लोकमान्य टिळक पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


धन्य धन्य लोकमान्य टिळक कीर्ति अलौकीक देशोद्धारक म्हणुनि गाजला भरत खंडात, याला नाही जोड अखिल जगतात यासम हाच म्हणुनि म्हणतात ॥

एकोणिसशे पाच पर्यंत, होते नेमस्त, काँग्रेस भरवित, नवयुगारंभ तेथपासून बालरवि उदयांचली येऊन, तरूण जागृत तेज पाहून ॥

टिळकासम कार्यक्षम वीर विलोकून, किर्ती प्रभेने दिपून, तरून गेले हरकून, वाटे अंतरापासून, हा एक मार्ग दावील, हो देशास स्वराज्य़ देईल ॥

चाल :- १
टिळकचांचि ऐकुनि किर्ती, उज्जवल कृती, तशींच देशभक्ति, तेजस्वी मूर्ती, हो वाहवा म्हणती ॥ जणु पाणिदार मोतिदाणा । टिळक शहाणा, चे तरी तरूणा ऐकवुनि त्यांना ही स्वराज्य कर्णा ।, टिळकासम पाहुनि हिरा. अष्टपैलू खरा, तेजस्वी तारा. दिपुनि गेला सारा हो तरूण सभोवरा ॥

काँग्रेसचे रोपटे लावून दादाभाइन वाढविले छान । करिल परि कोण, हो तिचे रक्षण ॥

चाल मोडते - वृद्ध झाले दादाभाई जणु पिकले पान, कन्या काँग्रेस लहान, चिंता मनात थैमान, चिंता जाळी बलवान, पालनकर्ता शीलवान, कोणी दिसेना महान उगवला तोच तेजाळ हो रवि टिळक शत्रुचा काळ ।

चौक २ रा
खवळून जाता स्फोटक द्रव्ये पृथ्वीचे पोटात, पोट फाडुनिया त्यात, होई भूकंप वेफाट, तशी चळवळ जोरात. वंगभंग भर त्यांना आली स्वदेशाची लाट कर्झन म्हणे हो तोर्‍यात दावुन टाकीन क्षणात, करुन दडपशाही, मारुन जनमता लाथ, म्हणें तुम्ही काय करणार हो निशस्त्र असेच मरणार ।

चाल दांगड :- एकोनिसशे पांच सालाला, कर्झन साहेबाला, उमाळा आला बंगालची फाळणी करण्य़ाला हिंदुमुसलमान फोडण्याला, वंगभंगाचा उपाय काढला, करायला कर्झन एक गेला झाले परि भलते प्रसंगाला, वंगभंग करण्यासिद्ध झाला, तेजोभंग त्याचापरि झाला, आकरा साली स्वत: बादशहाला, कायदे रद्द करणे प्रसंग आला, काँग्रेसचा पहिला विजय झाला कसा तो सांगतो या वेळेला, रुसो, जपान लढा झाला, जपान विजयाने जागृत झाला, काळ्या गोर्‍यांच लढा सुरु झाला गोर्‍याला पार चीत केला, स्वाभिमान हिंदुस्थानचा सगळा, फुंकर घालिता अग्नि फुलला, टिळकांनी फुंकर घालण्याला, ज्वालामुखी जणू जागृत झाला, तसा स्वाभिमान जागृत झाला, एक संस्कृति भाषावाला एकरक्ताच्याही लोकाला, प्रांत बंगाल फोडण्याला  कर्झन जेव्हां पूर्ण तयार झाला, लाथाडून अर्ज विनंत्याला, सारा बंगाल खवळून उठला, दर्या जणु फार खवळून गेला, समुद्र मंथनी रत्ने देवाला, जन सागरी हो देशाला, मिळाले काय सांगतो हो तुम्हाला, देह देशार्थ अर्पण्याला, तयार नररत्ने मिळाली आम्हाला, स्वदेशी बहिष्कार शस्त्र हाताला अचूक हा बाण मिळाला आम्हाला, शत्रूच्या मर्मी जाऊन बसला, कारण इंग्रज व्यापारि पडला, देशभर पुकारा याचा केला, लाल बाल पाल यावेळेला दत्तात्रय अवतार जणू झाला काँग्रेसचा. भाग्यकाल आला, स्वदेशी पुकारा सर्वत्र केला बंगभंगाचा वणवा पेटला, तरून खडबडून जागृत झाला, हिंदू-मुसलमान एक झाला, तिटकारा इंग्रजांचा आला, विदेशी कपड्याच्या होळ्या केल्या क्रांतिकारक जन्मा आला, हरताळ सर्वत्र दिसू लागला, वंगभंग जोवर नाहीं गेला बहिष्कार ब्रिटीश मालाला, शपथा सर्वांनी घेतल्या, त्यावेळी दादा ॥

चाल मो. - जळि स्थळीं जसा कॄष्ण कंसाच्या मनांत, तसा कर्झनच्या चित्तांत, दिसे टिळक कृतांत, कृती टिळकांची अचाट, पाहून चळवळीची लाट, भिति वाटे हृदयात, उलथूनी राज्य टाकिल हो डोईजड खास होईल ॥

चौक ३ रा
चाल मो. - पुष्पानी वृक्ष बहरला, तसा काँग्रेसला, तरून गोळा झाला अखिल काँग्रेस कलकत्त्याला, दादाभाई स्थानाला स्वराज्य मंत्र ज्यांनी बोलला ॥

जरि होते ब्याऐंशी वर्षांचे, हृदय परि त्यांचे होते तरुणाचे, स्वराज्य घोषणा त्यांनी कलकत्त्यास, दिसेल कां स्वराज्य माझे डोळ्यास, लागला ध्यास त्यांचे चित्तास ॥

स्वराज्य हे ध्येय आमचे, सिद्ध करण्याचे साधन साचे स्वदेशि बहिष्कार राष्ट्रिय शिक्षण, चतु: सुत्रीचे जाहीर घोषण ज्यांने देशांत झाले आंदोलन ॥

आजवरी मवाळ झाला काँग्रेसवाला त्यांना कलकत्त्याला, स्वदेशि बहिष्कार नाहीं रुचला, झीज अंगास लागेंल असला, मार्ग का रुचती मवाळाला ॥

चाल १ :- सुरतेची काँग्रेस आली तेथे जहाल मवाळबंडाळी । दादाभाईंची इथे राज्य आरोळी, गोखल्याना पसंत न पडली । त्या ठरावाची खांडोळी, करण्यास मंडळी जमली । टिळकांनी मख्खी ओळखली, सुरतेचि काँग्रेस उधळिली । काँग्रेसची झाली चिरफाळी, जहाल मवाळांची दुफळी मवाळांची फजिती केली. टिळकांची सरशी झाली । प्रतिपक्षी चीत करण्याची अजब हातोटी । सरकारि धोरणावरी केसरी पत्रीं । टिळकांचि टीका फार कडक अशी आहे ख्याती ।

त्यामुळे त्यांचेवर वळली सरकारी दृष्टी । पहिली सजादीड वर्षाची परि न त्या खंती ! येताच सुटून सुरु झाली त्यांचि देश भक्ती । दिनरात देह झिजविला स्वदेशासाठी । स्वदेशीची चळवळ केली टिळकांनी । सार्वजनिक शिवाजि आणि गणेश उत्सवाची दाटी । केसरी मराठा गर्जना करी महाराष्ट्री । स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क टिळकांची उक्ती । दारू पिकेटिंग चळवळ त्यांनी केलि मोठी । त्यानि केले यत्नराष्ट्रीय शिक्षणासाठी । स्वातंत्र्य ज्योत फुलविली अशी महाराष्ट्रीं ॥

चाल मोडते:- धरण्यास स्वराज्य धुरा, लाभला खरा टिळकासम हिरा, म्हणुनि काँग्रेस पाऊल जोरात, वंगभंगाची चळवळ जोरात टिळकांची कीर्ती झाली जगतात ॥

चौक ४ था -
रोमरोमी तेजस्वीपणा, टिळकाचा बाणा, पाहुनी तरूणा, येई चैतन्य त्यांचे रक्तांत, नको हें राज्य वाटे चित्तांत परि बोलण्याची चोरी देशात ॥ येतांचे सूर्य उदयाला, तिमिर विलयाला, तसे देशाला, टिळक देशाचे दास्यतिमिरास, अहर्निश झटले दूर करण्यास, म्हणुनि वाट्यास त्यांच्या कारावास ॥

फितवितो टिळक तरूणाला, करी चळवळीला, त्यावरी खटला, राज्यद्रोहाचा सरकारने केला, वाटावी दहशत लोकाला, सहा वर्षांचे दिली सजेला ॥

चाल : १ ऐकुनि त्यांचे शिक्षेला, सारा देश फार हळहळला । चंद्राविण तारांगणाला, नसे शोभा वद्य पक्षाला । जाताच टिळक तुरुंगाला, निस्तेज देश जाहला । तुरुंगात जरी हा गेला, तरि नाही सुटत याचा चाळा । तिथे नाहीं स्वस्थ हा बसला, गीतारहस्य ग्रंथ काढिला । टिळकांच्या कीर्तिमंदिराला, ग्रंथाने कळस चढविला । अनभिशिक्त राजा झाला, टिळक हा खरा देशाला । पुन्हा सुटून येता देशाला, महायुद्ध वणवा पेटला । स्वराज्याचे हक्क मिळण्य़ाला, हा मोका चांगला आला ॥

चाल : २ - काँग्रेस थंडावली होती सहा वर्षात । येतांच मंडालेहून परत देशात । चैतन्य येऊं लागले पुन्हा देशात । होमरुल चळवळ केली त्यांनी जोरात । बेझंटबाईनी केली मोठी मदत चळवळीस । सुरतेचा सूर अद्याप होता देशात । गोखले टिळक हा वाद आला रंगात । जहालमवाळांचा हा वाद होता निश्चित । जहालास वाटे काँग्रेस न्यावी जोरांत । मंवाळास बाटे काँग्रेस असावी ताब्यांत ।

चाल मो. - सरकार आहे संकटात, महायुद्धात, मवाळ म्हणत, मागण्या मागून सरकारला त्रास, देऊं नये वाटे त्यांचे चित्तास, धडाडी कळाली पूर्ण देशास ॥

चौक ५ वा -
महायुद्ध संधि चांगली, म्हणे लाभली, बेझंटबाई भली, केली खटपट तिनें जोरांत, कराया समेट जहाल मवाळात, तोंच गोखले गेले स्वर्गांत । टिळकांनी रात्रंदिन फिरुन, मोठ्या धडाडीनें अखिल हिंदुस्तान, होमरुल चळवळ केली जोरात, अपूर्व स्वागत त्यांचे दौर्‍यात, स्वराज्य बीज पेरले लोकात ॥

हिंदु मुसलमान एक केला, टिळकांनी लखनौला, म्हणुन काँग्रेसला भारतमंत्र्याचे पाचारण खास, स्वराज्यहक्क देतो तुम्हास, तुमचे सहकार्य हवे आम्हास ॥

चाल : - १ हिंदुमुसलमाने एक होऊन स्वराज्याची मागणी जोरात । असे संघटन पाहून, मांटेग्य़ू गेला घाबरून । संकटी होता म्हणून, इंग्रज आला धावून । देतो स्वराज्य असे सांगून, चळवळ टाकली दाबून । संपता युद्ध दारूण गेले वचन पार विसरून । सुधारणा पोकळ देऊन, कशी पहा केली बोळवण ॥

चाल मो.- एकोणीसशेवीस सालाला, आगस्ट पहिलीला घात जवा झाला, काळाने नेले बाळटिळकास, मायभूमिच्या भालतिलकास, पुसुनि दुर्दैव तिच्या वाट्यास । मायभूमि ढाळि । अश्रुला, दास्य शृंखला, तोडणारा गेला, म्हणे मग दया माझे पुण्यास, येतिका कोणा सदयहृदयास, तोंच पातले गांधि समयास ।

धन्य धन्य लोकमान्य टिळक, कीर्ति अलौकिक देशोद्धारक, म्हणुनि गाजला भरत खंडात, याला नाहि जोड अखिल जगतात, यासम हाच म्हणुनि म्हणतात ॥

एकोनिसशे पाच पर्यंत, होते नेमस्त, काँग्रेस भरवील नवयुगारंभ तेथ पासून, बालरविउदयाचलि येऊन, तरूण जागृत तेज पाहून ॥

टिळका सम कार्यक्षम वीर विलोकून, किर्ती प्रभेने दिपून तरूण गेले हरकून, वाटे अंतरापासून, हा एक मार्ग दावील । हो देशास स्वराज्य देईल ॥

(चाल) टिळकांचि ऐकुनी कीर्ती, उज्वल कृती, तशिच देशभक्ति, तेजस्वी मूर्ती, हो वाहवा म्हणती ॥

जणु पाणिदार मोतिदाणा, टिळक शाहाणा, चेतवी तरूणा ऐकवुनि त्याना, हो स्वराज्य कर्णा ॥

टिळकासम पाहुनि हिरा अष्टपैलु खरा तेजस्वी तारा, दिपुनि गेला सारा हो तरुण सभोंवरा ॥

काँग्रेसचे रोपटे लावुन दादाभाइन, वाढविले छान, करिल परि कोण, हो तिचे रक्षण ॥

(चाल मोडते) वृद्ध झाले दादाभाई जणु पिकले पान, कन्या काँग्रेस लहान, चिंता मना तयें मान. चिंता जाळी बलवान पालनकर्ता शक्तिवान, कोणी दिसेना महान उगवला तोच तेजाळ, हो रवि टिळक शत्रुचा काळ ॥
 
खवळून जाता स्फोटक द्रव्ये ( चाल - २) पृथ्वीचे पोटात, पोट फाडुनी या त्यात, होई भूकंप बेफाट, तशी चळवळ जोरात, वंगभंग भर त्यात, आले स्वदेशाची लाट, कर्झन म्हणे हो तोर्‍यात दाबुन टाकीन क्षणात, भरुन दडपशाही मात, मारुन जनमता लाथ, म्हणे तुम्ही काय करणार हो निशस्त्र असेच मरणार ।

( चाल दांगड) - एकोणिसशें पाच सालाला कर्झन साहेबाला, उमाळा आला, बंगालची फाळणी करण्याला, हिंदु-मुसलमान फोडण्याला, वंगभंगाचा उपाय काढला, करायला कर्झन एक गेला, झाले परि भलते प्रसंगाला, वंगभंग कराया सिद्ध झाला, तेजोभंग त्याचा परी झाला, अकरा साली स्वत: बादशहाला, फायदे रद्द करणे प्रसंग झाला, काँग्रेसचा पहिला विजय झाला कसा ते सांगतो या वेळेला, रुसो जपान लढा सुरु झाला, गोर्‍याला पार चित केला, स्वाभिमान हिंदुस्थानचा सगळा, फुंकर घालिता अग्नि फुलला, टिळका तो फुंकर घालण्याला, ज्वालामुखि जणू जागृत झाला, तसा स्वाभिमान जागृत झाला, एक संस्कृति भाषावाला एकरक्ताच्या घ्या हो लोकाला प्रांत बंगाल फोडण्याला, कर्झन जेव्हां पूर्ण तयार झाला लाथाडुन अर्ज विनंत्याला, सारा बंगाल खवळुन उठला, दर्या जणु फार खवळून गेला, समुद्रमंथनी रत्नें देवाला, जन सागरी हो देशाला मिळाले काय सांगतो हो तुम्हाला, देह देशार्थ अर्पण्याला तयार नर रत्ने मिळाली आम्हाला, स्वदेशि बहिष्कार शस्त्र हातात अचुक हा बाण मिळाला आम्हाला, शत्रुच्या मर्मी जाऊन बसला कारण इंग्रज व्यापारि पडला, देशभर पुकारा याचा केला, लाल बाल पाल यावेळेला, दत्तात्रय अवतार जणूं झाला, काँग्रेसचा भाग्य-काल आला स्वदेशि पुकारा सर्वत्र केला, वंगभंगाचा वणवा पेटला, तरूण खडबडून जागृत झाला, हिंदुमुसलमान एक झाला, तिटकारा इंग्रजाचा आला, विदेशि कपड्यांच्या होळ्या केल्या क्रांतिकारक जन्मा, आला हरताळ सर्वत्र दिसू लागला, वंगभंग जोंवर नाही गेला, बहिष्कार ब्रिटीश मालाला, शपथा सर्वांनी अश्या घेतल्या, त्यावेळीं दादा ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP