TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
कोंडुनि नभभांडारीं पडली, ...

बी - कोंडुनि नभभांडारीं पडली, ...

मराठी शब्दसंपत्ति


जादू
कोंडुनि नभभांडारीं पडली,
दिव्यतेज - विभवाभिनवाली,
फोडुनि नभ ती
मलीन जगती -
वर विखरुनि देईल अशी
जादू कोठें मिळेल कशी !
गाढ गूढभूगर्भीं गढलीं
बहुविधरंगी रत्नें सगळीं
विदारुनि खनि
नीरस अवनी -
ललामललिता करिल अशी
जादू कोठें मिळेल कशी !
उभ्या कड्याच्या कपारिंत
कठीण कोसे दडलेत,
त्यांस छेदुनी
पटास निर्मुनि
उघडे जन झांकिल अशी
जादू कोठें मिळेल कशी !
हृदयाच्या कातळातळीं
अक्षय जीवन घे उसळी,
पाषाणासी
भेदुनि, प्यासी
जनता ताजी करील अशी
जादून कोठें मिळेल कशी !
चिवट रूढिच्या कचाटिंत
धुरीण पडले कुचंबत,
चिरडुनि तिजला
यशोध्वजेला
दिगंतरीं रोवील अशी
जादू कोठें मिळेल कशी !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-22T19:39:18.6000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गोरी

  • पु. १ फांसेपारधी . की गोरियाचें गायन । - रावि २ . २३ . २ ( ल . ) त्याचें गाणें . कां गोरीचिया भुली । मृग ब्याधा दृष्टि न घाली । - ज्ञा १३ . ७३९ . गौरी पहा . 
  • स्त्री. गोंवरी ; राबाकरितां शेणाचे वाळवलेले डिखळें . - चित्रकषि २ . ६ . ( सं . गो .) 
RANDOM WORD

Did you know?

How to make essay about Hindu culture
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site