मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत दहावे

लोकगीत - गीत दहावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


कळ नारदाची खोटी । तीन ताळाच्या तळवटी ।
सोन्याची बिघडली भटी । राजअंतरी पडल्या तुटी ।
कंस्तुरींत पडली हिंगाची विठी । वडील गंधारी धाकली कुंती ।
म्होरं लागलं अस्तनापूर । तिथं कांही कैराव चतुर ।
तिथं नांद कैराव चतुर । बंधु एकागळ शंभर ।
दुष्ट या शंभराची नदर । त्यानीं काय बसून केला विचार ।
नाहीं पाहिलं दूरवरी । आतां गेली वोसून गंधारी ।
मर्तकीचा बनविला हत्ती । त्याला काय बनवंल सुती ।
रंग दिला भवयागती । जशीं काय चित्रं काढली भिंती ।
लंबी सोंड त्याला शोभती । गळ्याघाट सर दोहेरी ।
आतां गेली वौसून गंधारी । हत्तीवर घातली अंबारी ।
अंबारीला खांब सोनेरी । सोन्याच्या टिका चमकती वरी ।
गंधारी बसुनी हौद्यांत । वान देती नगरनारीला ।
जाती कुंतीच्या वाड्याला । डाव्या पायाच्या अंगठयान ।
तिनं दरवाजा कुंकु लाविलं । शेजेच उदनं सवाल देण ।
नाहीं दिला तिच्या प्रभु झाला ऊन ।
वसा घ्या तीळगुळ । वसा काय पुसुन भातली कळ ।
कळ उत्पन्न केली खरी । आतां गेली वौसून ही गंधारी ।
कुंती बोल धाव श्रीहरी । आतां गेली वौसुन गंधारी
भिवबा बाहेरुनी आला । माता कां तुझा चंद्र कोमेला ।
माता भिवबाला बोलती । आग लागो तुझ्या चंद्राला ।
आतां गेली वौसून गंधारी मला ।
भीम म्हणे झाली शिमा । तिच्याबरुन हत्ती आणीन मी दिमा ।
भीम गेले  जमुनास्थळीं । तिथं काय जाऊन डगरी ढासळली ।
बंद झाली कैराव आळी । वाट मिळेना झाली हरळी ।
चिकलाच बनविल गोळं । चिकलाची गोष्ट नाहीं बरी ।
आतां गेली वौसुन गंधारी ।
सडसुधा बनाचा बनविला । भीम इंगुन वस्ती गेला ।
इंद्रजिताला रामराम केला । इंद्र थरथरा कापला ।
भीम काहो येणं केलं । हत्तीकारण येण केल ।
हत्ती डांबेशीं बांधला । हत्ती दुरुन दाविला ।
त्यांनी धरुन आणिला । साज मारीला बगलेला ।
हत्ती डोईवरी घॆतला ।मेघ होऊनी वरनं आला ।
काचबंदी अंगणामधीं । मातीनं आटा केला ।
साजासकट हातीं झेलला ।
भीमा म्हणे झाली शिमा । माता कसा ग झेलीला
माता म्हणे भीमायाला । नऊं महिने वागविला ।
पांच ज्योतीच्या पंचात्रीनं । मातेन भीमाला ओवाळला ।
हत्तीवर घातली अंबरी । अंबारीला खांब सोनेरी ।
सोन्याच्या कडा वरी ।
कुंती बसून हौद्यांत । वाण काय  देती नगरनारीला ।
वाण देती नगरनारीला । जाती गांधारीच्या वाड्याला ।
डाव्या पायाच्या अंगुठ्यानं । तिनं दरवाजा कुंकू लाविलं ।
शेजेचं उसनं सवाई देणं । नाहीं दिला तेच्या प्रभु झाला ऊन ।
वसा घ्या तीळगूळ । वसा काय पुसून मातली कळ ।
कळ उत्पन्न झाली खरी । आतां गेली वौसून ही गंधारी ।

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP