मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ

संग्रहांत आलेल्या शब्दांचे अर्थ

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


अद्रेमान - आदरमान
अरडी - तेल काढण्यासाठीं करडी वगैरेच्या बिया भाजून करतात तो कुट्टा.
अशीलदान - एका गांवांतून दुसर्‍या गांवांत विक्रासाठीं माल नेला असताना त्यावर बसविलेली जकात .
अष्टण - अष्टांग स्नान.
अष्टीचं पातळ - एक प्रकारचें लुगडें .
अस्तुरी - बायको .
अळींकार - अलंकार .
आकडमास - आषाढी महिना.
आकरीत - वेडंवाकडं .
आक्रीती - आषाढी एकादशी.
आयबा - अहेव स्त्रिया - सवाषिणी.
आरवाळी - अरोगट; वात्रट.
आळका - हळवा.
आळशा - जवस.
इगडी - नणंद.
ईरक्ष - वृक्ष.
विसबंध - वीषबांध.
उजवी घालणें - प्रदक्षिणा घालणें .
उत्पलदेवी - उत्पलादेवी- लक्ष्मी.
उधन्या - अयोध्या
उपग्यान - उपदेश.
उसर्‍या - वाळवून ठेवलेली रताळी
एकळ - एक कांटेरी झुडुप.
ओवरी - ओसरीं
अंबुली - आंब्याचें लहान झाड.
कचणीची गाठ - आंवळून बांधलेली गांठ.
करगती - शेल्याचा प्रकार.
कर्तार - ईश्वर.
कलनाकोंडा - धान्याचा चूर
कळक - बांबू.
कळींग- बळीद.
कांचबंदी - कांचा बसविलेली फरसबंद जमीन.
काचोळी - पाठीला नुसते बंद असलेली चोळी
कास - कासोटा , ओंचा
कासई - नवे लुगडें.
किराण - साधणे - नेम मारणें.
कुपाटी --कुंपण .
केकतड - घायपात.
केदारी - कासार.
कैराव - कौरव.
कोथमिरी - कोथिंबिरीसारख्या बारीक व जाळीदार नक्षीचा
कौशीचा - कौशेय - रेशमी कुदानं दाटला - रागानें लाल झाला.
खडी - टेकडी.
खट - द्वाड.
खरग = साडगे , कुरडया आदीचें पीठ.
खेडकी - खेंडकुळी - बागेंतील पाण्याचा लहान पाट
खोट - कोट - तट .
गवाळ्या - सोंवळें नेणारा .
गहीन - गहन - कठिण.
गिगस - ग्रास- ग्रास .
गुलावा - भुलावा.
गोरसमया - दूधवाल्या .
गोळ्यासमद बुरुज - गोळीबुरुज.
घटाची माळ - नवरात्रांत देवाच्या पूजेचा घट बसवून त्यावर फुलांची माळ सोडतात ती .
घाणा भरणें - लग्नांतील हळद दळतात तो घाणा; एक घाणा केला- एका बैठकींत दळलें.
घोंगता - घोनता - अंगरखा.
चक्राचा पाट - चक्राकार नक्षी असलेलें लुगडें .
चवर - मोहोर
चांगुलपणा - सौंदर्य.
चैतान - उत्तान.
चोर ओटी - स्त्रीच्या पहिल्या गर्भारपणांत तिसर्‍या किंवा चौथ्या महिन्यांत खाजगी रीतीनें ओटी भरतात ती. स्त्री गर्भार आहे कीं नाहीं हें तीन महिनेपर्यंत निश्चित समजूं शकत नाहीं म्हणून.
झपका - झुपकेदार.
झरझरा - रेशमी.
झालू - झाल, लग्नांत कन्यादान करतांना मुलीच्या डोक्यावर पांच सवाषिणी झाल धरतात.
झिरा -  झरा.
झेलारी - झूल.
झेलारी. झूल.
टाकळ - एक औषधी वनस्पति .
टेकीची - टेकडीवरची
ठाल्याठुल्या - झाडाच्या डहाळया, काटक्या.
टोक घालणें - ठोके मारणें.
डगरी - उंचवटा.
डगरी ढासळणें - मोठ्या आवाजांत ओरडणें.
डांब - खांब.
डुबा - वासरु.
डौलविला - फुलला.
तगारें - घमेलें.
तळवट - खालचा भाग
ताजवा - तराजूं.
तान्हभूक लाडू - तहानेची ब भुकेची शिदोरी.
तिरडा - भारा
तिर्लोक - त्रैलोक्य.
दातों तृण धरणें - शरण येणें
दिमा - डीम - ठमकारा.
दुघड - हट्टी.
दुमता - दुमडलेला.
दुर्व्य- द्रव्य.
देवई - देवकी .
देवसव्यात -देवांसमवेत.
दोड- द्वाड.
दंडी पदर सावरणें - पदर आवळणें
धोडी - पुतणी .
नगरमासा - मोठा मासा.
नांद्रकी - एक दाट छायेचें झाड.
निडाळ - कपाळ.
नेहर - किनारा.
पंचात्री - पंचारती.
पटाड - बैलाच्या पाठीवरील खोगीर ओढण्याचें साधन .
पलाण - विहिरीचें पाणी दूर पोंचविण्याकरतां केलेली मातीची वरवंडी.
पाऊ - कांठ.
पाठीचं सोनं - पाठचीं भावंडे.
पांढर- वसाहतीची पांढरी जमीन.
पानंद - पाणोठा.
पेठ - बाजार.
पैतार - पवित्र.
पुणंधर - पुरंधर.
पोटीचं सोनं - लेकरें .
पोवतं - श्रावणी पौर्णिमेस देवाला अर्पण करावयाचा दोरा; नागपंचमीला नागाला वाहतात.
पोलार - पायाच्या अंगठ्यातील जोडव्यांसारखा दागिना.
बसकर - बसकण , सतरंजी.
बया - आई.
बाजवा - विहिरीच्या बाजूचे आधाराचें खांब.
बासन - भांडें /
बासरी - चरवी.
बारसावळ - बारसें
बिदाई - खेडयांतील गल्ली.
बिचवा - तंबू.
बुत्ती - दहीभात कालवून प्रवासाला बरोबर नेतात तो.
बुत्तीचा शेला - ठेवणीचा शेला.
बुध्या - बुध्दि.
बेस - वेश.
भिस्की - पुष्कळ.
भोकरघाट -  एक प्रकारची कर्णभूषणें .
मखमली मूठ - बैलाच्या पाठीवरील मखमली मूठाची झूल.
मन्नाचा धट्ट केला - मन खंबीर केलें .
मजकूर - विचार.
मनसा - मनीषा.
मरणपुवी - स्मशानभूमि
मर्तंकी- माती.
महामोरी - मोठी.
महाळाचीं पितरं - भाद्रपद महिन्यातील पितृपंधरवडा.
मांगीरसाहेब - एक स्थानिक दैवत.
माजुम - बदाम पिस्ते घातलेली भांग.
माहीपुनम - भाद्रपद पौर्णिमा.
मुर्‍हाळी - मूळ + हारी = सासरीं गेलेल्य़ा मुलीला. माहेरीं नेण्यास आलेला
मुलाण्या - खाटीक.
मूर्तवेळ - मृत्युची वेळ.
मूळसाडा - माहेरीं बोलावणें.
मेट - नेट.
मेंढ - खांब.
येंगणें - चढणें .
येढा - प्रदक्षिणा.
येवध - युध्द.
येंवश्या - वेश्या.
 राक्षिणी - राक्षसिणी
रुपीण - रुक्मिणी.
लगडी -ओझी.
लमण - लमणांची छावणी.
लटपट झाली - बेशुध्दावस्था झाली.
ललईबाग - लालबाग.
लेंडी - गुडी.
वग - लावणीचा सुधारुन वाढविलेला प्रकार - नाटक व गायन यांचे मिश्रण.
वगर - उग्र, द्वाड.
वजवज - उजूं उजूं पुन्हां पुन्हां.
वंजणें - विक्री करणें.
वळवाण - वाळवण .
वाढीदिडी - दिडीनें वाढणारें.
विभूत - राख.
वोसणें - चोखूण घेणें.
शिंकीण  - शंख.
शिणजोड - योग्य वयाचा.
शिघु - शिडी.
शिनगार - श्रृंगार.
शिमा - सीमा.
शिरवळ - शांत वेळ.
शिरस - शिरीष वृक्ष किंवा एक प्रकारच्या मोहरीचें झाड.
शेका - शेंपाचें झाड.
शेजी - शेजारीण.
शेरीबेरी - लोण्याच्या खालची खरवड
शेलाणी - शेलारी - उंची लुगडें.
सडसुड - नाडा.
सई - मैत्रीण.
सरदोरी - हत्तीच्या गळ्यांतील घंटेची दोरी.
सवर्ण- सुवर्ण
सातीसलद - अत्यंत लांब -सातव्या पेटींत.
साथीसजण - मित्र.
सांधीकुंधीं - कानाकोपर्‍यांत.
सायाचें - सागवानाचें
सारंगपट- संक्रातीला किंवा वटसावित्रीला मडक्यांत उंस, हरभरा, गाजर, इ.घालून सवाषिणींना वाण देतात तें.
सौंदड- शमीवृक्ष.
हरख - वीष.
हरळी - मोठा चर.
हरोळी - आरोळी.
हाट- बाजार.
हुरद - हृदय.
हेल - हमाली.
हेलबाळ्या - हालणार्‍या बाळया.
होजी - भावजय.
होळीहोळी - आवर आवर.

N/A

References : N/A
Last Updated : January 25, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP