TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

लक्षणे - ३६ ते ४०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


लक्षणे - ३६ ते ४०
३६
आम्हां तुम्हा मुळीं जाली नाहिं तुटी । तुटिवीण भेटी ईच्छीतसा ॥१॥
ईच्छीतसा नसतां वियोग । तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाल तुम्ही आम्ही येकेस्थळीं । वायां मृगजळीं बुडों नयें ॥३॥
बुडों नये आतां सावध असावें । रूप वोळखावें जवळीच ॥४॥
जवळीच आहे नका धरूं दुरी । बाह्यअभ्यंतरीं असोनीयां ॥५॥
असोनि सन्निध वियोगाचा केद । नसोनीयां भेद लाऊं नये ॥६॥
लाऊं नये भेद माईक संबंदी । रामदासीं बोधीं भेटी जाली ॥७॥

३७
तुम्ही आम्ही करूं देवाचा निश्चयो । जया नाहीं लयो तोची देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर । व्यापूनी अंतर देव आहे ॥२॥
देव आहे सदा सबाह्य अंतरीं । जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी देवासी नेणवे । म्हणोनीयां धांवे नाना मती ॥४॥
नाना मती देव पाहतां दिसेना जंव तें वसेना ज्ञान देहीं ॥५॥
ज्ञान देहीं वसे तया देव दिसे । अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टी ॥६॥
ज्ञानदृष्टी होतां पाविज अनंता । हा शब्द तत्वता दास म्हणे ॥७॥

३८
अनंताचा अंत पाहावया गेलों । तेणें विसरलों आपणासि ॥१॥
आपणा आपण पाहतां दिसेना । रूप गंवसेना दोहिंकडे ॥२॥
दोहींकडें दे आपणची आहे । संग हा न साहे माझा मज ॥३॥
माझा मज भार जाहला बहुत । देखत अनंत कळों आला ॥४॥
कळों आला भार पहिला विचार । पुढें सारसारविचारणा ॥५॥
विचारणा जाली रामीरामदासीं । सर्वही संगासी मुक्त केलें ॥६॥
मुक्त केलें मोक्षा मुक्तीची उपेक्षा । तुटली अपेक्षा कोणी येक ॥७॥

३९
पूर्वपक्ष भेद सिद्धांत अभेद । संवाद विवाद समागमें ॥१॥
समागमें आहे सर्व अनुमान । कल्पनेचें रान जेथें तेथें ॥२॥
जेथें तेतें पूर्ण ब्रह्म कोंडाटलें । दृश्यहि दाटलें कल्पनेचें ॥३॥
कल्पनेचें दृश्य करि कासाविस । नाहिं सहवास सज्जनाचा ॥४॥
सज्जनाचा वास संदेहाचा नास । विचारें विलास जेथें तेथें ॥५॥
जेथें तेथें आहे देव निरंजन । तन मन धन त्यासी पावो ॥६॥
तन मन धन तो जगजीवन । आत्मनिवेदन रामदासीं ॥७॥

४०
कोण्ही येकें आधीं देवसी भजावें । तेणें पदे ठावें सर्व कांहिं ॥१॥
सर्व कांहिं चिंता देवची करीतो । स्वयें उद्धरीतो सेवकासी ॥२॥
सेवकासी काय कळे देवेंविण । साधनाचा शीण वाउगाची ॥३॥
वाउगाची शीण हें आलें प्रचीती । दे आदिअंती सांभाळितो ॥४॥
सांभाळितो देव तेथें जाला भाव । देवची उपाव सेवकांसी ॥५॥
सेवकांसी कांहिं न चले उपाय । दाखविली सोये साभिमानें ॥६॥
साभिमानें सोये देव धन्य होये । सहज उपाये दास म्हणे ॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-11-05T19:41:54.7700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दाणी

  • स्त्री. ( गो . ) डागणी ; सळई . [ दाहणी ] 
  • पु. १ धान्यावरील कर वसूल करणरा अधिकारी . येतुकेआ दाणी लोकू मेळुनु । बावतिस्मु घ्यावया आले ठाकुनु । - ख्रिपु २ . १८ . ७४ . २ सरकारास धान्य पुरविणारे . ३ कराच्या रुपाने येणारे सरकारी धान्य ज्याच्या ताब्यांत असे तो अधिकारी . ४ ( वरील पेशावरुन पडलेले ) एक आडनांव . ५ धान्याचे व्यापारी . [ दाणा ] 
  • स्त्री. ( एखाद्या जिन्नस ठेवावयाचे ) पात्र , उपकरण , ( सं . ) आलय या अर्थाचा फारसी प्रत्यय . उदा० अत्तरदाणी , गुलाबदाणी , चहादाणी . [ फा . दान ] 
RANDOM WORD

Did you know?

पापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.