मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
म्हातारा वाडा उत्खनून मिळ...

मुबारक शेख - म्हातारा वाडा उत्खनून मिळ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


म्हातारा वाडा उत्खनून मिळाले
घासलेल्या टाचाचे ठसे
अन्‍ ओसाड जमिनीतले
पोकळ वासे

आई-बापाच्या डोळ्यातल्या खाचांत
चिणलं गेलेलं
स्वप्नांचं कलेवर
अन्‍
कोरड्य़ा आडात
निष्ठूर मातीचे
थरावर थर !

भूतकाळ कधीमधी हा असा
आ वासून उभा...

मेंदू सोसतो कसाबसा
घनव्याकुळ आठवणीचा प्रहार
काचफुटक्या फोटोतल्या पूर्वजांचा
वाळलेला धूळहार!

दुष्काळात भूकंप
की भूकंपात दुष्काळ?
गावापासून आता
तुटली मायेची नाळ !

भूतकाळ कधीमधी हा असा
आ वासून उभा....

हरवल्या पायांनी
पिंजून काढतो शहर
झोपडपट्टी वागवतो
अंगभर !

पुढच्या दिवसांचा
करतात पाठलाग
मागचे दिवस
भकास बकालीनं
लडबडलेली नस न्‍ नस!

वर्तमानानं मांडला
सवता सुभा
भूतकाळ कधीमधी हा असा
आ वासून उभा....

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP