मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|
शंकर बळवंत चव्हाण

शंकर बळवंत चव्हाण

मराठी शब्दसंपत्ति


[ वृत्त - वारुणी ]
कापसाचें शेत माझें हो फुलोनी शुभ्र सारें
वाटती हे कीं नभींचे खालिं आले सर्व तारे
हेंच आम्हां होत लोकीं दौलतीचे दिव्य ठेवे !
याविना तेजाळ मोतीं वा हिरे ते काय व्हावे !     १

फुल्ल झाल्या कापसाच्या या अशा शेतांतुनी जी
हिंडतांना स्वाभिमानें कल्पना हो गुंग माझी !
भासतें कीं चालतोंसें तारकामेळ्यांतुनी या
जेविं चाले अंबरींचा हांसरा तो चंद्रराया !     २

फुल झालें शेत ऐसें डोलतांना मंद वातें
हा जणूं हेलावतो क्षीरोदधी कीं मूर्त वाटे
खोप माथीं त्यांत शोभे, मेढ मागें टेंकण्यासी
शेषशायी विष्णु जेवीं शोभतो कीं या निवासीं     ३

ये उषादेवी शुभांगी रंगुनी कीं सुप्रभातीं
आणि हर्षें वेंचुनीया तारकांचें नेई मोतीं
तेविं माझी येउनी शेतावरी ती प्रीतराणी
वेंचुनी आणिल सारें पीक गेहा गात गाणीं !     ४

मूर्त ऐशी संपदा स्वर्गीय नेमें येत गेहीं
आणि माझी हृत्सखी ती हर्षुनी वेडीच होई !
येई भावें एक लक्ष्मी कीं दुजीतें भेटण्या ही !
हेंच सालोखाल देवा, मागणें ना अन्य कांहीं !    ५

N/A

References : N/A
Last Updated : January 22, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP