मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
शिष्यप्रश्ननुक्रमणी

आदिखंड - शिष्यप्रश्ननुक्रमणी

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


एवं साढेच्यारी शतें अनुक्रमणी । पूर्ण पंचेताळीसां कथनी । खंडे तिन भरुनि । रचा ग्रंथु ॥२१॥
आतां सर्वही प्रमाण । प्रष्ण अथवा निरुपण । खंडें तिन भरुन । रचावा ग्रंथु ॥२२॥
पुसिलें पुसिचें बोल । द्याल तें नाहि नवल । या वेगळें जे सखोल । तें हिं सांगा ॥२३॥
माझी वैखरी अपूरी । नेणें संस्कृताची कुसरी । मातें देशस्ता उत्तरी । प्रबोधावें ॥२४॥
बाळें रुदनचि करणें । येर काय जाणें । जनकादिकीं पुरवणें । कोड त्याचें ॥२५॥
तेवि आपुलें नि मोहें । मज देणें ब्रह्मपेहे । जेणे ब्रह्मपर लाहे । तेचि कीजे ॥२६॥
असा शिष्याचा आदरु । करुणा जाणूनी श्रीगुरु । कैसा जाला सादरु । निरुपण विषई ॥२७॥
तुवां जे केली पृछा । ते मज मानली रे वत्सा । आतां आपुलीया स्वईछा । प्रबोधुं तुज ॥२८॥
कर्मयोगु साधनें । मार्गदर्शनें भक्तिध्यानें । दया दान दमनें । तीर्थें व्रतें ॥२९॥
सिध्दि साधि मुक्ति उपाये । हें निर्धारु ज्ञानेंविण अपाये । तेणें बंधनचि निश्चये । अजन्मु कैचा ॥३०॥
कां जें सुकृतसामग्री खंडे । तैं इंद्रपदीचा ही उलंडे । अथवा भोगनार्थ कोडे । जन्मु घेणें ॥३१॥
सुवर्ण लोहिची श्रुंखला । बंधनार्थ येकिचि तुळा । याचा मानुनि कंटाळो । सर्वज्ञ होणें ॥३२॥
असी शास्त्रें पढतां । जगीं मिर्वे योग्यता । परि जेणें न तुटे भवव्यथा । जाणा तें नेघ्यावी ॥३३॥
यास्तव सर्वही प्रकारें । प्रपंची न भरावें चातुरें । प्रत्यक्ष नाहीं तें उत्तरें । वावधानिकें ॥३४॥
यालागीं ज्ञानबोध उपदेशु । वरि होय आत्मप्रकाशु । तो हा आरंभला सरसु । बालबोधु ॥३५॥
हे प्रत्यक्ष रुद्रवाणी । फेडील सर्वही सिराणि । ते महाराष्ट्र वचनीं । पव्हे घोलुं ॥३६॥
जो भवानीहराचा प्रसादु । मज जो जाला बोधु । त्रिंबक ह्मणें तो एवंविध । प्रकट करुं ॥३७॥
इति श्रीचिदादित्य प्रकाशे श्रीमव्दाळावबोधे ब्रह्मदिध्देशोप देशे पूर्णानंदे आदिखंडे शिष्यप्रश्ननुक्रमणीनाम व्दितीय कथनमिती ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP