TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज...

राजेश मंडलिक - टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


टू बी ऑर नॉट टू बी ?
टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन !
लॉगिन असावं, की डिऍक्टिव्हेट व्हावं हा एकच सवाल आहे

या सोशल मीडियाच्या कचराकुंडीत
एका पोस्टचा थ्रेड पकडून
नाचावं उसन्या आनंदाने,
की खोटं रडावं, चिडावं
अन् मग फेकून द्याव्यात त्या भावना
कुठल्या तरी सर्व्हरमध्ये सडत राहण्यासाठी.
...आणि मग करावा लॉगआउट
एकच क्लिकने
व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम अन् फेसबुकचासुद्धा ?

इथल्या जात्यंधतेच्या नागाने
असा डंख मारावा
की भिनत जावं ते विष
हळूहळू
अन् त्यातून कधी बाहेर पडू
लागलो तर...

इथेच तर मेख आहे
खर्‍या आयुष्यातल्या आव्हानांशी
दोन हात करण्याची ताकद नसते
म्हणून आम्ही खेळत असतो
लुटुपुटू खूश होणं अन् चिडणं
कधी सहन करतो, कधी वार करतो
खोटेपणाचा मुखवटा चढवून !

...आणि अखेर असाह्यतेचं बोट वापरून
क्लिक करतो लॉगिन होण्यासाठी
आमच्याच मारेकर्‍याच्या साईटवर !

हे मार्कंडेया, तू इतका चालू कसा निपाजलास ?
एका बाजूचे मित्र आम्हाला ‘ बॉर्डरवर जा ’ म्हणून हिणवतात,
तर दुसर्‍या बाजूचे मित्र ‘ एसीत बसू नका ’ म्हणून ओरडतात
मग आभासी जगाला चटावलेलं हे मन घेऊन
हे झुकेरबर्ग
आम्ही डबल ढोलकीवाल्यानी
कोणा साइटच्या लॉगिनमध्ये बोट खुपसायचं ?
कोणत्या लॉगिनमध्ये कोणत्या ?....

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-08-05T20:23:24.7670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

deodorisaion

  • न. निर्गंधीकरण 
RANDOM WORD

Did you know?

समुद्रस्नान केव्हा करावे व केव्हा करू नये ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site