्भु होता सेवटीं । तोचि बाळ ॥१८॥
तें हि प्रबुध्द विचारें । बाळ नव्हे निर्धारें । जें अबोधरुप संसारें । व्यष्टें तें बाळ ॥१९॥
जो माया धाके मातेचां पोटी । लपोनि शुकेंद्र राहे नेहटी । कांहीं बाळपणाचे गोठी । आहे येथें ॥२०॥
जे चतुराशी लक्षयोनि । नाना कुचपयपानीं । स्मरु नसे बाळपणीं । हिंडो चि लागे ॥२१॥
तेथ अज्ञानामाजी दुसरें । विपरीत ज्ञान संचरे । ते वस्तुरहित संसारें । बाधलें असे ॥२२॥
तवं शिष्यु बोले वचन । जे अज्ञानी विपरीत ज्ञान । हें दुसरें कैसेन । निवडलें असे ॥२३॥
तवं गुरु बोले यावरी । ज्ञान जाणिलें दोंपरी । अज्ञानही निर्धारी । याचि परीचें ॥२४॥
जें जें जाणिजे तें तें ज्ञान । याचा निर्धारु तें विज्ञान । याचें प्रांजळ लक्षण । किजैल पुढां ॥२५॥
आतां सर्वत्र नेणपण । सुषिप्ति तरुचें लक्षण । यासि ह्मणिजे अज्ञान । प्रबुध्द जनी ॥२६॥
या अज्ञानामाजि दुजें जें आनाचें आन भाविजे । तें विपरीत ज्ञान सहजें । सांगों आतां ॥२७॥
जें सिध्द स्वरुपां चुकलें । अन्यथा ज्ञानें वेष्टलें । तें दृष्टांतें संचलें । सांगोन देउं ॥२८॥
जेवी उगमीं चढे मासा । किं नळिके बांधिजे पूंसा । किं तारा प्रतिबिंबिं हंसा । पूर्ण रयनी ॥२९॥
किं दीपघंटे कुरंगु । किं दीपतेजां पतंगु । किं नाद प्रीति भुजंगु । किं नागु स्वप्रावस्थे ॥३०॥
किं स्वादासी मीनु । कि छाये पंचाननु । किं प्रतिबिंब देखुनु । मृगराटू जैसा ॥३१॥
किं पारिवा प्रीती भाजे । किं षट्‍पद वेष्टिला कंजे । असा अन्यथाज्ञानें माजे । तेंचि बाळ ॥३२॥
सांडोनि आत्मनिर्धारु । संसारबुध्दि थांवरु । आपुला हितार्थु नेणें नरु । तोचि बाल ॥३३॥
कर्मिष्टुना ब्रह्मीष्टु । स्वप्रींहि नव्हे परनिष्टु । तोचि बाळु जो संतुष्टु । संसारबुध्दी ॥३४॥
चित्तभ्रमिकु कां पिशाचिकु जैसा । वृथाज्ञानें बरळाय तैसा । उफाटे आत्मप्रकाशा । तोचि बाळु ॥३५॥
पूर्णबुध्दि कोण्हे वेळें । जयाचे नुकळति डोले । तेथें शिशुलक्षणें सकळें । बोलिलों आह्मिं ॥३६॥
असें जें बाळपण । तें न सरे ब्रह्मज्ञानावाचुन । यास्तव पुराण । आरंभिजो बोधु ॥३७॥
इतिबाललक्षण ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP