मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
राकाबंकाचरित्र.

राकाबंकाचरित्र.

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


कीर्तनानुक्रम.
मंगलाचरण.
गायन (धानाश्री) - ताप शमन दुरित हरण, पावन करिं या दीना, करुनि कृपा दीननाथ ॥धृ.॥ विमल भाव हृदयीं वसो श्रवण मननें ध्यान ठसो, सदा तुझा निदिध्यास घेई पदरीं दासा तारी धरुनि शीघ्र हात ॥१॥
विषयोपक्षेप.
अभंग --- ऐसें भाग्य कधीं लाहता होईन । अवघें देखें जन ब्रम्हरुप ॥१॥
गद्य --- किं प्रज्ञया करिष्यामो येषां नोऽयमात्मा‍यं लोक: ? किं वित्तेन करिष्यामो येषां नोऽयमात्मा‍ऽयं लोक: ? किं जायया करिष्यामो येषां नोऽयनात्मायं लोक: ? ॥

पारमार्थिक भाग्य.
श्लोक --- श्रेय: श्रेयश्च लोके ।
सर्व भूतांचे ठायीं ब्रम्हदर्शन.
पद --- जो पाहे, अवघें ब्रम्हची आहे, गर्जने तर्जन पाहे देहाभिमान न वाहे ।त्रैलोक्याचे निजपद घेउनि अखंड तन्मय राहे ॥
गद्य --- यत्सर्वेषु भूतेषु तिष्ठन्सर्वाणि भूतान्यन्तर सते आत्मान्तर्याम्यमृत:
श्ल्लोक - एको देव: सर्वभूतेषु ॥१॥
एष सर्वेषु भूतेषु गूढोऽत्मानं प्रकाशते ॥२॥
सम: सर्वेषु भूतेषु तिष्ठन्ते परमेश्वरम्‍ । विनश्यत्यविनश्यं तं य: पश्यति स पश्यति ॥३॥
एको वशी सर्वभूतानान्तरात्मा एकं रुपं बहुधा य: करोति । तमात्मरथे ये:नुपश्यन्ति धीरारतेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम्‍ ॥४॥
त्यापासून परमानंदप्राप्ति.
श्लोक - तदेतदिति मन्यन्तेऽनिर्देश्यं परमं सुखम्‍ ॥१॥
यतो वाचो । कदाचन ॥२॥
गद्य - एषास्य परमानति । परमानन्द: ॥
पद --- ब्रम्हसुखें सुखरुप ॥
शांतिसाधन.
शान्तो दान्त उपरत:
श्लोक --- नास्ति बुद्धिरयुक्तस्य ॥१॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठ्म‍ ॥२॥
ओंवी - तैसा प्राप्ति ऋद्धि सिद्धि । तयासि क्षोभ नाही कधिं । आणि न पळता न वाधी । अधति तयाते ॥१॥
सांगे सूर्याच्या घरी । प्रकाश काय वाती वेर्‍ही ॥ कां न लाविजे तरी अंधारी । कोंडेल तो ॥२॥
देखें ऋद्धि सिद्धि तयापरी । आली गेलीसे न करी । तोचि गुंतला असे अंतरी । महासुखी ॥३॥

क्षमासाधन.
क्षेतव्यमेव सततं पुरुषेण विज्ञानता ॥ यदाहि क्षमते सर्वं ब्रम्ह संपद्यते तदा ॥१॥
तां क्षमा ताद्दशीं कृष्णे कथमस्मद्विधरत्यजेत्‍ ॥ यस्यां ब्रम्ह च स यं । यज्ञा लोकाश्च धिष्ठिता: ॥२॥

दयासाधन.
ओव्या --- आतां दय ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी ॥ निरवितां न कडसी । साने थोर ॥१॥
तैसें दु:खितांचे शिणणें । हिरता सकणवपणे ॥ उत्तमाधम जेणें । विवंचू गा ॥२॥
तैसे पुडिलांचेनि तापें । कळवळलिये कृपे ॥ दिधलेहि आपण पैं । न्यूनचि मानी ॥३॥
तो पुरुषवीर राया । मूर्तिमन्त जाण दया । मी उदयतांचि तया । ऋणिचा लाभे ॥४॥

नि:संगता.
श्लोक ---- कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‍ ॥ अभितो ब्रम्हनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‍ ॥ अभितो ब्रम्हनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‍ ॥१॥
विविकयुक्त वैराग्य.
श्लोक --- नैर्वेधं ज्ञानगर्भं ॥
ओव्या --- विवेकेंवीण वैराग्य केलें ॥ तरी अविवेकें अनथीं घातलें ॥ अवघे व्यर्थचि गेले । दोहींकडे ॥१॥
ना प्रपंच ना परमार्थ । अवघें जिणेंचि झाले व्यर्थ ॥ अविवेकें अनर्थ । ऐसा केला ॥२॥
विवेके अंतरी सुटला । वैराग्य प्रपंच तुटला । अंतर्बाह्य मोकळा झाला ॥ नि:संग योगी ॥३॥
विरक्तें विवेकें असावें । विरक्तें अध्यात्म वाढवावें ॥ विरक्ते धारिष्ट धरावे । मदना विषयीं ॥४॥
विरक्तें करावे साधन । विरक्ते लावावे भजन ॥ विरक्ते विशेष ब्रम्हज्ञान । प्रगटवावे ॥५॥
विरक्तें भक्ति वाढवावी । विरक्तें शांती दाखवावी ॥ विरक्ते यत्नें धरावी विरक्ती आपली ॥६॥
विरक्ती सत्क्रिया प्रतिष्ठावी । विरक्ते निवृत्ति विरता रावी । विरक्तें नैराश्यता धरावी । सुदृढ जीवीं ॥७॥
विरक्ते नीति आलंबावी । विरक्ते धर्मस्थापना करावी । विरक्तें क्षमा सांभाळावी अत्यादरें ॥८॥
विरक्ते अभ्यास करावा । विरक्तें साक्षेप धरावा ॥ विरक्ते वक्तृत्वे उभारावा । मांडला परमार्थ ॥९॥

नवविधा भक्ति.
श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनं । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मानिवेदनं ॥१॥
इति संभाविता विष्णो: भक्तिश्चेन्नवलक्षणा । कियते भगवत्यद्वा तन्मन्ये चित्तमुत्तमम‍ ॥२॥
विज्ञानसारभिर्यन्तु. परमं पदं ॥
शुद्ध भाव.
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । सात्विकी राजसी चैव तामसी चेति तां श्रृणुम: ॥१॥
ओव्या --- देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें हित निश्चित ॥ स्वेच्छेसाठीं भगवंत । अंतरुं नये ॥१॥
भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोनि बोलला । संकटी पावोनि भाविकाला । रक्षितसे ॥२॥

अनन्यगतिक प्रार्थना.
श्लोक --- दराद्व वळसील तूं तरि न चातकां सेवका ॥ उणें किमपि भाविकां उबकशील तू देवकां ॥ अनन्यगतिका जना निरखितांचि सोपद्रवा ॥ तुझेंचि करुणार्णवा मन धरी उमोपद्रवा ॥१॥
अभंग --- हेचि वेळ देवा नका मागें घेऊं । तुम्हांवीण जाऊं शरण कोणा ॥१॥
नारायणा येणें पाहे विचारुन । तुजवीण आहे कोण मज ॥२॥
रात्रंदिवस राहे आठवोनि तूज । पाहतोसि काय सत्व माझें ॥३॥
तुका म्हणे किती येऊं काकूळती ॥ कांही माया चित्तीं येऊं द्यावीं ॥४॥

आख्यान.
आर्या -- पंढरपूरांत झाला राका नामें कुलाल हरिभक्त ॥ सर्वांभूतीं वत्सल भगवद्भावे सदैव अनुरक्त ॥१॥
दृढ वैराग्य तयाचें दुर्लभ तत्समजनांत वितरागी ॥ नरुचे नश्वर त्यातें कीं परमार्थी सदैव मति जागी ॥२॥
तद्भार्या ही तत्सम बाका गुणभूषण प्रिया साजे ॥ पाहुनि विमल यश तिचें रागाविमलेंदु मंडिता लाजे ॥३॥
बंका एकचि त्यांची कन्या सुबुद्धि गुणराशी ॥ सात्विकभावें पितरां तोषवि कन्याज आधिला नाशी ॥४॥
वाटे विवेकचि स्वयें पत्नी श्रद्धा सुता विमल भक्ति ॥ घेउनि मानवरुपें अवतरला द्यावया जना मुक्ति ॥५॥
श्लोक --- ऐसें तें कुल सत्व भावयुक्त । आराधी रहि तत्पदानुरक्त । त्या पावै प्रभु कां न चित्त साक्षी । निर्वाणीं न कसा तयांस रक्षी ॥१॥
दिंडी --- अल्प काळें मांजरी फिरुनि आली । पिलें दृष्टी न पडतां फार भ्याली ॥ जळत आंवा पाहुनी त्यां सभोंती । घालि घिरट्या ओरडे मौनजाती ॥१॥
श्लोक --- तें पाहतां दचकला मनिं कुंभकार । झाला म्हणे मजकडोन अनर्थ घोर ॥ कुंभात मांजारि निजवोनि गेली । तीं म्या न जाणुनि हुताशनिं टाकियेलीं ॥१॥
ओंव्या --- अपत्यस्नेहें त्यांची जननी । बाहे तयातें दीनवाणी ॥ तें मज दु:सह मरणाहुनी । उपाय कांही दिसेना ॥१॥
बाका म्हणे करोनि नवस । आठवावा जगन्निवास ॥ भक्तवत्सल निजदासास । रक्षी संकट टाळुनि ॥२॥
श्लोक --- अवश्य म्हणुनि मनीं स्मरुनियां कृपासागरा ॥ म्हणे दुरित वारुनि त्वरित उद्धरी पामरा ॥ दया करिशी वत्सला जरि अहापिलें वांचति । सुखें त्यजिन सर्व मीं वरुनि पादसेवाच ती ॥१॥
ओव्या --- ऐसा संकल्प करोनी अंतरीं । अग्नी शांत होय तोंवरी ॥ व्याकुल चित्त निराहारी । आंव्यापाशीं तिष्ठत ॥१॥
तिसरे दिवशी कृशान शांत । होऊनि भाजनें दिसती समस्त । त्यांत पिलांचा कुंभ निश्चित । हिरवा अवचित देखिला ॥२॥
आर्या --- मातेचा आर्तस्वर ऐकुनि कुंभि पिलेंहि किलबिलतीं । पाहुनि जन आश्चर्य म्हणती हा साधु विमलपती ॥१॥
ओंव्या --- तीन दिवसपर्यंत देख । नाहीं सेविले अन्नोदक ॥ तेणें कुलाल म्लानमुख । तो उल्लासे टवटवें ॥१॥
संकटी पावला जगजीवन । आतां कासया संसार ध्यान ॥ ऐसा अनुताप मनीं धरोन । घर लुटविलें विप्राहातीं ॥२॥
कीं जीव वांचावे जाणे । यास्तव संसार ठाकिला कोणे ॥ क्षुद्र दैवतांची करोनी । पुत्र धन इच्छिती ॥३॥
कच्चा पावशेर वाटीन शेरणी । गजान्न लक्ष्मी दे भवानी ॥ मांजरांची तुला अर्पुनी । अंती विमानी बैसेन म्हणे ॥४॥
तैसा न संसारी कुंभार राका । अघटित नवस केला देखा ॥ संकटी पावला भक्त सखा । दीन दयाळु भगवंत ॥५॥
उपसंहार व आरती.
समाप्त.


N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP